किशोर राजवर्धन

Inspirational

1.0  

किशोर राजवर्धन

Inspirational

गुलाबाचं आत्मवृत्त

गुलाबाचं आत्मवृत्त

4 mins
1.9K


मुखपृष्ठ

गुलाबाचं आत्मवृत्त

© प्रकाशक । लेखक । किशोर राजवर्धन

मुखपृष्ठ । माडंणी । किशोर राजवर्धन


ही कथा काल्पनिक असून निवळ साहित्याचा आनंद घेण्याकरिता लिहिली आहे.

या लेखातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.

मी गुलाब, मला तुम्ही अनेक रंगांनी आणि नावाने ओळखता. मी एका घराच्या अंगणात जन्मलो. तिथे माझ्या प्रमाणे वेगवेगळ्यारंगानी उघळून द्यावी तशी अनेक रंगीबेरंगी फुलं माझ्या सोबतीत वाढली. त्या घरचा माळी आमच्यावर खुप प्रेम करायचा. काही लागलं किंवा दुखलं , कोणत्या रोपट्याला किड लागू नये म्हणून दररोज आमची काळजी घ्याचा. पण जेव्हा मी मोठा झालो तेव्हा एक दिवस घरातल्या तरुन मुलाने मी सुदंर हँडस्म दिसलो म्हणून मला त्या रोपट्याच्या फांदीवरुन तोडलं मला खुप दु:खावले गेले. मी स्व:तावर खुप खुष होत. तसं मला ही रोपट्याच्या फांदीवर दररोज माशांच्या आणि किटकांचा त्रास येऊ लागला होता. मला वाटलं हा मला चागंल्या ठिकाणी नेईल. पण त्याने मला एका मुलीला प्रेझेंट केलं. बहुतेक ति त्याची मैत्रिण किंवा प्रियसी असावी . तिने तिच्या लाल-लाल ओठांनी मला स्पर्श केला ते ओठ होते की, लाल राक्षसाचा जबडा मला सोडता-सोडत नव्हता. तिने मला तिच्या घरी नेले आणि तिच्या बेडवर जोरात भिरकावुन दिले. सुदैवाने मला काही दु:खापत झाली नाही.

थोड्या वेळाने तिने माझ्या अंगावर प्रेमळ हात फिरवत माझी पाने तोडून मला विवस्त्र केलं आणि तिच्या लांब काळ्या केसात माळलं. रस्त्याने जाताना जोराचा वारा सुटला आणि मी तिच्या केसातुन खाली कोसळलो मला वाटल ती मला पुन्हा उचलून केसात माळेलं. पण तिच लक्षात किंवा आठवणीत नसल्यामुळे ती मला मध्येच सोडून गेली. मी जिथे पडलो तिथला परिसर फुलांनी आणि झाडांच्या हिरवळीने सुंदर भासत होता. ते सार्वजनिक उद्यान आसावे. मध्ये मुलांच्या खेळाची ,त्यांचे आई-वडील त्यांना खेळायला प्रोत्साहन आवज येत होते. उद्यानाच्या कोप-यात आजुबाजुला बँच वर लोक गाप्पा-गोष्टी करत होते. कोणचही माझ्या कडे लक्ष नव्हतं…काही वेळाने रस्त्या एक लहान मुलगा खेळता खेळता माझ्या पर्यंत येऊन पोहचला. त्याने मला पाहिलं इकडे-तिकडे पाहुन, माझ्याकडे कुतुहल पणे पाहत निरिक्षण करण्यासाठी मला उचलू हातात घेतलं. मला वाटलं तिने विवस्त्र केल हा तरी माझी काळजी घेईल आणि तसं पण रस्त्यावरची फुले मला हासतील त्यापेक्षा ह्याने उचल्ल ते बरच झालं नाही तर रस्त्यावरच्या चालणा-या लोकांच्या पायाखालीच माझा आता अंत होतो की काय? अस वाटत होत. त्याने मला स्वत:च्या पँटच्या खिशात कोंबल त्यात इतक गरम होत होतं की, मला खुम गुदमल्यासारखं वाटू लागलं. अचानक त्याची पँट ओली झाली. मला वाटलं पाऊस आला की काय ? पण पावसाचे पाणी तर थंड गार असतं असा माझा आजपर्यंतचा अनुभव होता. हे तर गरम होतं. काय कुणास ठाऊक त्याने काय केलं होत नंतर तो रडू लागला त्याने खिशातुन मला बाहेर काढलं तर तो स्व:ताच विवस्त्र होऊन एका रस्त्या बसला होता. पुन्हा त्या बालिश मुलाने मला आपल्या निरागस हाताने वर घेतलं आणि माझी एक-एक पाकळी तोडू लागला. माझ प्रत्येक अवयव तोडताना मी निशब्ध होऊन विहाळत होतो. इतक्यात त्याची मॉम त्याला ओरडली आणि मला त्याच्या हातातुन घेऊन दुर फेकून दिलं. मी आधी विवस्त्र झालो नंतर जखमी. मला जेथे फेकून दिलं तेथे खुप वेग-वेगळ्या रंगाची, आकाराची , सुगंधची फुलं होती. ति माझ्या या अवस्थेवर हसत होती. तिथुन एक माळी आला. त्याने मला आपल्या एका लांब रेषांच्या काड्यांनी ओढुन माझ्या सोबत आजुबाजुच्या झाडांवरुन निर्जीव झालेल्या आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटक मोजत असलेल्या फुलांना आणि पानांनना एका भल्यामोठ्या डब्यात उचलून टाकूल दिलं. त्यात सर्व माझ्या दु:खाशी सम दु:खी असणारे सवंगडी जणू मला भेटले होते. थोड्यावेळाने आमच्या मधल्या सुगंधी फुलांवर माशांचे थवे येवून आमच्यातले उरले सुरलेले प्राण पिऊन घेत होते. काहीनी हळू-हळू आपला श्वास सोडला मी मिन-मिनत्या डोळ्यांनी त्यांचे प्राण जाताना पाहत होतो. मी त्यांची किंवा स्व:ताची कोणतीही मदत करु शकत नव्हतो. काही तासांनतर तो डबा हालला तशा माश्यांनी पळ काढला. जोराचा वारा सुटला होता. डबा त्या सोबत जणू डुलत होता. थोड्याच मिनिटांनी त्या डब्यातुन आम्हा सर्वांना एका तलावात सोडलं. मी थोडा मुर्छित झालो. मला जाग आली तेव्हा माझ्या सोबत असणा-यानी शेवटचा श्वास घेऊन केव्हांच हे जग सोडून गेले होते. मी वर पाहिलं आकाशात काळोख पसरला होता. पावसाचे थेंब बरसण सुरु होत. जोराच्या पावसाने तलाव पूर्ण भरुन वाहु लागलं. वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने मला तलावाच्या कडेला सोडून ते पुढे निघुन जात होत. मी तलावाच्या ज्या कोप-या येऊन पोहचलो होतो. तिथे काही वेळ नंतर माझ्यावर आणखी वेगवेगळ्या प्रकारचा केर- कचरा येऊन पडत होता. आता माझ्यात त्राण उरले नव्हते. मी जास्त सहन करु शकत नव्हतो. हळू हळू माझी प्राण ज्योत मावळू लागली. त्या पावसात कोणीतरी माझ्याशी संवाद साधला... तो माझ्यावर वेगवेगळ बरसणारा केर- कचरापाहुन हताश होऊन माझ्याकडे पाहत होता. मी त्याला मनातल्या आठवणी न बोलताच समजावून सांगितल्या (मला जरी सर्वजन फुलांचा राजा म्हणून संबोधत असाल तरी माझी आणि माझ्यासारख्या अनेक फुलांचा अंत असाच होत असावा.) …..आणि मी शेवटचा श्वास घेतला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational