कोणा सांगू जन्माची कहाणी
कोणा सांगू जन्माची कहाणी
1 min
20.9K
कुणा सांगु
माझ्या जन्माची कहाणी?
घरदार असून मी अभागी
फूटपाथ वर एकटी
कुणा सांगु
माझ्या जन्माची कहाणी?
शेतीबाडी असून मी अभागी
पोटासाठी तडफडते एकटी
कुणा सांगु
माझ्या जन्माची कहाणी?
पदरी पोर बाळ असून मी अभागी
पोरबाळ असून एकटी
कुणा सांगु
माझ्या जन्माची कहाणी?
इतभर पोटाची खळगी
भरण्या फिरते एकटी