Sagar Jadhav

Horror

4.0  

Sagar Jadhav

Horror

निरागस बळी

निरागस बळी

8 mins
1.1K


नमस्कार...


माझे नाव सागर जाधव असून मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती सत्य कथा आहे आणि गेल्या काही वर्षापूर्वी आमच्या ओळखीच्या लोकांसोबत घडली आहे. 


काही कारणांमुळे मी प्रत्यक्ष पात्रांचे आणि स्थळांचे नाव बदलंत आहे कारण आजच्या परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर सगळेच ॲक्टिव आहेत आणि माझी कोणाच्या भावना दुखावण्याची अजिबात इच्छा नाही.


"निरागस बळी"


निखिल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ...या चौघी भावंडांचा जन्म खेड्यागावात झालेला आणि सोबत शिक्षणही त्याच गावात झालेलं कारण परिस्थिती थोडी नाजुकच होती अस पण म्हणू शकता. सर्व काही सुरळीत चालू होते, आई वडील शेती काम करायचे सोबत हे भावंडं पण त्यांना मदत करायचे. निखिल शिक्षण करत करत घरकामात ही हातभार लावायचा. काही दिवसांनी निखिलच शिक्षण पूर्ण झाले तो पर्यंत त्याच्या तिघी बहिनींच लग्न ही झाले आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याची जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला. कालांतराने त्याचे आई वडील पण त्याच्यासोबत शहरात येऊन राहू लागले. 

निखिलच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत काम ही मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने रहात असलेल्या परिसरात स्वतःच घर देखील घेतल. सर्व काही व्यवस्थित सुरू होते, काही दिवसांनी निखीलचे लग्न झाले. निखिलला पत्नीही तशीच मिळाली चांगली देखणी, सुशिक्षित, मनमिळाऊ, सगळ्यांना सांभाळून घेणारी...


पण म्हणता ना ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी वाईट किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा शक्तींचा वावर असतो हे सिद्ध झाले कारण पुढे घडणाऱ्या घटनाच अशा होत्या की कोणाला विश्वास बसणार नाही तर कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही जसा निखिल आणि त्याच्या घरच्यांनी केला नव्हता.

जेव्हा निखिलचे आईवडील निखिलकडे शहरात राहण्यासाठी आले त्याच दरम्यान त्याचे काका - काकूपण त्यांच्यासोबत शहरात आलेले होते. ज्या वेळेस निखिलने घर घेतलं त्यावेळी त्याच्या बाजूच घर ही विक्री होत आणि कमी दरात असल्या कारणे त्याला एक कल्पना सुचली. पण त्याच्या त्या कल्पनेमागे कोणताही स्वार्थ लपलेला नव्हता हे मात्र नक्की...


निखिलने अगदी भोळ्या भाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काका - काकूंना सांगितले आणि जमेल ती कागदपत्रांची आणि कर्जाची मदत करून त्यांना ते घर मिळवून दिले...पण त्याला काय माहिती की तो त्याच्या काका - काकूंना जवळ आणून स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढवून घेत आहे ते...

विषय असा होता की निखिलची काकु ही तंत्रमंत्र आणि काळी विद्या करण्यात माहीर आहे. आणि त्याचे काकाही म्हणावे तसे मनमिळावू नाहीत आणि काकुही नाही. आणि या गोष्टी सर्व गावाला ही माहित आहे आणि निखिल आणि त्याच्या परिवारालाही...पण गावातले लोक भीतीपोटी या जोडप्यापासून आणि त्यांच्या मुलांपासून लांबच राहायचे आणि त्याची वाच्यता ही कोणाकडे नाही करायचे. पण जोपर्यंत आपण काही बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, निखिल आणि त्याच्या परिवाराला देखील असा काही अनुभव कधी आलेला नव्हता म्हणून त्यांनी ही या गोष्टी कधी मनावर नाही घेतल्या आणि घेतील पण कसे शेवटी सख्खे नातेवाईक होते ना... 

पण कस असत ना काही लोकांचं ? कोणाचं चांगलं होत असलेलं बघितल जात नाही मग ते परके असो किंवा सख्खे...


कमी कालावधीत तिघी बहिणींचे चांगल्या ठिकाणी लग्न, मुलाचे चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं, सोबतच स्वतःच्या चांगल्या संपर्कामुळे लोकांना मदत करणे जशी निखिलने त्याच्या काकांना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्याच्या मदती खाली दाबले गेलो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या काका - काकूला खटकत असत...


निखिल आणि रोहिनीच्या लग्नाला बरेच महिने झाले होते. पण अजून पर्यंत त्यांना संतान सुख प्राप्त नव्हतं झालेलं...ते डॉक्टरांकडून उपचार ही घेत होते, कोणी सांगितल्याप्रमाणे देव धर्म ही करत होते पण कुठेच काही टाळा बसत नव्हता. शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मूलबाळ नाही ही गोष्ट मान्य केली. पण त्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे रोहिणी ही शिकलेली तर होतीच पण खूप समजूतदार ही होती. तिला माहित होत की आपल्या इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर अस एकट रहाण्यापेक्षा कुठे तरी गुंतून रहावं कारण म्हणता ना "खाली दिमाग शैतान का घर होता हे !" म्हणून तिने पण नोकरी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून स्वतः पण तिथे कामात व्यस्त राहील आणि नवऱ्याला ही तेवढाच पैशांचा हाथ भार लागेल. आणि तिने ही नोकरी सुरू केली.

दोघेही नोकरी करायला लागले आणि असेच बरेचसे दिवस निघून गेले. काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली ती म्हणजे अशी की रोहिणीच्या बहिणीने स्वतःची मुलगी रोहिनीला दत्तक देऊ केली आणि या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता आणि निखिल आणि रोहिणीनेही पटकन हो म्हणून टाकले कारण हे सर्व व्हायच्या आधी त्यांच्या मनात अशीही कल्पना आली होती की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ. आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळणार होत. घरात सर्वजण एका चिमुकलीच्या येण्याने आनंदी होते. 


काही दिवसांनी कायदेशीररीत्या दत्तक विधी पार पडला. त्यांनी मुलीचं नाव "परी" ठेवलं कारण होतीच ती परीसारखी खूप सुंदर - देखणी - सर्वांना आवडणारी. सगळ सुरळीत झालं नंतर रोहिणीने आपल्या मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून काम पण सोडले आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली आणि असेच बरेच महिने लोटले गेले. परी थोडी मोठी झाली. चालायला - बोलायला लागली, हुशार पण तेवढी होती ती, तिला बऱ्याच गोष्टी समजायला ही लागल्या होत्या. एकुलती एक असल्याने सगळ्यांचा काळजाचा तुकडा बनली होती परी...

पण एके दिवशी अचानक परीची तब्येत बिघडली, आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये ये भीतीने निखिल आणि रोहिणीने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात तिचा इलाज सुरू केला. पण जर आजार हा दवाखान्यापुरता मर्यादित असेल तर तो तिथेच बरा होतो. एवढं सगळं करून पण परिची तब्येत सुधारण्याच नावच नव्हती घेत. ज्याला कोणाला ही बातमी मिळत होती तो त्या पद्धतीने परीच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. असा दवाखान्याचा खेळ बराच दिवस चालू राहिला. आणि एके दिवशी परीच्या तोंडून नवीन बाब ऐकायला मिळाली...ती म्हणजे..."ते बघा...समोर तीन बाया (स्त्रिया) उभ्या आहेत आणि त्या मला त्यांच्याकडे बोलावत आहे..." हे ऐकून परीच्या आजी बाबांना धक्का बसला आणि त्यांना थोडी त्याविषयची कल्पना ही आली कारण ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला जोड मिळते विज्ञानाची... आणि मी एक गोष्ट इथेच क्लिअर करतो की मी कुठल्याही प्रकारचा विज्ञान विरोधी नाही आहे...पण एक सांगेन जेवढं तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवता तेवढा नाहीपन थोडातरी विश्वास अध्यात्म आणि या "Supernatural" गोष्टीवर ठेवावा अस माझं वैयक्तिक मत आहे...असो तो ज्याचा त्याचा प्रश्न... 


जी काही कल्पना निखिलच्या आईवडिलांना आली होती ती त्यांनी निखिल आणि रोहिणीला बोलून दाखवली पण विज्ञानवादी युगात त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला देखील तेवढाच वेळ लागतो पण तरीही आईवडिलांची परी विषयी काळजी आणि जुने मतप्रवाह यामुळे निखिलने त्यांना त्यांच्या पद्धतीने परीवर उपचार करण्याचा विश्वास दिला पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊ आणि तरीही काही फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू.


झालं...आता काय बोलणार...? असा प्रश्न परीच्या आजी बाबांना पडला पण ते हार मानणारे नव्हतेच त्यांनी बऱ्याच लोकांना या विषयी विचारले त्या लोकांनी सांगितले त्या ठिकाणी गेले कारण परिस्थितीच तशी होऊन गेली होती. परीला त्या तीन बाया (स्त्रिया) सतत दिसायच्या, हसायच्या तिला सोबत बोलावण्याच्या खुणा करायच्या हे सर्व ती इवलिशी पोर घाबरून रडून सांगायची पण ती आजारी असल्यामुळे तिला भास होत असेल अशी डॉक्टरी पट्टीच जणू निखिलच्या डोळ्यांवर बसली होती...आणि असेच परत दिवसामागून दिवस निघत होते पण यात एक गोष्ट होती ती त्या तीन बाया (स्त्रिया) परीला कुठेपण दिसू लागल्या पण शेवटी शहर गावात म्हातारे आजी बाबाही कुठे फिरतील अशा गोष्टींचा माग काढण्यासाठी... आणि मग एके दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना या गोष्टीची उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका दृष्ट व्यक्तीच्या वाईट हेतूने ग्रासले आहे आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू किंवा करणी असा प्रकार केला आहे, हे ऐकून आजी बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि शिवाय त्यांनी हे पण सांगितले की आता याला खूप उशीर झाला आहे तुम्ही जेवढ्या लवकर तिला एखाद्या सिद्ध माणसांकडून किंवा एखाद्या सिद्ध देवाच्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार सुरू करणार तेवढे तिला वाचवण्याची तुम्हाला संधी मिळेल... आता यात एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की एवढ्याशा मुलीवर असा प्रकार कोणी केला असेल ? पण यात एक गोष्ट अशी असते की जो व्यक्तीकडे आपल्याकडे याच कोड उलगडतो तो व्यक्ती त्या समोरील तांत्रिकाच नाव कोणत्याही सबबीवर आणि त्याला देऊ केलेल्या अमिषावर सांगत नाही...आता या मागे पण अनेक बाबी आहेत...


उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजी आजोबा कसले ? आणि परीची अवस्था बघून निखिलला ही आता या गोष्टींची जाणीव व्हायला लागली आणि त्यानेंही आई वडील म्हणतील तसे उपाय करायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट चुकीची अशी की ते त्यांचं दुर्दैव म्हणता येईल की त्यांना सुरुवातीला ढोंगी किंवा चंगळ मंगळ व्यक्तींचा पत्ता भेटू लागला आणि असे कित्येक उपाय करून पण काहीच फरक परीमध्ये जाणवत नव्हता. आणि अस करता करता पण अजून थोडे दिवस निघून गेले. माझी आजी, माझी आई आणि आमचा पूर्ण परिवार महानुभाव पंथाचे दैवत श्री चक्रधर स्वामी थोडक्यात भगवान श्रीकृष्णची भक्ती करतो त्यात माझी आजी आणि आई यांचा खूप निस्सीम भक्ती आहे कारण त्या देवाने आम्हाला अनेक संकटातून वाचवले आहे आणि अजून पण वाचवतोच आहे. आम्ही पण त्या पीडित परिवाराला चाळीसगाव तालुक्यातील कनाशी या गावी जाऊन प्रभू श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात जाण्यास सांगितले होते कारण त्या ठिकाणी कोणीही तांत्रिक किंवा मांत्रिक नाही, तिथे अक्षरशः देव स्वतः अशा अनेक रुग्णांना बरा करतो पण त्यांना काय वाटले त्यांना माहीत त्यांनी जणू कानाडोळा केला किंवा त्यांना देवापेक्षा मंत्रिकावर जास्त विश्वास बसला म्हणून गेले नाही...असो जे कारण असेल ते...आमचं काम होत सांगायचं आम्ही सांगितलं...पण हे सत्र असच सुरू होत परीला आता त्या तीन स्त्रिया अगदी जवळ दिसू लागल्या होत्या.


आणि एवढ्या दिवसात अनेक तांत्रिक मांत्रिक कडून होत असलेल्या इलाजाचा काहीही फायदा होत नाही हे आता निखिलच्या परिवाराने जाणल होत...शेवटी त्यांना कोणाकडून तरी गाणगापूर देवस्थानची माहिती मिळाली आणि त्यांनी गाणगापूरला निघण्याची तयारी केली. थोडक्यात काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितलेल्या स्थळी जरी ते जात नसले तरी ते त्याच देवाच्या चरणी जात होते हे ऐकून आम्हाला बरेही वाटले आणि परी आता नक्की बरी होईल हे पण आम्ही बोलू लागलो...


पण नियतीच्या मनात काही वेगळच होत...रस्त्याने जात असताना परीला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिला जवळ बोलावत होत्या आणि परी ते तिच्या घरच्यांना बोलून पण दाखवत होती की त्या मला बोलावत आहे अस...आणि मध्येच...कोणालातरी टॉयलेट लागल्या कारणे गाडी थांबवण्यात आली, आणि जे नको घडायला होत ते घडलं...नेहमी लक्षात असू द्या अशावेळी पीडित व्यक्तीला कुठेही देवस्थानात घेऊन जात असताना मध्ये कुठेच थांबत नाही खुद्द त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं तरी रस्त्यात कुठेही गाडी थांबवून त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाही. 


आणि अचानक परीची खूप तब्येत बिघडली तिची ती अवस्था बघून तिला वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाडीदेखील वापस फिरवण्यात आली परत आपल्या शहराच्या दिशेने...पण जणू त्या तिघीजण त्या दिवशी परीला कायमचच न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं काम पार पाडलं. शहराच्या दिशेने वापस येत असताना जास्त तब्येत खराब झाल्याने रस्त्यातच त्या कोवळ्या लेकराची प्राणज्योत मालवली. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं...आणि परी त्यांना कायमची सोडून देवाकडे गेली...


परीच्या जाण्याचं दुःख एवढं तीव्र होत की रोहिणी त्याला सहन नाही करू शकली आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहिली परीचा फोटो उराशी घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन...


अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळजीपोटी म्हणा किंवा भीतीपोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याची सहसा कोणी हिम्मत करत नाही आणि तेच निखिल आणि त्याच्या परिवाराने केले.


कृपया कथा शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करा.

सागर जाधव 



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror