जीवनसाथी
जीवनसाथी

1 min

23.9K
तुच माझा जीवनसाथी
तुच माझी दिशा
पाऊले माझी तुझ्याच रे मार्गावर
काटे तुच वेचणार ना ?
तुच माझा जीवनसाथी
तुच माझी प्रेरणा
माझ्या ह्या वळणावर
सदैव साथ तुझी असणार ना ?
तुच माझा जीवनसाथी
तुच माझी स्फुर्ती
मज नेईल यश शिखरावर
प्रत्येक पायरीवर साथ तुझी राहणार ना ?
तुच माझा जीवनसाथी
तुच माझा आधारवृक्ष
सावली तुझी मिळेल जीवनभर
जीवनसाथी आयुष्यभर साथ तुझी राहणार ना ?