अलक
अलक


त्याच्याच हायस्कूल मधे स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून तो स्टेजवर खुर्चीत स्थानापन्न झाला होता . एक यशस्वी उद्योजक म्हणून त्याची ओळख करून देण्यात आली. स्टेजवरून त्याची नजर मात्र शाळेतल्या त्याच्या वर्गशिक्षकांना शोधत होती.
कार्यक्रम संपल्यानंतर त्याने त्याच्या त्या वर्गशिक्षकांना शोधले आणि नमस्कार करतं लास्ट बेंचर्स अशी आठवण करुन दिली.