स्त्री जीवन
स्त्री जीवन
अन्यायाने पिडलेली,
समाजाने लाथाडलेली,
आणि एकाकी राहणारी,
कारण ती एक दुर्बल स्त्री आहे.
समाजातल्या चर्चेचा विषय बनलेली,
वाईटांच्या नजरेत भरलेली,
आणि हास्यांचा विषय झालेली,
कारण ती एक दुर्बल स्त्री आहे.
जी वावरली 16व्या शतकात,
घरदार सांभाळत राहिली नवऱ्याच्या धाकात,
शिक्षणापासून वंचित राहिली ती घरात,
कारण ती एक दुर्बल स्त्री आहे.
जिने फक्त चूल आणि मुलंच सांभाळले,
समाजाच्या प्रत्येक प्रथेला जोपासले,
तरी नवऱ्याने दारू पिऊन तिलाच लाथाडले,
कारण ती एक दुर्बल स्त्री आहे.
जिने स्वतः आधी विचार केला दुसऱ्याचा,
कायमच आदर केला तिने नवऱ्याचा,
पण तिला कधीच नाही मिळाला शब्द प्रेमाचा,
कारण ती एक दुर्बल स्त्री आहे.
जिने कायमच सहन केला दारुड्या पतीच्या शिव्या अन् मारहाण,
प्रथेला बळी जावं लागलं तिला विनाकारण,
समाजापुढे तिला पाळाव्या लागल्या रितीरीवाज अन् शासन,
कारण ती एक दुर्बल स्त्री होती.
पण काळ बदलला,
आणि स्रियांही बदलल्या,
आता ती एक स्त्री आहे,
अन्यायाला व
ाचा फोडणारी,
समाजाला चांगला उपदेश करणारी,
आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देणारी,
कारण ती एक सशक्त स्त्री आहे,
समाजापुढे लढणारी,
वाईटांना सुधरवणारी,
आणि तिला हसणाऱ्यांंना पश्चाताप करवणारी,
कारण ती एक सशक्त स्त्री आहे,
जी राहते आता 21व्या शतकात,
घरदार सांभाळून काम करते ऑफिसात,
पुरुषांपेक्षाही पुढे गेली आहे ती शिक्षणात,
कारण ती सशक्त स्त्री आहे,
जी घरदार बरोबर शाळा कॉलेजही सांभाळते,
देशाच्या भवितव्यासाठी राजकारणातही पुढे येते,
वाईट मार्गाला जाणार्या नवऱ्याला चांगल्या मार्गावरही आणते,
कारण ती एक सशक्त स्त्री आहे,
जी आता दुसऱ्यासोबत स्वतःचाही विचार करते,
चार चौघात स्वतःची इज्जत सांभाळते,
आणि इतरांकडून प्रेमाचे शब्द बोलवून घेते,
कारण ती एक सशक्त स्त्री आहे,
तीने गगनझेप घेतली आहे मुक्तपणे संचारण्यासाठी,
तीने आवाज उठवला आहे जुन्या चालीरीती बंद करण्यासाठी,
ती शिक्षणाने पुढे गेली आहे हा समाज बदलवण्यासाठी,
कारण..
कारण ती आता एक सशक्त स्त्री आहे.