असावं लागतं कुणीतरी
असावं लागतं कुणीतरी


असावं लागतं कुणीतरी
आपलं म्हणणारं
क्षणोक्षणी नेहमी
आपल्याला हसवणारं
जीवनाच्या वाटेवर
पदोपदी आठवणारं
क्षणिक का होईना
पण रागावणारं
असावं लागत कुणीतरी
चांगल्या गोष्टी सांगणारं
अन् वाईट गोष्टींपासून
परावृत्त करणारं
नेहमी आपल्या
हिताचं बघणारं
असावं लागत कुणीतरी
आपली वाट बघणारं
वाटेकडे डोळे लावत
तहानभूक विसरणारं
खरच असाव लागत कुणीतरी
आपल म्हणणारं
नेहमी आपल्यावर
विश्वास ठेवणार
अन् क्षणभर का होईना
आपलं म्हणणारं