STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Tragedy

4  

गोविंद ठोंबरे

Tragedy

|| शोकांतिका ||

|| शोकांतिका ||

1 min
41.8K


इथे नि:शब्द मनाच्या काळोखात टाहो फोडली जातात..

अन कुशाग्र बुद्धीच्या माणसात सारी भुतं नाचतात ।

इथे आकांताच्या आगडोंबात अंधश्रद्धेचे वनवे पेटतात..

अन पाप पुण्याच्या डोहामध्ये माणुसकीचे पुतळे बुडतात।।


इथे सूर्याच्या लख्ख किरणात नरबळींचे रक्त सांडतात..

अन भेदरलेली पाषाण मनं मुक्या जीवांचे अर्क पितात।

इथे श्रद्धेच्या दिव्याखाली भोंदूगिरीच्या वाती जळतात..

अन परंपरेच्या नावाने वारंवार माणसं भाजतात ।।


इथे कुकर्मी देहांमध्ये दैवी शक्तींच्या ज्वाला अवतरतात..

अन अमावस्येच्या काळराती अजूनही स्मशाने जागतात।

लखलखत्या वीजा देखील कर्कश आवाजाने शमतात..

अन जादू-मंत्राच्या दंशाने कित्येक सरणे रोज जळतात ।।


इथे विज्ञानी डोक्यांचे अचूक कपाळमोक्ष होतात..

अन अंधश्रद्धेच्या निर्मूलनाला कावळे पिंड शिवतात।

इथे अभैद्य वास्तूंमध्ये आत्म्यांच्या सावल्या दवडतात ..

अन जनजागृतीचे वसे पेलणारे रस्त्यांवरती लख्तरतात..रस्त्यांवरती लख्तरतात।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy