Rajesh Sabale

Horror

3  

Rajesh Sabale

Horror

अपघात

अपघात

2 mins
241


*माझ्या मित्राचे प्रसंगावधान*

आपला शेजारी कसा असावा याचे सुंदर उदाहरण आज या विषयाच्या निमित्ताने आपल्या समोर देत आहे..

सन ८ फेबुवारी १९९५ मधील ही सत्य घटना आहे..आमच्या मुंबई महानगरपालिका कला विभागाचा आर्टिस्ट कँम्प नाशिक येथे गेला होता. या कँम्प दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर असलेला सापुतारा येथील नयनरम्य परिसराचे निरीक्षण आणि चित्रण करून.. पुन्हा रात्रीच्या मुक्कामासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील अहिरावणीच्या गेस्ट हाऊस येण्यासाठी निघालो होतो...

त्या दिवशी चतुर्थी होती रात्री ९ च्या दरम्यान आमच्या लक्झरी बस दिंडोरी जवळील कादवा नदीत कोसळली...

अपघाताचे गांभीर्य पाहून आम्हाला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते..दोन लोक तर, जागेवरच गेले..अजून एक सिरीयस होता...बाकी सर्व जास्त मार आणि जखमी झाल्याने विव्हळत होते..त्यांना सलाईन, इंजक्शन दिली जात होती... मी कॉटवर बसलो होतो....मला पोहता येत असल्याने कमी मर लागला होता...म्हणून माझी पोलीस चौकशी सुरू होती...

मी, म्हटलं मला घरी फोन करायचा आहे...तर पोलीस म्हणाले..

तुमचा नंबर द्या आम्ही आमच्या पद्धतीने कळवतो..साहेब...

मी म्हटलं नाही..तुमचे लोक रात्रीचे घरी जातील दरवाजावर दंडा मारून घरातील लोकांना उठवतील...मग घरचे घाबरतील ना?..

बरं ठीक आहे म्हणाले पण साहेब हे प्रोसिजर आहे ...

दुसऱ्या दिवशी माझे शेजारी आणि माझी बायको दवाखान्यात दत्त म्हणून हजर...

मला थोडावेळ काहीच सुचेना हे कसं घडलं..

काय योगायोग बघा त्या दिवशी उठायला उशीर झाला म्हणून माझा शेजारी मित्र कामावर गेला नव्हता..त्यामुळे सकाळी सकाळी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे सकाळ पेपर येतो.. त्यात हेडिंगला बातमी होती..

मुंबई महानगरपालिकेच्या आर्टिस्ट कँम्पच्या लक्झरी नाशिक जवळ बसला मोठा अपघात..

मित्राने ही बातमी वाचल्यावर तो माझ्या घरी गेला आणि माझ्या पत्नीला म्हणाला..

साबळे ताई सर, नाशिकला गेले ना? 

पत्नी म्हणाली...

हो ..कालच...के हो काय झालं..

त्यावर मित्र म्हणाला..

कशी नाही.. तिकडं काही तरी गडबड झाली म्हणतात.. आणि सर लोकांना मदत करतात अशी बातमी पेपरमध्ये आली आहे..मी नाशिकला निघालो आहे..म्हटलं प्रत्येक्ष पाहून येतो...नाही तरी, आज कामाला जायला उशीर झाला.. माझी रजा झाली...तुम्ही येणार असलं तर चला!!...

मागचा पुढचा काही विचार न करता दोघेही निघाले...कल्याणला आले तर, नाशिक मार्गे जाणारी एक जलद गाडी आली...दोघेही तिकीट न काढताच सैनिकांच्या डब्ब्यात घाई घाईत चढले...

खूप गोंधळ झाला होता पण.. पेपरची बातमी दाखवून वेळ निभावून नेली..आणि आता ते दोघेही माझ्या समोर उभे होते...

याला म्हणतात अक्कल हुशारी... शेजारी असून केलेली मदत पैशापेक्षा किती तरी, लाख मोलाची होती..हे मी कधीच विसरू शकत नाही..प्रसंगावधान राखून मार्ग कसा काढावा... हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.. बरं हे मित्र म्हणजे ...ते ना माझ्या गावचे... ना माझ्या नात्याचे..फक्त शेजारी म्हणून ओळख...जे इतरांना सुचलं नाही ते अतुलनीय धैर्य आणि प्रसंगाची व्यप्ती पाहून घेतलेला जलद निर्णय.. हे ऐन वेळी सुचायला हवं ना!!!....


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror