विडंबन
विडंबन


तुझ्या माझ्या सत्तेला या आणि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला मंत्रीपद नवं
नव्या सत्तेमंदी काय नवीन घडंल
नव्या सत्तेसंगं समदं येगळं होईल
नेतं जातील, नेतं येतील
मत चोरून, सत्ता येईल
बंडखोरी समदी जाईल निघूनी
तरारलं कार्यकर्तं ओल्या पार्टीनं
मिळंल का त्याला, सत्ता पैसा पाणी
येईल का पडेल ते तुझ्या माझ्यावानी
युती तोडुनच पर होईल येगळं
मित्रासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं
नेत्यावानी फसवंल त्यो, मंत्र्यावानी पळवंल त्यो
पक्षावानी भुलविल,जनता बी खेळविल
समद्या दुनियेचं पैसं बुडवील त्यो
असंल त्यो कुणावाणी, कसा गं वागंल
तुझ्या माझ्या भ्रष्टाचा तो वारसा असंल
उडुनिया जाईल ही विरोधाची लाट
आपुल्याच खुर्चीसाठी फुटल पहाट
सत्तेच्या या भोगावानी तान्हं तुझं माझं
सोसंल गं कसं त्याला मंत्रीपद मोठं
भावनिक जनतेचा भावनिक जीव
खऱ्या परि घेई समद्या जनतेचा ठाव