STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

नववर्षाचे स्वागत करूया

नववर्षाचे स्वागत करूया

1 min
4


३१डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर

नवीन वर्ष २०२४ आले 

फटाक्यांच्या आतषबाजीने 

स्वागत मस्तच झाले ||


मोबाईल देतात शुभेच्छा

सुखसमृद्धीनेचे जावो वर्ष

आरोग्यमय जीवन मिळो

वाचून मनी झाला हर्ष||


जमला सारा आप्त परिवार

नव वर्ष स्वागतां गोळा

बनवून गोडधोडाचे जेवण

घरी भरला आनंद मेळा ||


विसरून जाऊ दुःख सारे

नवनवे संकल्प करूया

नवीन ध्येय मनी ठेवूनी

नववर्षाचे स्वागत करूया||


Rate this content
Log in