Rajesh Sabale

Drama

3  

Rajesh Sabale

Drama

*कुटुंब*

*कुटुंब*

7 mins
254


माझे एक नातेवाईक आहेत. तसं पाहिलं तर त्यांनी त्यांच्या बालपणापासून खूप हाल आणि कष्ट घेतले आहेत.

चार पाच भाऊ दोन बहिणी असं ते कुटुंबं.. अतिशय गरिबीची स्थिती... घरात एवढे लोक पण जमीन एक एकरपण नाही...मग उदरनिर्वाह कसा होणार...मोलमजुरी करून पोट भरायचं... त्यांना जसं जसं कळू लागलं. की एकत्र इथं सुधारणा होणार नाही...मग गावात आपलं भागणार नाही. उद्या लग्न करायचं म्हटलं तर, मुलगी कोणी देणार नाही.

म्हणून त्यातल्या एकाने सरळ मुंबई गाठली. रस्त्यावर पोत अंथरून शहरात भाजी मार्केटच्या आजूबाजूच्या फूट पाठवर लिंबे विकू लागला..... रोज सरकारी यंत्रनेचा त्रास होई...

एकद दिवस काय झालं...त्यांला गावच्या एका व्यापारी माणसाने पाहिले... हा मुलगा आपल्या गावातील आहे.... हे ओळखलं...

त्यांनी त्याला घरी नेले.. असा रस्त्यावर बसून धंदा करू नको लोक त्रास देतील...ही रोजची कटकट करण्यापेक्षा तू माझ्याकडे काम कर मी तुला पगार देईल आणि राहण्याची सोय होईल..म्हणाले..

त्यामुळे आता त्याची राहणे जेवणे झोपणे यहा प्रश्न सुटला..आणि रोजच्या कामाचे चार पैसे गाठीला येऊ लागले..

काही दिवसाने तिथेच एक छोटासा भाड्याने गाळा (दुकान) घेतला...

पुढे त्याने एकेका भावाला म्हणजे घरातल्या व्यक्ती शहरात आणले..

काही वर्षांनी गावाला जमीन घेतली..मोठा आणि लहान भावाला जमीन करायला दिली...

इथेही शहरात स्वतःचा. लिंबाचा धंदा सुरु झाला.. बाकीच्या दोन भावांना भाजीचा धंदा सुरु करून दिला..

पुढे यांना चांगले दिवस आले.. सर्वांची लग्ने झाली मुलबाळं झाली.. मुलेही चांगली शिकली मोठी झाली.. सर्व घरातील मंडळी व्यापारात उतरवली..... इंजिअर, वकील असलेल्या मुला मुलींना आणि सुनाना घरातच काम मिळाले घरात नोकर चाकर आले..

दोन भावाकडे शेती सोपवली.. इथेही टोघांचं सर्व छान. होतं...मुलही मोठी झाली. पुढे काही दिवसांनी हॉटेल टाकले आणि भरभराट झाली....

पण.. नंतर पुढे भावात आणि मुलांमध्ये वैर नको म्हणून पाच ही बंधू वेगळे निघाले.... संपत्तीचे वाटप झाले...घरं जमीन, दुकान हॉटेल यांचे वाटप झाले आणि घरात झगडे सुरु झाले...

ज्याने सर्वाना एकत्रित सांभाळले त्याने सर्व माये आपुलकीच्या नात्याने केले...घरात व्यवहारी म्हणून आणि समाजात मान यामुळे मोठ्या लोकात उठबस सुरु झाली.....

पण हे सर्व करीत असतांना त्यांचा लहान भाऊ पैशाचा व्यवहार पाही कारण त्यांच्या घरात पहिला जुनी अकरावी पास झालेला असल्याने लिखापढी. त्याच्याकडे होती.... मग काही वस्तू किंवा जमीन घेताना ते आपला भाऊ शिकलेला आपण अडाणी....व्यवहार होतं गेले.. भावावर जबरदस्त विश्वास त्यामुळे.. जागी जमीन घेणे..आणि शहरात दुकान.. भाजीचा धंदा ही तेजीत होता.....

जे व्यवहार होतं ती कोणाच्या नावे करायची हे निर्णय लहान भावावर सोपवले.. त्यात एक भाऊ व्यसनाधीन झाला होता.... पण त्याचा घरात काहीच त्रास नव्हता...

आता तर, वेगळे निघाले होते मग कर्त्या माणसाच्या घरात झगडे का? हा प्रश्न आपला पडतो... अगदी बरोबर... आहे...तर मुलांचे म्हणणं असं की, तुम्ही हे सर्व कमवलं पण जे विकत घेतलं ते सर्व कोणाच्या नावे आहे.. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या नावावर काय आहे... घरासाठी करतो म्हणता ना मग आता हे सर्व तुमच्या भावांच्या आणि त्यांच्या पोरांच्या नावावर आहे..भावांच्या आणि त्याच्या मुलांच्या नावावर खरेदी केलेली इस्टेट तुम्हाला वाटपात तुम्हाला कशी. मिळणार...?

आता आम्ही त्यांच्याकडे नोकरी करायची का? की, भीक मागायची.... आता काय करायचं या वयात कोर्ट कचेऱ्या करणार का?

हा मोठा प्रश्न आज होता ज्यांच्या समोर आज पर्यंत कोणीही तोंड उघडले. नव्हते..पण त्यांचाच मुलगा बापाला प्रश्न विचारीत होता.. तो ही खूप संतापला होता....तो रागाने म्हणाला "आता मी हे मामाला सांगणार"..

कारण तुम्ही मामाचा अनेक वेळा अपमान केला.. त्यांनी तुम्हाला वेळीच सावध व्हा असं असं सांगूनही... तू आमच्या भानगडीत पडू नकोस असं मामाला तुम्ही म्हणाला...

एकदा तर.. मामा तुम्हाला म्हणाले..

"मेव्हणे तुमचा बघण्याचा चष्मा बदला आता..".

जर, जग कुठे चाललंय ते बघा.. कोणी कोणाचं नसतं... पुढे अडचणी येतील...

तर, तुम्ही त्यालाच नको नको ते बोलून गेलात...आमचं घर फोडायला निघालास...स्वतः सुट्टीत सासर वाडीला राहतोस आणि मला शिकवतोस.. का? तुझा एक भाऊ दारू पिऊन पडतो ते बघ... घरची टिचभर जमीन... तुझी भावजय चार वेळा इकडून तिकडे ओढते... तुझ्या भावाच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी मी पैसे दिले होते... ते तरी, तुझ्या भावाने दिले का? आरे तुझे गावाचे दोन भाऊ भावजय रोज भांडतात त्यांचं मिटवं अगोदर....त्यासाठी मलाच बोलावता.. ना? 

माझे भाऊ, माझं घर मोठं कुटुंबं मी कसं सांभाळतो आहे... लोक मला मान देतात.. लग्ना कार्यात आवर्जून बोलावतात...समाजात माझा मान आहे.. 

तेंव्हा मामा तुम्हाला म्हणाला होता...

"लई गप्पा मारू नका. तुम्ही हजारोने देणग्या देता...म्हणून तुम्हाला लोक इज्जत देतात.. लोक तुम्हाला नाही तुमच्या पैशाला सलाम करतात...

तेंव्हा तर, तुम्ही मामाच्या मित्रा समोर मामांना घरातून निघ. म्हणाला...

"मग आता का असं झालं... मामाने तर, त्यांच्या भावात भांडणं नको म्हणून वेगळं करून दिलं त्यांचं ते बघतील ना? पण मामा सुट्टीत सासुरवाडीला राहतो... हे तुम्हाला दिसलं पण का राहतो ते नाही दिसलं..."

त्याच्या एवढा त्याग तुमचा कोणता भाऊ करणार आहे... ते सांगा.. उगाच मी केलं... केलं म्हणू नका... "

म्हणे मामाला सांगू नको...

आया फारच गुंता झाला होता.. म्हणून त्यांच्याच एका भावाला आणि मुलांना दया आली आणि एक हॉटेल यांच्या मुलाला मिळालं त्या बदल्यात दुसरं हॉटेल भावाच्या मुलाला काढून द्यावं असं ठरलं पण मध्ये अट आलीच..आनंद या गोष्टीचा होता की, वीस बावीस वर्षे ज्याने नेटाने हॉटेल चालविले ते त्याच्याकडेच राहिले... 

त्याचं कारण ही तसंच होतं..त्यांचा ही जो भाऊ व्यसनी होता त्याच शिक्षण नव्हतं... पण व्यवहारी होता. त्यात त्याला पाच मुली दोन मुलं...होती आणि एकत्र कुटुंबात असतांना अचानक काय झालं कळलं नाही.. त्याच्या भावाची बायको देवा घरी गेली... आणि ही सर्व भावाची मुलं सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली...

पुन्हा त्याचं दुसरं लग्न यांनीच करून दिलं.. आता तिला ही एक मूल आहे पण ते ही गतिमंद...

भावाच्या पहिल्या बायकोपासून झालेली सहा सात मुलं यांच्याकडे राहिली... आता सर्व मुलींची लग्न झाली... ती ही यांनीच केली.. आता त्यांचं माहेरपण यांच्याकडेच... त्यामुळे ज्यांनी हे सर्व उभे केलं त्याच्या घरात भांडणं हे त्या भावाच्या मुला मुलींना पटलं नाही... आपली आई नाही.. बापाने दुसरे लग्न केले... आपल्यासाठी ज्यांनी केलं त्यांच्या घरात वाद... हे त्या भावालाही पटले नाही त्याने इतर भावांना समजून पाहिलं पण उपयोग शून्य...म्हणून त्यानेच पुढाकार घेतला आणि एक हॉटेल त्यांनी स्वखुशीने यांचा मुलाला दिलं..

माणुस खूप चांगला पण माझ्याशिवाय हे घर चालणार नाही हा समज आणि याचाच फायदा हळूहळू बाकीचे घेत होते. हे त्यांना भावनेच्या भरात आणि मोठेपणाच्या हव्यासापोटी कळले नाही..त्यांची वाढलेली सामाजिक प्रतिष्ठा पाहून सर्व गप्प होते.. पण आतून कारस्थान सुरु होतं.. हे त्यांना कळलंच नाही...

आता खूप छान आहे पण वय झालं...तरी, त्या हॉटेलवर रोज नऊ वाजता जाणार... दिवसभर तिथंच राहून काय चाललंय यावर लक्ष ठेवणार..

नोकर चाकर लोकांना स्वभावनुसार पटकन काही तरी बोलणार.. त्यातून वाद होणार...

मुलांना वाटते बापाने आता आई सोबत देव धर्म तीर्थ यात्रा करीत वेळ घालवावा.. आम्हांला आमच्या प्रमाणे काम करू द्यावे.. पण मूळ स्वभाव जात नाही..

मध्यंतरी एकदा सर्व शांत झाल्यावर मला फोन आला.. म्हणाले..

"मास्तर कुठं आहेस.. गावी की, कुठल्या कार्यक्रमात"

"मी म्हटलं घरीच आहे."

मग म्हणाले आम्ही दोन तीन दिवस गावी जाणार आहोत तू ही चलं इथं काय करतो घरात बसून.. "

मी, म्हटलं..

"आम्ही म्हणजे कोण कोण... एवढी गाडीत जागा आहे का?

तर उत्तर आलं..

" मी, तुझी बहीण आणि ड्रायव्हर..."

मी मनात म्हटलं नामी संधी आहे.. मोकळं बोलता येईल कारण बहिणीच्या मुलाने मला सर्व अगोदर सांगतलेलं होतं....

दोन तीन दिवसात एकदा तरी हा विषय निघेलच...आणि तसंच झालं..

म्हणाले..

"मास्तर तू म्हणाला तसंच झालं रे.... "

"मी त्यांना खूप समजावून सांगितलं पण मी, लक्ष दिलं नाही तर, धंद्याची. वाट लागेल म्हणाले.....

" हे बघ अशा गाड्या घेतात.. खोल्या घेतात विकतात... मनाला वाटेल तसं करतात.. उद्या कर्ज बाजारी झाले तर?..

त्यांचं त्यांना करू दे..हा तुझा सल्ला मला मान्य नाही....

मी म्हटलं ठीक आहे..

"मग बसा भांडत..."

त्यांना असं वाटतं की, हे मी हे सर्व उभे केलं आहे आणि पोरांना काहीच अक्कल नाही....

त्यामुळे बापाला न सांगता मुलांनी आपली वेगवेगळी प्रॉपर्टी केली आहे.. हे त्यांना कोणीच सांगत नाही....

तेही स्वतःच्या अलिशान घरात राहतात.. कुठून कळलं तर, मला फोन करतात.. बघ मी काय म्हणालो होतो...

"उलट आता काय गरज होती." असं म्हणतात....

मी ही तुमच्याकडे त्यांनी पैसे मागितले काय? असं विचारतो.... आणि.. जाऊ द्या हो तुम्हाला सर्व मजेत ठेवतात ना मग दया सोडून उगाच वाद नको... जरा शांत रहा की... मला म्हणतात...

म्हणजे तुला सर्व माहित आहे....

मी, म्हटलं तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्हाला वाटतं तुमच्या शिवाय कुटुंबं चालणार नाही असं वाटतं ना..... मग त्यांची ते कुटुंबं सांभाळून तुम्हाला स्वतंत्र गाडी ड्रायव्हर सर्व बिनबोभाटा देतात ना....की काही कटकट करतात....

आणि मग उगीच हसल्यासारखं करतात... पण हेका सोडत नाहीत.. आणि मुलही त्यांच्या बोलण्याकडे आता फारसं लक्ष देत नाहीत....

स्वभावला काही औषधं नाही म्हणतात... काय करणार पण...महिन्यातून दोनतीन वेळा गावी जाणार.. लग्न कार्य, सामाजिक कार्य, देवादेव या भानगडीत रमलेले असतात.... मधूनच मलाही आता सोबत घेऊन जातात..

मी एकदा म्हटलं.

काय हो सध्या तुम्ही मला जास्त जवळ करता.. असं नाही वाटत.... तर..

म्हणतात....

"माझ्या मूळ तुझी खूप नुकसान झाली... आता मला हे कळलं आहे... तू म्हणत होता.. चष्मा बदला तेंव्हा कळलं नाही... तेंव्हा तुझ्याही घरात हेच होतं..मला वाटलं भाऊ आहे... खोटं करणार नाही... पण फसलो....तू लवकर शहाणा झालास बाबा... मला कळायला थोडा उशीर झाला.. पण तुलाही खूप रागावलो... तुझी बहीण सांगत होती... आपण तसं जग नसतं...तेंव्हा वाटलं तुझं चुकत आहे... 

त्यावेळी चूक झाली खरी पण.. आता काय?

बायकोचा भाऊ आहेस बाबा काय करणार... तुझी बहीण आहे म्हणून हे छान चाललंय... पोरं म्हणतात आईला घेऊन देवाला जाऊन जरा फिरून या छान वाटेल. इथं घरात तुम्ही चिडचिड करता..आणि रस्त्याने बोलायला तू बरा पडतो.. तुझी बहीण म्हणते पहिला मास्तरला फोन करा.. तो येत असेल तर, मी येते.. नाही तर. जा तो ड्रायव्हर आणि तुम्ही....

त्यांना आता हे सर्व मनातून पटलेलं आहे की, आपलं कुठं तरी चुकत आहे.. पण मन मनीत नाही...

माझ्याशिवाय काही ही होणार नाही आणि मी लक्ष दिलं नाही तर, मुलं सर्वांची वाट लावतील ही मन भीती.....

पण लोक त्यांना खूप मानतात... त्यांच्या शब्दाला अजूनही खूप किंमत आहे.. हे विशेष..... पण थोडा अहंकार आणि भ्रम आहे.. त्याला काय करणार... बहीण म्हणते हे असं आहे बाबा.. काय करतो किती सांगितलं तरी, ऐकत नाहीत... मग पोरं चिडतात...

मला म्हणतात तू समजून सांग तुझा नवरा आहे...आता या वयात मी काय सांगू.. माझं हा बाबा ऐकलं असं तुला वाटत का?..

...............................


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama