STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Abstract

4  

Kamlesh Sonkusale

Abstract

कविता

कविता

1 min
41.3K


कविता असावी

कविता शृंगारिक,

शब्दकळा उमळावी

त्यातूनी भावनिक.


कविता असावी

सजवलेली रांगोळी,

रातराणी बहरावी

जणू सांजकाळी.


कविता असावी

नवनवती वधु,

चांदण्यारात्री शोभे

गगनी विधु.


कविता असावी

जीवनातील स्मृती,

श्रावणमासी जशी

हिरवीगार क्षिती.


कविता असावी

हृदयातील स्पंदन,

अवताराची त्यातुनी

चित्रांकन कवन.


कविता असावी

कुंकू अन काळे चार मणी,

थेंबभर अश्रूंनी

ओली व्हावी पापणी.


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Abstract