STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

रतन टाटा अमर रहोत

रतन टाटा अमर रहोत

1 min
8

रतन टाटांची जीवनगाथा,

त्यांचे कर्तृत्व किती महान,

निःस्वार्थपणे उभे समाजासाठी 

 देशात अमर झाले त्यांचे नाव ||


त्याच्या स्वभावात नम्रता  

आस्था सदा दानशूरतेची 

 जिंकून लाखो हृदय त्यांनी

श्रीमंतीतही राहणी साधेपणाची ||


देशहितासाठी कष्टाने चालला,

औद्योगिक क्रांतीत देश घडविला

 योगदान, अखंड भारतासाठी

सतत नवा मार्ग दाखविला ||


डोळ्यात कल्पकतेची चमक,

तरुणांसाठी त्यांचा होताआदर्श 

संकटे झेलून झाले महानायक

 सर्वांना दिलात उज्ज्वल प्रकाश ||


आदर्श राहील सर्वांच्या हृदयात,

सतत उजळत राहील तुमचं योगदान

रतन टाटा अमर राहोत कार्याने

 नवभारताचा बुलंद ईमान ||


Rate this content
Log in