STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

घोंगडी

घोंगडी

1 min
6

परंपरा भारताची

संस्कृतीची असे खाणं

पावित्रही घोंगडीचे

महाराष्ट्राचीच शान ||


धनगर माझा पेशा

मेंढ्या राखीतो माळाला

असे धनाचा आगार

 भार असतो रानाला ||


काठी हातात असती

काळी घोंगडी पाठीला

लावी कपाळी भंडारा

सूर लावितो गाण्याला ||


रामबाण उपयोगी

आरोग्यासाठीही छान

उब,आराम मिळतो

उन्हाळ्यात असे मान ||


साप,विंचू,किडे,मुंगी

त्याच्या परी येत नसे

अंथरून,पांघरूण

 सर्वांच्याच मनी वसे ||


Rate this content
Log in