STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Tragedy

3  

SHASHIKANT SHANDILE

Tragedy

निशब्द

निशब्द

1 min
616

लिहावं मनाचं की राहू द्यावं

मनाच्या गाभाऱ्यात

क्षणोक्षणी टोचणारे

शब्द पडून तसेच

 

आपण लिहावं मनातलं

आणि अर्थ काढावा दुसऱ्याने

तिसराच काही तरी

म्हणून विचारतो

लिहावं मनाचं की राहू द्यावं

 

साली आपलीच जिंदगी

व्यक्त करायला शंभर विचार

म्हणून आतल्या आत गुदमरतो

जीव बिनपाण्याच्या मास्यासारखा

तडफडत दिवसरात्र

 

विचारांचा तमाशा मांडून

आपणच निशब्द व्हावं आणि

थांबवावा वादळ शब्दांचा

निजवावे शब्द आणि करावा प्रयत्न

त्यांना ठार मारण्याचा

 

तरीही निर्माण होणार तोच प्रश्न

की लिहावं मनाचं की राहू द्यावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy