STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

1 min
123

स्मृति करूया प्रेरणादायी

भारतीय वीरांच्या क्रांतीची

स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या

देशभक्ती ,निष्ठावंत वीरांची ||


   देऊनीया आहुती प्राणांची

   स्वतंत्र केले भारतभूमीला

  काळया पाण्याच्या शिक्षा भोगूनी

  जीवन त्यागीले या कर्मभूमीला ||


आंबेडकरांच्या रूपात देशास

मिळाले संविधानाचे योगदान

लोकशाहीचा मिळे अधिकार

हाच नागरिकांचा अभिमान ||

  

    साजरा करूया अमृत महोत्सव

    स्वातंत्र्याने पंच्याहत्तरी गाठली

    स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणीने

    भीती कशाचीच नाही वाटली ||


अभियान असे हर घर तिरंगा

जास्तीचे ध्वज फडकविण्याचे

विविध उपक्रमातून स्फूर्तीने

अमृत महोत्सव साजरा करण्याचे||


    भावना हृदयी देशभक्तीची

    समाजात जागृती करण्याची

    राष्ट्रध्वजाच्या जाणिवेसाठी

    मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्याची||


हर घर तिरंगा फडकवूनी

राखू आपण तिरंग्याचा मान

तुझे स्मरण आमुच्या नसानसात

आम्हाला असे देशाचा अभिमान ---!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational