STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Romance Tragedy

तू कुठे म्हणालीस ...

तू कुठे म्हणालीस ...

1 min
29.5K


तू कुठे म्हणालीस ...

हो, नाही आणखी काही ....

तू उभी होतीस गप्प -गुमान 

शिळा बनुनी तशीच अबोल - अबोल

तू कुठे म्हणालीस ...

थांब, जा वाट पहा 

तू तर होतीस .. मौन थोडीशी

भांबावलेली, उदास - उदास 

तू कुठे म्हणालीस ...

सरळ निघून जा ..

तू फक्त म्हणालीस ...

'राहू दे' एवढंच ...

तू कुठे म्हणालीस ...

प्रेम आहे, नाही आणखी काही ...

काय समजायचं ग मी  

होकार, नकार कि ण्हकीच काही

तू कुठे म्हणालीस ...

चालता हो आधी इथून  

भेटूच नकोस पुन्हा म्हणून 

तू गेलीस कोडं बनून कायमचीच

तू कुठे म्हणालीस ...

येते मी, जाते मी ...  

शोधू नकोस मला पुन्हा  

नि माझ्या पाऊलखुणा

तू कुठे म्हणालीस ...

येऊ नको, जाऊ नको की आणखी काही 

तू फक्त होतीस दगड होऊन थिजलेली 

मीही होतो उभा अगदी तसाच .. भावविभोर

रोखून डोळ्यातला समुद्र साठवलेला ...  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance