डिप्रेशन नावाचा राक्षस
डिप्रेशन नावाचा राक्षस


मी प्रत्येक वेळा म्हणतो नका हरु Depression ला त्यावर इलाज आहे.. बोला मन मोकळं लोकांशी.. सांगा तुम्ही त्रासात आहेत.. आयुष्याला हरण्यापेक्षा आयुष्यात लढलेला व्यक्ती जास्त लक्षात राहतो.. मी स्वतः आता depression मधून बाहेर आलोय/येतोय.. माझी फॅमिली माझे friend's कायम माझ्या सोबत होते.. शरीर आजारी पडत तस मन आजारी पडू शकत त्यासाठी हॉस्पिटल आहेत डॉक्टर आहेत आणि तुम्ही मनातून आजारी आहेत हे सांगणं म्हणजे तुम्ही वेडे आहेत असं होत नाही.... लपवून ठेऊ नका काहीच मनमोकळं बोला.. कोणीच तुम्हाला Judge नाही करणार कधीच.. पण suicide नका करू.. जी गोष्ट आज नाही उद्या असेल उद्या नाही परवा असेल आणि नसली तर काय फरक पडतो तुम्ही लढताय हे खूप मोठं आहे. जगात कोणीच उपाशी राहत नाही.. फक्त आयुष्याला हारू नका . तुमच्यात जग जिंकायची ताकद असते.. फक्त ती ओळखा.. जवळच्या लोकांच्या हालचाली ओळखा.. त्यांचा मजाक उडवण्यापेक्षा समजून घ्या सांगा.. Mental health is important.. Don't ignore...