STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
7

(अष्टाक्षरे काव्य)


सप्तरंगी पंखामध्ये

रूप तुझे दिसे छान

वेड्या मनाला मोहूनी

हरपते माझे भान ||


स्पर्श होई हातावरी

माझ्या मना बावरते

अलगद सावरते

फुलावर बागडते ||


वेड लावी वेड्या मना

एकापेक्षा एक न्यारे

शब्द अबोल बोलण्या

गोड रूप तुझे प्यारे||


छान रंगीत पाखरू

आकर्षित फुलावरी

स्वाद घेई मकरंद

 असे हरित भुवरी ||


रात्रंदिन स्वैर करी

सर्व बागांच्या ठिकाणी

 सोबतीला असे त्याच्या

बरोबर फुलराणी ||



Rate this content
Log in