STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Action

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Action

माझ्या मना बन दगड

माझ्या मना बन दगड

1 min
194

माझ्या मना बन दगड

घे मिटवून डोळे कायमचे

 नको ऐकू नकोसे हवेहवेसे 

हो विरक्त वेड्या फकीरासम ...


माझ्या मना बन दगड 

बिनधास्त रगड साऱ्या भावना 

संवेदना प्रेमेच्छा मरू दे

 माणुसकीचा झरा ...


माझ्या मना बन दगड 

करून घे सवय सभोवतालची

 मंगळ अमंगळ राजकारणाची 

जगण्या मरणाची अन सरणाचीही ...


माझ्या मना बन दगड

 काढ सवड सहमतीची 

नको गोष्ट नीती अनीतीची

 फक्त बात आत्ता सहमतीची ....


माझ्या मना बन दग

ड नको रडू नको धडपडू 

दुनिया ही बिलंदर गडे 

सत्यापायी नको वेडा ठरू....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy