STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

मृग नक्षत्र

मृग नक्षत्र

1 min
8

शेत नांगरून कृषिक

वाट पाही मृग नक्षत्राची 

मोसमी पावसास प्रारंभ 

अशी किमया निसर्गाची ||१||


मृग नक्षत्राचा आरंभ 

पाणी खळखळे जोरात 

येतो ओल्या मातीचा सुगंध 

जल -जल होई मातीत ||२||


होता मौसमाचेआगमन 

गेला दुष्काळ सरून

नदी, नाले, ओढे, तळे 

वाहती दुथडी भरून ||३||


ओलावा होई गर्भात 

बीज शेतात पेरले 

सुखावली वसुंधरा

अंकुर कसे तरारले ||४||


बळी जगाचा पोशिंदा 

त्याच्या जीवाची आबळ 

पिकवून माणिक मोती 

करी मुला - बाळांचा सांभाळ||५||


Rate this content
Log in