"जगाचा पोशिंदा"
"जगाचा पोशिंदा"
घाम गाळतो रात्र दिन, झालाय जगी अंधारी...
घेऊनी मेहनत अहोरात्र कष्टकरी,
"जगाचा पोशिंदा" माझा शेतकरी...
रखुमाई संगे, पेरणी करी..
साक्षात पांडुरंगच, नांगर धरी..
जाणतो फक्त जळू दे पण पिकू माझी शेती खरी पंढरी...
घेऊनी मेहनत अहोरात्र कष्टकरी,
"जगाचा पोशिंदा" माझा शेतकरी...।।१।।
पाऊस धारा बरसताच, बहरून येते हिरवी सृष्टी..
अवकाळी निसर्ग कोपतो, कधी कधी का बदलते हो दृष्टी...
सुखी संसारात मन रमेना, जेव्हा धुपुन जाते शेती सारी...
घेऊनी मेहन
त अहोरात्र कष्टकरी,
"जगाचा पोशिंदा" माझा शेतकरी...।।२।।
सौदा करतात मालाचा, सारे मिळूनी व्यापारी...
कष्ट केले किती अपार, पोटभर मिळेना हो भाकरी...
देवा बळीराजा तुझं राज्य येईल का अवतार घे या भुवरी...
घेऊनी मेहनत अहोरात्र कष्टकरी,
"जगाचा पोशिंदा" माझा शेतकरी...।।३।।
शेतकऱ्यांच्या जिवावर, बढाया मारून चालवती हो धंदा...
शेतीत ह्या अनवाणी, झिजविला बैलाचा खांदा...
शब्दाला बळी पडू नका, फाशी तुम्ही घेऊ नका सडला जरी कांदा..।।४।।
माझा शेतकरी "जगाचा पोशिंदा"