सभ्य संस्कृतीच्या नरांनो
सभ्य संस्कृतीच्या नरांनो
सभ्य संस्कृतीच्या नरांनो
मला माझा साज द्या रे,
लुटलेली लाज द्या रे
माझा उद्ध्वस्त आज द्या रे...
कधी जानकी झाले मी
कधी पांचाली द्रौपदीही,
सतीत्व ही माझ्या पदरी
केलेस निर्भया दुर्दैवी ही,
आक्रोशात हरवलेला
मला माझा आवाज द्या रे...
पायदळीचे पायतान समजून
पायी तुडविलेस तू हवेसे,
बदलशी वस्रांपरी स्त्रिया
पुन्हा वस्त्र तुज नवेसे,
स्वैराचारार्थ मश्गुल तुमच्या
हीन वृत्तीच ठोकरा रे...
हा कसला पुरुषार्थ आहे
अबलेस हिणून छळणारा,
साऱ्या पिडांचा एकेरी वाटा
स्व अहंकारात घोळणारा,
सन्मान मा
झ्या स्त्रीत्वाचा
जरा माज त्यागून द्या रे...
अत्याचार होता मजवर
तुझा तीव्र निषेध नको रे,
स्त्रीत्वाचा मांडून बाजार
तुझी सांत्वना नको रे,
मुखवटी धर्मरक्षकांनो
सोडून व्याज द्या रे...
कधी शोभेची कधी भोगाची
मी निर्जीव वस्तू त्यागाची,
तुझा व्यभिचार पुरुषार्थ तुझा
मी ठरते स्वैराणी उगाची,
ही मस्तवाल प्रवृत्तीची
झटकून खाज द्या रे...
पुरे आता हा वितंडवाद
मी श्रेष्ठ की तू महान,
तू राख माझा मान
मी करेन तुझा सन्मान,
पिता पती बंधू सुताच्या
ओशाळ नजरेस नाज द्या रे...