STORYMIRROR

Anil Date

Others

3  

Anil Date

Others

पालक

पालक

1 min
27.9K


कोण दास अन कोण कुणाचा मालक आहे

तूच निर्माता जगाचा सर्वांचा चालक आहे


प्रभू तूच दिले ज्ञान अशा नश्वर देहाचे

तुझी गीता जन्ममृत्यूचा जणू फलक आहे


स्वामी तूच तिन्ही जगाचा नाथ रें अनाथांचा

कर स्विकार माझा मी पाल्य तूं पालक आहे


ठेव दूर अज्ञान आणि अंधःकारापासून

कर नाश तिचाही माझ्यात जी कालक आहे


मला आहे स्मृती मीच केलेल्या अपराधांची

कर क्षमा तू पिता तुझाच मी बालक आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन