रंग होळीचे
रंग होळीचे
उधळूनी आले आकाशी
रंगीबेरंगी रंग होळीचे
खेळुनी एकमेकांसंगे
विसरावे जग दुःखाचे
हवेत उधळण झाली
ह्या गुलाबी रंगाची
खळी पडून आली
लाली या गालाची
करुनी एकत्र लाल रंगानी
प्रेम साऱ्या जाती धर्मीयांचे
राहुनी सर्वानी एकजूट
करूया नाते बंधुत्वाचे,
नयनी येती प्रसन्नता
या गार हिरव्या रंगांनी
सर्वत्र गालीचाच भासे
पसरलेल्या हिरवळींनी
करी उधळण चौफेर
गुलाली रंग हे वसंताचे
येऊनी जीवनी नवे
किरण नवचैतन्याचे