संत आधुनिक ( अभंग रचना )
संत आधुनिक ( अभंग रचना )


वडिलांचे छ्त्र I मग हरवले॥
मामाकडे गेले I बालपनी ॥१॥
चार मुली पोटी I शेती ही करती ॥
तरी उबगती I संसारात ॥ २॥
सोडी घरदार | संसार त्यागला ॥
विश्वरूप झाला I अंतरंगी ॥३॥
डोई ते खापर l कानात कवडी ॥
फुटकी बांगडी I वेश करी ॥४॥
गुरू मी हो नाही I शिष्य नाही मला ॥
धरिता पायाला l फटकारी ॥ ५ ॥
मिशन स्थापली | उभी धर्मशाळा ॥
गाव होई गोळा | किर्तनात ॥६॥
दिवसभर ते I गाव झाडी सारा ॥
वाहतोय वारा I बदलाचा ॥७॥
गोपाळा गोपाळा I टाळी वाजवती ॥
तल्लीन करती | प्रवचने ॥ ८॥
बाबासाहेबांचे I देतसी दाखले ॥
महत्व जाणले I शिक्षणाचे ॥ ९ ॥
प्रबोधनकार I ठाकरे लिहती ॥
वर्णावी महती | मी हो किती ? ॥१०॥
गाडगेबाबा हो I संत आधुनिक ॥
अवलिया एक I भूमंडळी॥ ११॥