STORYMIRROR

Anil Date

Inspirational

3  

Anil Date

Inspirational

लढा

लढा

1 min
28.8K


मैना पिंजऱ्यात कैद फाटक बंद आहे

स्वातंत्र्य हिरावण्याचा असा का छंद आहे


न दिसे त्याला तुझ्या पंखातील फडफड

त्याच्याच पुरूषी तोऱ्यात तोही धुंद आहे


तो खग फांद्याफांद्यावर स्वैर उडणारा

तुला चुल अन् मुलाचा पायबंद आहे


फसवं ते मृगजळ धावली तू ज्यामागे

नं त्याला दुःख तुझे नं तुला आनंद आहे


असं नाही तू अबला तो बलवान आहे

तुझाच अन्यायाविरूद्ध लढा मंद आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational