सत्य लपवून आहे.........
सत्य लपवून आहे.........
मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
डोळे हसरे ओठही हसरे दुःख दडवून आहे
या जीवनाची एक कहाणी
थोडी नवी थोडी पुराणी
मीच माझे बघितलेले
स्वप्न तुडवून आहे
मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
दुःख कुठे व्यक्त न करता
जीवन असेच सरले सरता
दुःख घेतले पांघरून मी
हर्ष फुलवून आहे
मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
जगतो मी जगण्याचे जगणे
आजचे जीवन उद्याचे मरणे
आशेचे तरीही आज मी
दीप पेटवून आहे
मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
वेळ सारखी कुणाला नाही
दुःखात परी मी एकटा नाही
होईल म्हणून सर्व सोईचे
धीर टेकवून आहे
मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
डोळे हसरे ओठही हसरे दुःख दडवून आहे