सन्मा. रवी जंगले सर,
स्टोरीमिरर मुंबई, यासी..
विषय- “नारी एक प्रेरणा” कथा स्पर्धा २०१८
महोदय,
सर, आपण सुचविलेल्या “नारी एक प्रेरणा” या विषयावर आधारित माझी “बाई माणूस” स्वरचित कथा स्पर्धेसाठी आपल्याकडे पाठवीत आहे. या कथेचा स्वीकार करावा, ही नम्र विनती.
... Read more
सन्मा. रवी जंगले सर,
स्टोरीमिरर मुंबई, यासी..
विषय- “नारी एक प्रेरणा” कथा स्पर्धा २०१८
महोदय,
सर, आपण सुचविलेल्या “नारी एक प्रेरणा” या विषयावर आधारित माझी “बाई माणूस” स्वरचित कथा स्पर्धेसाठी आपल्याकडे पाठवीत आहे. या कथेचा स्वीकार करावा, ही नम्र विनती.
आपला नम्र
लेखक-राजेश साबळे ओतूरकर,
उल्हासनगर (ठाणे)
मोबा-९००४६७४२६३
“बाई माणूस”
बाई माणूस ही कथा लिहिण्याचा मी, अनेक वर्षांपासून बाई, मग ती ई असो नाही तर अन्य कोणी पण, तिच्या व्यथा मी अगदी कळायला लगले तेंव्हापासून पाहत आलो आहे. म्हणून एक दिवस ती कथा म्हणा किंवा कविता लिहावी अस मनात होत पण, त्याला आज मुहूर्त मुळाला. आपण म्हणाल आता बाई माणसाबद्दल काय लिहिणार?......बाई माणूस म्हणजे, एक तर कजाक, भांडखोर, कट कारस्थानी, आग लावणारी, घरात सतत सासूचा तोरा मिरवणारी, घरात नवऱ्या पासून तर स्वतःच्या पोरांना सतत टोकणारी नाही तर, अति सोशिक, मायाळू, घडी घडी डोळ्यात आसवं आणून मायेनं जवळ घेणारी जशी की, गरीब गाय. मग तिला कोणी आई म्हणतं कोणी माय म्हणतं, कोणी माऊली म्हणतं, साऊली म्हणतं, कोणी मायेची पाखर घालणारी दुधावरची साय म्हणतं. कधी अतिरौद्र रुपात ही तीच दर्शन होत. मग तसं रागात कोणी तिला कैदासीन म्हणतं. कोणी रंडी म्हणतं. तसच तिला रन रागिणी आणि दुर्गाही म्हणतात बर का!!! ही ती बाई..... जी कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची बायको असते, कोणाची प्रेमिका असते, तर कोणाची ती ही रखेल असते, पण ती बाई असते. तिच्या रुपात देव-देवतांचा वास असतो. आणि कधी कधी तसा भास ही असतो किंवा होतो. आपण जसे बघू तसच आपल्याला दिसणार आहे. नव्हे तस्स दिसतं म्हणून तर, मी लिहीत आहे.
एक बाई माणूस काय काय आणि किती किती भूमिका दिवस भरात करते. ते आपण कधी नीट डोळे भरून पाहिलं असेल. तर, आपल्या एक लक्षात येईल की, ही बाई एवढं सारं कोणासाठी आणि का करते? हा मला पडलेला अनेक दिवसांचा गूढ प्रश्न आहे. ही बाई जेंव्हा आपल्या घरात जन्म घेते. तेंव्हा पासून तिचा संघर्ष सुरू होतो. नव्हे तर, अलिकडे तीने आईच्या गर्भातच प्रवेश करू नये अशी मानसिकता वाढीस लागली आणि नव्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिला संपविण्याचा घाट घातला जातो आहे. हे विदारक सत्य आहे. काही लोक आकड्यांचा खेळ करून सांगितलं की, आता बराच बद्दल झाला आहे. पण आजही चोरून लपून आणि धाक धाखवून तिला संपविण्याचा कार्यक्रम संपलेला नाही. नजरेच्या आड बरच काय काय चालेलं असत. फक्त कोणी पाहिलं तरच बोंब होते. गर्भवतीच्या इच्छेला ही नवरे नवाची जात आजही बायकोला याबात भिक घालत नाही. अंतर्गत घरगुती अनेक समस्या असतात म्हणून महिला बोलत नाहीत इतकच. घर सोडण्याच्या धमक्या दिल्या जातात. आता तुम्ही म्हणाल कोण धमकी देतय हे सिद्ध करा. काही गोष्टी सिद्ध करत येत नाहीत. बोलायला किंवा दुसऱ्याला उपदेश करायला ठीक असत. ज्याच जळत त्यालाच ते कळत. मुली सोबत असतात. नवर्यान सोडल्यावर बिचारी जाणार कुठ? आई-बापाकडे जाव तर, तेही कधी कधी म्हणतात. आता आम्ही काय कराव बर. तुमचा नवरा बायकोचा प्रश्न आहे. तू म्हणते तर, जावयाशी बोलून बघू जमल तर, ठीक पण घर सोडू नको. आता काय कराव या बाईन.
आता ते म्हणतात तर तस्स करण्य शिवाय काही पर्याय आहे का? संसार मोडायची वेळ येते. आणि नवरा लगेच दुसरी घरात आण्यासाठी तयारच असतो. आपल्याला पहिल्या बायकोपासून मुलगी झाली त्या मुलच काय? आणि पोरगी देणारे तर, जस काही वाटच बघत असतात. ते हा विचर करीत नाहीत. की, मुलगा होण किंवा मुलगी होण हे पुरुषांवरच अवलंबून असत. हे शास्त्र सांगत. मग दुसरीला मुलगाच होईल कशावरून. काही ठिकाणी तर अशी झाल आहे. पहिलीला मुलीच होतात म्हणून दुसरी केली आणि नतर पहिल्या बायकोलाच मुलगा झाल. आता काय करायचं. म्हणजे दोन-दोन बायका त्याही रोज दुसऱ्याच्या कामावर जावून पोट भरणार आणि हा मस्त दारू पिवून मजा करणार आहे की, ही आमची पुरुष प्रधान संस्कृती. खूप छान, चांगल आहे. हे झाल संगन मताच. पण पहिल्या बायकोचा विरोध जास्त वाढला तिचे आई-बाप मुलीच्या बाजूने उभे राहिले तर तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागनार मग आला पोटगीचा प्रश्न. अस हे सार चाललेलं असत.
काही समजदार असतात ते काय करतात. लग्नानंतर बरेच दिवसात मुल झाल नाही तर, मला पहिला मुलगाच होऊ दे. यासाठी देव-दैवतांच्या मंदिरात नाही तर, ढोंगी बुवा-बाबा यांच्या दरबारात रंगा लागतात. स्वतःचाच कुल दैवत असलेल्या, देवी समोर बसून नवस नाही तर, साकडं घालतात. त्यांना हे ही कळत नाही ही की, कुलदैवत असलेली देवता एक बाई आहे. ती यांच्या नवस आणि साकडं घातल्यावर प्रसन्न होईल का?.....जिच्या समोर आपण उभे आहोत. ती काय वेडी आहे का? स्वताचा नाश ती स्वत ओढवून घेईल का हा साधा प्रश्न आहे. म्हणजे जे लोक आपल्या घरातल्या बायकोला कधी कधी जसं दम देऊन सांगतात. बघ या वक्ताला तुला जर मुलगा झाला नाही तर माहेरी निघायचं मी दुसरं लग्न करणार! सांगू ठेवतोय पुन्हा सांगितलं नाही म्हणशील. या आव्हानात्मक घरच्या सोहळ्यात कोण कोण सामील असतात बरं. .....ते ही बघण्यासारखं आहे. यात सगळ्यात पहिला नंबर असतो घरातल्या सर्वात वयोवृद्ध झालेल्या आजीबाईचा. जी स्व:ताच एकेकाळी एक गोड गोजिर सोनूला, छकुली नावाची मुलगी होती. नंतर कालांतराने बाई झाली, पुढे आई-बापानं शोधून आणलेल्या तरण्याबांड पोराबरोबर लग्न झाल्यावर इतरांना मुलं होतात, तशी हिलाही झाली. आणि तिच्याच घरात तिच्याच मुलाचं लग्न झालं घरी नवी सूनबाई आली. यथावकाश काही दिवसांनी पहिली मुलगी झाली......जरा नाराजी.... पण पुढील वेळेला पाहू.....अस म्हणून अजून काही दिवस जातात आणि सुनबाईला दुसरी मुलगी झाली की, बाई बिघडली. मग घरात नव्या सूनबाईचं कोड कौतुक संपलेलं असतं. तिचा तर छळ होतोच पण, घरात आलेल्या लहान जिवाचेही हाल होतात. प्रत्येक्ष जन्म देणारी आई, जिला आपण माता म्हणतो. तीही घरातल्या मंडळींचा सूर आणि ताल बघून आपल्या पोटच्या मुलीला, तुझ्या मूळ मला हा त्रास सहन करावा लागतो आहे. झाली तेंव्हाच का मेली नाही. अशी वाईट दूषणं आपल्या मुलीला देते. मनात तिच्या तस नसत. पण, घरातल्या बड्याधेंडान पुढे ती माऊली हतबल असते. घरातले सर्वच तिच्या विरुद्ध बंड पुकारतात. कधी कधी तर अस होत की, माहेरकडची माणसं ही त्यात री ओढतात. पण या सर्व प्रकारात जो बाप नावाचा माणूस असतो तो जर, समजूत दार असेल तर त्याला लोक जसं बेजार करतात की, मग तो मनात नसतानाही या चांडाळ चौकडीत सामील होतो. आणि उरला सुरला आधारही ही बाई नावाची आई देव-धर्म, साधू-संत, नवस, खेटे, दरबार, अनवाणी चालणं, अंगावर चटके दिलेले ही सोसनं सुरू होत. हे सर्व प्रकारात सर्वात पुढे असते ही एक बाईचं असते हे ही नाकारता येणार नाही. एक बाई जी स्वतः त्या चाकोरीतून जाते जे सोसते तरी, ही ती आपल्या सुनेला मुलगा व्हावा म्हणून एवढी टोकाची भूमिका घेते. बऱ्याच वेळेला या भानगडीत पुरुष मंडळी जरा दूरच असतात, पण या बायका त्यांना इतकं जेरीस आणतात आणि मग तेही हे सर्व बरोबर आहे. घरातली मंडळी आपल्यासाठी आपल्या बायकोला एवढं सांगता आहेत म्हणून हा ही नवरा नावाचं बांडगुळ (बांडगुळ या साठी म्हणतो आहे की, मी, ही त्यात आहे. म्हणून म्हणतो की, आपण आई-बापाच्या कमाईवर म्हणजेच पर्यायाने इस्टेटीवर जगत असतो. तो मुलगा म्हणुन... त्यात हीच आपली बायको कुणाची तरी मुलगी आहे असं समजा की, आपली बहीण आहे. मग आपली भूमिका काय असेल.) आपण तिला त्रास देणार आहेत काय? इथे आपली भूमिका मवाळ होते. मग बायको किंवा सुनेबद्दल एवढी टोकाची भूमिका का? इथं नवऱ्या मुलाची भूमिका कणखर असायला पाहीजे पण तस होत नाही, अलीकडं कधी तुरळक घटना आहेत की ते मुलीच ही आदर करतात, पण एकच असेल तर किंवा कधीच होत होत नव्हतं पण आता चला मुलगी तर मुलगी असं जीवावर आल्यासारखा सर्व तोड देखल म्हणतं नाक-डोळे मुरडत चाललेलं असतं. मग अशी म्हणतात माझं तस काही नाही पण आई-बाबा,आजी-आजोबांना नातवाचं तोंड बघायची लई इच्छा होती, की, माझ्या पोराच्या वंशाला दिवा पाहिजे... म्हणून एवढा त्रास दिला की, तिनं म्हणे जीव दिला. मग कोण म्हणतं आत्महत्या केली. आता सर्वांनीच कोंडीत पकडल्यावर त्या बाईनं नेमकं काय करायला पाहीजे होत?
या बायको नावाच्या बाईची कर्म कहाणी इथंच संपत नाही. जन्मापासून यांना असं वागविले जात की, तू या घरचीच नाही आम्ही फक्त सतरा आठरा वर्षे सांभाळणार आहोत. तुझ लग्न होई पर्यंत. मग तुझं तू बघ बाई..........
पूर्वी तर, मुली शाळेत सुद्धा जात नव्हत्या. घरात जन्माला येणाऱ्या मुलांची हे अशी भली मोठी रांग लागायची. त्यात मूलं-मुली दोन्ही असतं. पण मुलीचं काम घरात आईला मदत आणि लहान-मोठी पोरं संभाळणे. पुढे तीच स्वत:च लग्न झालं की, स्वतःची मुलं घरकाम, धुणी-भांडी, मोल मजुरी आणि घरातील सर्व लहान-मोठ्या माणसांची जेवण-खाण्याची व्यवस्था, आलेले पै-पाहुणे स्वतःचे नातेवाईक आणि सासरकडील नव्याने जडलेली नातेवाईक मंडळी या सर्वांचे करता करता या गृहिणीची काय दशा होत असेल हे आपण कधी पाहिले आहे काय? आपण हो अस उत्तर द्याल मला माहित आहे. पण हेच काम जर तीच्या नवऱ्याला करायला लावले तर? तर तो, ते काम जेवढ्या आनंदाने ती करते, तेवढ्याच कुशलतेने तो करील काय?..... का थांबलात. बोला ना काय झालं. म्हणजेच काय की, आपली बायको जी दुसऱ्या घरातून, आपल्या घरी आल्यावर तिचा सन्मान होण्या ऐवजी, जे मोलकरीण पैसे मोजून सुद्धा करणार नाही. एवढी काम तिच्याकडून आपण करून घेतो. त्यात कसलीही लाज शरम आपल्याला वाटत नाही. आपण आजारी पडलो तरी तीच आपलं सुख-दु:ख विसरून आपलं सर्व करते. पण, जर ती आजारी पडली की, आपली घरात चीड-चीड सुरू होते. घरातली एकही वस्तू आपल्याला सापडत नाही एवढंच काय तिच्यासाठी साधा चहा करण सुद्धा आपल्याकडून होत नाही. बाकी जेवण बनवून देणं तर, फार दूरची गोष्ट झाली. हे मी एक सासरी आलेल्या मुली बद्दल किंवा सुनेबद्दल बोलत नाही. हे सर्व महिला मंडळाची हीच अवस्था आहे. (यामध्ये आपली आई, बहीण, बायको ही सर्व मंडळी या सासररूपी नौकेतून सारखाच प्रवास करीत असतात) पण फक्त सासू झाल्यावर आणि आजीबाई झाल्यावर, याच बायका आपल्याच सुनेला दूषणं देण्यासाठी लगबग करताना दिसतात.
पुरुषवर्गाची काम ठरलेली असतात. नौकरी करीत असेल तर, सकाळ झाली बाळू उठला, तोंड धावून झाली की आंघोळ, चहा, नास्ता, करून घड्याळ बघून सूट बूट घालून झालं की, अंग डबा झाला का?बायकोला फर्मान निघत. चल आण लवकर, मला उशीर होतोय. डबा, बॅग घेतली की, रुमाल, पेन, घड्याळ, आणि मोबाईल होतात सुद्धा बायकोनं देणे. मग स्वारी कामावर जाणार पण, याची बायको नोकरी करीत असेल तर... मग हे सर्व कोण करणार?...... ती नोकरी करो. नाही तर, घरकाम करो.... ही घरातली सर्व काम तीलाच करावी लागतात. हा असाच आता पर्यंतचा पुरुषी रिवाज चालत आला आहे. आता-आता अलिकडे नोकरदार पुरुष मंडळी थोड फार हात-भार लावताना दिसतात पण, ही संख्या नगण्य आहे. त्याच आता या कामाच्या ताणावरून वाद-विवाद होऊन घटस्फोट वाढलेले दिसतातच ना. .....म्हणून बाईनं किती सोशिक असावं हे लग्न झाल्यावर मुलीला कळू लागत. प्रत्येक गोष्टीत तडजोड बाईला करावी लागते. पुढे ती सून होते सुनेची सासू आणि नंतर आजी या प्रोसेस मधून बाईला जावं लागतं. एवढं करूनही घरात मुलाचं लग्न झालं की, कळत कारण..... बाईचं म्हणजेच आईच वेगळ अस्तित्व जाणवू लागत. असे का? एक सासू आणि एकेकाळी सून होती. हे माहीत असूनही ती आपल्या सुनेला स्वतःच्या मुलीपेक्षा दुय्यम स्थानावर का ठेवत असते हे सजून समजले नाही. आणि कधी कधी सूनही आपली आई आणि सासू यात सतत फरक आहे हे समजूनच सासरचा उंबरठा ओलांडते की, काय असा भास होतो. म्हणजे दोघी ही म्हणजे सासू आणि सून या दोघी ही बायकाच असून, या दोघी ही दुसऱ्या घरातून आलेल्या असतात. तरी त्यांना एकमेकांचं सुख-दुःख कळू नये. हा केवढा विरोधा भास आहे.
मी नेहमी म्हणतो की, या बायका डोंगराळ भागातील पाड्यावर राहणाऱ्या असो की, शेत मळ्यातल्या घरी, गावात असो की, शहरात यांना सकाळी घरातील पुरुष मंडळी उठण्याअगोदर उठाव लागतं. गावपातळीवर खेड्यात असेल तरी, ही दळण-कांडन, सडा-सामार्जन करावाच लागतं. आणि दिवस भर कष्ट करून मुलं-बाळ, घरातील म्हाताऱ्या मंडळींचं दवा-पाणी करून, घरातील आवरा आवर आणि सर्व मंडळी झोपल्यावर ती अंथरुणावर आडवी होते. दिवसात ही बाई किती वेळ खाली वाकते आणि किती वेळ उभी राहते याचे गिनती नाही. तिच कष्ट कोणत्याच परिमाणात बसत नाहीत. तरी ही तिची घरात किंमत काय असते. हे मी, आपल्याला सांगायलाच हवं का? ही बाई (स्त्री) एक इतर माणसांसारखीच माणूस आहे. आपल्याला जसा थकवा येतो तसा तिला ही येत नसेल का? पण ही सासुरवाशीण असताना बिचारी विना तक्रारार सर्व सहन करत असते, पण तीच एकदा का सासू झाली की, लगेच आपल्याच मुलांसाठी लग्न करून आणलेल्या सुनेला, जस काही ती लगेच घराबाहेर पळवून नेते की, काय या अविर्भावात सुनेशी दोन हात करण्यासाठी सज्ज होते. मुलांच्या लग्नानंतर सुरुवातीचे चार-सहा महिने कोड-कौतुक करण्यात जातात खरे पण ते फक्त काही क्लापुते असते. मग हळू हळू घरात वाद-विवाद, शंका-कुशंका, हेवे-दावे, छोट्या-मोठया कुरघोड्या सुरू होतात. कधी मिटतात तर कधी वादळी रूप धारण करून प्रकरण पार घटस्फोटा पर्यंतचा प्रवास करत जातात. पण, यात या बायका मग ती सून असेल किंवा सासू असेल, की, आपली आई असेल. पण ती बाई असते हे नक्की. या दोघींच्या भांडणात मुलाचं आणि मुलाच्या बापाचं मधल्या-मध्ये पार सँडविच होत. दोघांच्या (बाप-लेकाच्या) बायका एवढ्या जीव खाऊन भांडत असतात की, या अग्नी दिव्यात मुलाला आणि बापाला पडावचं लागतं. आणि दोघांना ही आपण या संसाररुपी सागरातील नौका तारू शकत नाही ही खात्री होते. आणि ही डोलायमान झालेली नौका घटस्फोटाच्या किनाऱ्यावर जाऊन आढळून आपटून फुटते. कोणत्या तरी, एक बाईचा विजय होतो, आणि एक बाई हारते. पण एवढं सर्व होऊन हारते ती फक्त बाई आणि कोणा कडून हारते ती ही एका आई कडून म्हणजेच एका बाईकडूनच. हे वर्षानुवर्षे चाललेलं महा युद्ध, महाभारताच युद्ध संपलं. त्याच्या पुराण कथा झाल्या पण, बायका-बायकांचं अनंत काळापासून सुरू असलेलं सासू-सुनेच वैर अजून ही संपलेलं दिसतं नाही. ते कधी संपेल का?...... की, असच पुढेही सुरू राहील........ हा येणारा काळच ठरविलं....... आपण विज्ञान युगात आलो.... लोक चंद्र मंगळावर निघाली. काही म्हणतात ती जाऊन आली. आता विज्ञान युगात हाताने काम करण्याची सवय कमी झाली. माणूस यंत्राच्या सहाय्याने काम करू लागला, पण वृत्तीत काहीच बदल झाला नाही. कोणतही शिक्षण, सुसंस्कार किंवा संस्कृती यांच्यावर परिणाम करू शकली नाही. उलट संस्कार आणि सांस्कृतिक वारसा सणवार बायकांनीच जास्त जपले ते वाढवले, पण त्यातून त्या स्वतः काहीच शिकल्या आहेत असं वाटतं नाही. ठीक आहे. टाळी एका हाताने वाजत नाहीं. पण कधी तरी सासूने सुनेला लेक म्हणून सुनेचे अपराध पोटात घालून तर, कधी सुनेला सासूला आपली आई समजलं तर, सासू-सुनेच कौटुंबिक वादळ थांबेल आणि आपल्याच मुलां-बाळांचे आणि पर्यायाने आपले संसाररुपी नौका सुखानं प्रवास करेल. असं वाटतं. आनंद घेतला तर, मिळेल असं तू तू मै मै करून काहीच मिळणार नाही. नाही तर वृद्धाश्रम आपली वाट पाहत आहेतच काळजी नसावी.
लेखक-राजेश साबळे ओतूरकर,
उल्हासनगर (ठाणे)
मोबा-९००४६७४२६३ Read less