STORYMIRROR

मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर

Tragedy

4  

मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर

Tragedy

स्त्रीभ्रूण बोलतेय

स्त्रीभ्रूण बोलतेय

1 min
41.2K


आई ग आई मी स्त्रीभ्रूण बोलतेय

तुझ्या पोटात मारलेली लेक बोलतेय

का गं आई मला तू मारलंस

मी खुडलेली गर्भकळी बोलतेय ।।1।।

जन्माला येऊन तुझ्या पोटी

तुला रोज वंदन करणार होते

मातृदेवता तू,जन्मदात्री तू म्हणून

मनोभावाने पूजणार होते ।।2।।

तुझ्याशी बोलणार,हसणार होते

तुला कामात मदत करणार होते

खूप खूप शिकून आई

इंदिरा गांधी,किरण बेदी सारखे बननार होते।।3।।

स्त्रीशक्ती दुर्गामाता,लक्ष्मीमाता

यांचेच तर मी गं रूप होते

मलाही जग पहायचे होते आणि

सुंदर या विश्वात रमायचे होते।।4।।

जगाला भिऊन,वंशाच्या दिव्यासाठी

का मारलेस गं आई मला

पणती बनून दोन्ही घरांना

उजेड आनंदाचा गं असता दिला।।5।।


Rate this content
Log in

More marathi poem from मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर

Similar marathi poem from Tragedy