STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

4  

Sangita Pawar

Inspirational

गरबा

गरबा

1 min
313

रंग नवरात्रीचाही

गात गरबा चालतो,

दांडियाच्या तालावर

जीव नाचतो झुलतो।


हाती दांड्या घेवूनिही 

असे भक्तीचाही ध्यास,

माते आराधनेचाही

 सन नवरात्री खास ||


चांदण्यांत दांडियाची

 गरब्याच्या गजरात

 दुमदुमते आकाशही

रातभर नाचतात||


 अंबे जगत भवानी

 रूप अमुच्या नयनी

धूप, दीप घेऊ हाती

खेळू गरबा अंगणी||


माता अंबा कुलदेवी

रक्षशील , क्षमादात्री 

करू जागर खेळूनी 

स्मरूआम्ही नवरात्री||


अम्बेमाता आली घरी 

खेळण्याची आस माझी

नाचू आम्ही खेळू रात्री

गर्जा स्तुती माता तुझी ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational