निखारे
निखारे
व्यवहारी झाले
नभातील तारे
वाटती निखारे
जगताना
सगळेच झाले
बेईमान जगी
सापडेना त्यागी
शोधुनिया
प्रत्येक मनात
भिती मरणाची
ओढ सरणाची
कुणा नसे
अरे हे जीवन
दुपारची छाया
किती करू माया
शरीराची
कालबाह्य झाले
गांव माणसाचे
नांव माणसाचे
सापडेना
व्यवहारी झाले
नभातील तारे
वाटती निखारे
जगताना
सगळेच झाले
बेईमान जगी
सापडेना त्यागी
शोधुनिया
प्रत्येक मनात
भिती मरणाची
ओढ सरणाची
कुणा नसे
अरे हे जीवन
दुपारची छाया
किती करू माया
शरीराची
कालबाह्य झाले
गांव माणसाचे
नांव माणसाचे
सापडेना