STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Abstract

4  

गोविंद ठोंबरे

Abstract

फुलं

फुलं

1 min
213

फुलं उमलतात,सुखावतात, हसतात,

दवबिंदूंच्या स्पर्श मोत्यांनी...


फुलं बहरतात, डुलतात आणि लाजतातही

छेडणाऱ्या पान रेघांनी...


फुलं बिलगतात पानात, शहारतात

अन बेभान वारं शोषून नाचायलाही लागतात...


फुलं आसमंत पाहतात,प्राजक्त होतात

रजकन भरल्या देही ती गर्भारही होतात...


फुलं वेडी असतात,सोज्वळ असतात

चोर पावलांच्या वाटेकडे टक लावून पाहतात...


फुलं चित्त हरवतात, सर्वस्व देतात

भ्रमरवेडी फुलं माती होऊन भरडली जातात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract