Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy


3  

Abasaheb Mhaske

Abstract Tragedy


खोटं कशाला बोलू ?

खोटं कशाला बोलू ?

1 min 178 1 min 178

खोटं कशाला बोलू ?

आपलं कसं खुल्लम खुल्ला

कुणाच्या बा ला आपुन भीत नाय

गल्लीपासून दिल्ली पर्यंत वट हाय


खोटं कशाला बोलू ?

खोट्याशिवाय मेवा मिळत नाय

इमानदारीला केंव्हाच गुड बाय

इथून तिथून सर्वच तसेच हाय


खोटं कशाला बोलू ?

इमानदारीन कुठे पोट भरतं

जनरागत राबून कुठं काय उरत ?

राजा हरिश्चन्द्रचा बुरखा घालत नाय


खोटं कशाला बोलू ?

सत्यमेव जयते तुम्ही खुशाल म्हणा

चांद्यापासून बांद्यापर्यंत ठोसर भिकारी

शेतकरी ,कामगार उपाशी पोटी कर्जात मेला


खोटं कशाला बोलू ?

जनता बिचारी अडली गाय नी काटे खाय

खऱ्याच खोटं , लबाडाचं तोंड मोठं

बेंबीच्या देठापासून ओरडा फक्त धन्यवाद


खोटं कशाला बोलू ?

आले बघा अच्छे दिन ,झालोच विश्व् गुरू

खर खोटं देशभक्ती त्यांच्याच नजरेतून

शेठच्या इशाऱ्यावर फक्त नाचत रहा


खोटं कशाला बोलू ?

चमत्काराशिवाय नमस्कार नाय मित्रा

महागाई बेकारी महामारी कुपोषण ...

काय देणं घेणं ? हिशोब आपला न्यारा


खोटं कशाला बोलू ?

कुणी कुणाचं नसत रे

काहीही सोबत येत नाय

कोण मेले कोणासाठी ?


खोटं कशाला बोलू ?

अरे वाहती गंगा घ्या हाथ धुवून

भाड मे जाये जनता काम अपना बनता

अफलातून असे काही जगा न भूतो न भविष्यती


Rate this content
Log in

More marathi poem from Abasaheb Mhaske

Similar marathi poem from Abstract