शीर्षक :- सैनिक माझा मुलगा
शीर्षक :- सैनिक माझा मुलगा
एक वेगळं स्वप्न होतं
माझ्या ह्या बाळाचं,
आपल्या भारतभूमीसाठी
काहीतरी करायचं,
भूमातेच्या रक्षणासाठी केला
विचार सीमेवर जायचा,
अन म्हणून त्याने कायम
सोडला साथ घराचा,
एकुलता एक मुलगा
होता माझा जीवाचा,
जाऊनी आता सिमेवरी
झाला तो देशाचा,
सर्व सुखसोयी सोडुनी
राहिला तो ऊन पावसात,
देशाबद्दलची कळकळ
दिसत होती त्याच्या डोळ्यात,
पत्र पाठवायचा मला तो
न चुकता दर महिन्याला,
वाचताना येई उजाळा
त्या जुन्या आठवणीला,
रात्र दिवस होई फक्त
त्याचा शत्र
ूंशीच सामना,
पण तिरंग्यापुढे त्याला
कोणीच कधी दिसेना,
एकदा घुसले आतंकवादी
ह्या भारतीयांच्या मातीत,
गोळीबार करता करता
लागली गोळी त्याच्या छातीत,
मरताना ही होते त्याच्या तोंडी
ही माता माझी भारत माता,
कधीच नाही येणार ह्या
पाषाण हृदयी शत्रूंना जिंकता,
आणले घरी पार्थिव शरीर
त्याचे तिरंग्यात सन्मानाने,
एक मुलगा एक सैनिक
गमावला ह्या देशाने,
सीमेवर वीरमरण आले ह्या
मातेच्या एकुलत्या एक पुत्राला,
अन म्हणून सलाम माझा
देशासाठी लढणाऱ्या ह्या जवानाला.