काजवा
काजवा
1 min
403
मन निराश अंधारी
खूप झाले हताश
छोट्याशाच काजव्याने
केले शुभ्रही प्रकाश ||
गर्द रात्रीच्या अंधारी
खूप काळोखही झाला
अचानक काजवाही
चमकत पुढे आला ||
दिसायला बारीकसा
दोन पंख असतात
वनी झाडाच्या ढोलीत
अंडी सदा घालतात ||
दिनभर काजवाही
लपूनच बसतात
रात्र होत असताना
बाहेरही पडतात ||
लुकलुकत्याही राती
लुप्त अंधार करीतो
एक खेळ समजतो
सूत त्याला पकडतो ||
करी दान प्रकाशाचे
परोकारानेही द्यावं
कधी वाटते आपण
काजव्याचे रूप घ्यावं||
