मनी मल्हार #6
मनी मल्हार #6
मानवी स्वप्नातल्या अविष्कारांच डिजिटल विश्व, जगात सर्वत्र औद्योगिक क्रांती चारच्या उतरार्ध काळाची सुरु झाली होती. सर्वत्र डिजिटल तंत्रज्ञानाचा व उपकरणांचा वापर सर्रासर होत होता. डिजिटल रोबोटिक मशिन आणि मानवी संवेदना यांना पुरक घटनात्मक नियम व कायदे हळुहळु मानवी जीवनाचा भाग होत होते….
(संघर्षी आणि मनीची मैत्री…...आज दोघी एकमेकींना पाहुन खुप आंनदीत होत्या… रिमझिम पाउस सुरु…… मनी मल्हारच्या मिठीत……तिला रडू आवरत नव्हते….. आणि समोर संघर्षीला पाहतं मल्हारच्या मनातील प्रश्नचिन्ह………..)
कारच्या ऑटोड्राईवरने “Your Destination Is Just Coming” नोटीफिकेशन अलार्म सुरु केला. नोटीफिकेशन अलार्मच्या आवाजाने मल्हारची झोप उडाली. त्याने ऑटोड्राईवरच्या स्क्रिनकडे पाहिलं. नुकतचं पडलेल्या स्वप्ना विचार करत त्याने नोटीफिकेशन अलार्म बंद करत बाहेर नजर टाकली. बाहेर अजुन लख्ख काळोख होता…कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याने समोर पाहिलं “कोल्हापुरात आपलं स्वागत आहे…!” कारच्या वेगासोबत मल्हारच्या मनाने मागील आठ वर्षाच्या आठवणींना आठवत पुन्हा वेग घेतला… (मनी सोडून गेल्यानंतर संघर्षीच्या प्रेम आणि मैत्रीने त्याला एक नावीन्यपूर्ण आयुष्य बहाल केलं होत. त्याची मेहनत आणि कामातील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन इवेन्टच्या कलात्मक अविष्काराची नाविन्यपूर्ण रचना आणि दृष्टीकोणामुळे आज तो एक इवेन्ट ऑर्गनाइज् कंपनीचा मालक होता. दोन वर्षापूर्वी संघर्षी आणि मल्हार विवाहबध झाले….व्यवसाय वाढीला लागल्यामुळे कामाच्या कक्षा रुंदावत होत्या. आज व्यवसाय वाढीच्या कामानिमित्त पहिल्यांदा तो कोल्हापुरात आला होता. पण कोल्हापुरात आल्यापासून त्याच्या मनात मनीच्या आठवणीने ति जवळपास असल्याची हुरहुर सुरु झाली होती.) विचारांच्या वेगात कार रंकाळ्याच्या परिसरात पोहचली…सूर्य हळूवार काळोखाची चादर बाजुला सारत आकाशात तांबड्या, लाल ,जांभळ्या रंगांच्या छट्टा उमटवत आगमन करु लागला होता. कारने रंकाळ्याच्या काठी असलेल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये प्रवेश केला. त्याने रिस्पशनकडे ऑनलाईन बुकिंग कोड स्कॅन केला. कोल्हापुरात इवेन्टची साईटची पाहाणी करण्याकरिता वेळ असल्याकारणामुळे त्याने थोडा वेळ विश्रांती घेण्याकरिता रिस्पश्न कडून किल्ली घेत रुमकडे आपली पावले वळवली….
उन्हं वर आली होती. पण हिवाळ्याचा गारवा असल्यामुळे जाणवतं नव्हती. इवेन्टच्या साईटची पाहण्यासाठी मल्हार हॉटेल मधुन बाहेर पडत होता… इतक्यात त्याच्या कानावर ओळखीचा आवाज ऐकु आला. त्याने त्या आवाजाच्या दिशेने रिस्पश्नच्या डेक्सकडे पाहिलं. डार्क ब्लू वनपिसमध्ये खुलुन दिसणारी कांती….एक हातात मॅचिंग वॉच..दुस-या हातात मॅचिंग सिंगल बेंग्ल….गळ्यात बारीकशी सोनेरी चैन…ओठांच्या स्मितहास्य चंद्रकोरीमुळे गालावर पडणारी खळी…. आणि मनात कधी न भरणारी जखम पुन्हा उघडली गेली. क्षणभर तो स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहात होता… रिस्पश्नवर मनी काही माहिती देत होती. समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना नकळत तिच लक्ष , तिच्याकडे पाहत स्तब्ध उभ्या असणा-या मल्हारकडे वळवली..एकमेकांची नजरा नजर झाली…..( …डान्स करत असताना मनीच लक्ष अकस्मातपणे स्टेजवर असलेल्या मल्हारकडे अशीच वळलेली नजर….. … आणि दोघांच्याही चेह-यावर हास्याची उमटलेली स्मितचंद्रकोर…. प्रेमात एकमेकांना नजरकैद केलेला प्रवास……. जेजुरी गडावर भंडा-याने सजलेला सोनेरी क्षण….तारुण्यातला पहिला प्रणयगंध…. शेवटीची घट्ट मिठी….. दोघांच्याही मन पठलावर एकमेकांच्या सहवासातले आठवणीचे क्षण ओझरताना डोळे ओलावले )… मल्हारने तिच्याकडे पा
उल वळवणार तोच वॉच मधीलस्मार्ट असिस्टंने त्याला साईटची पाहाणी करण्यास उशीर होत असल्याचं नोटीफिकेशन दिली. तो मागे वळून कारकडे जात होता. पण मन मात्र रिस्पश्नवर असलेल्या मनीकडे अडकुन पडलं.. मनीच , पण मन गेट बाहेर चाललेल्या कारच्या मागे पळत होतं… कारच्या वेगासोबत ति मागच्या आठ वर्षात घडलेल्या घटणानंचा मागोव घेउ लागली…...
(मल्हारला सोडल्यानंतर लगेच पंधरा दिवसात झालेलं लग्न… आणि लग्नाच्या वेळस तिला गेलेले दिवस…..पुन्हा तिच्या बाबांना हृद्यविकाराचा धक्का बसू नये म्हणून हे सर्व माहित असताना अथांगने तिच्याशी लग्न केलं… लग्नानंतर एक महिन्याने अथांग न्यूयॉर्कला कामासाठी निघुन गेल्यानंतर त्याच्या घरच्यांनी तिचा ह्या कारणास्तव छळ सुरु केला. तिने अथांगला होणाऱ्या छळाबाबत कल्पना दिल्यानंतर त्याने “मी लवकरच येतो” कळवलं… तो तिला न्यूयॉर्कला घेउन जाणार होता… ती नुकतंच जन्मलेल्या कळीकडे पाहतं, त्याची वाट पाहत होती… आणि महिन्याभरात बातमी आली“ न्युयॉर्कवरुन येणाऱ्या विमानाचा समुद्रात अपघात झाला होता.” कोणीही जिवंत राहिलं नाही. मृतांच्या नोंदीमध्ये अथांगचं नाव होतं. तिने ही बातमी ऐकून जोरात गळा काढून रडायला सुरुवात केली.. तिच्यावर पुन्हा आभाळ कोसळलं होतं. कारण मल्हारनंतर अथांगने तिला समजून घेतलं होतं. ही वार्ता ऐकून बाबांना हार्टअटॅक आला. हॉस्पिटलमध्ये शेवट्च्या क्षणी बाबांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि पुढे म्हणाले “तू अगदी निर्दोष आहेस बाळ..! मी ह्या सगळ्याचा दोषी आहे…ह्यात माझाच दोष आहे…मला क्षमा कर..!” आणि प्राण सोडले… अथांगच्या घरच्यांनी तिच्याशी कायमचे संबंध तोडले…महिनाभर अगोदर जन्मलेल्या मृणालीला घेऊन, ती आईसोबत स्वत:च्या गावी आली. अथांगशी लग्न केल्यावर तिने कधी कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. टूर्स आणि ट्रावेल्स एजन्सीमध्ये अगोदर काम केलेले असल्यामुळे त्याच्या अनुभवाच्या बळावर तिला हॉटेलमध्ये रिसेश्पनिस्टची नोकरी करण्यास काही गत्यंतर नव्हते… कारच्या मागे धावणार मन पुन्हा, मागोवा घेऊन मागे आलं.. आणि तिने बापाकडे केलेल्या प्रार्थनेच्या क्षणात येऊन थांबलं…)
आज मल्हारकडे पाहून ती पूर्ण झाल्याने, मन प्रफुलित झालं होतं…. ती राहूनराहून गेटमधून आत येणाऱ्या प्रत्येक गाडीकडे पाहात होती. वेळ पुढे सरत होती. तिच्या शिफ्टचा टाईम संपत आला होता.. तरीही ती वाट पाहात होती. वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे अचानक तिला मृणालीची आठवण झाली… लहान मृणालीला पाहुन तिचा स्वभाव निहाळत असताना तिला आठवायचं की, हा मल्हारचा अंश आहे. ज्याला ती सोडून आली होती… तिच्या स्वभावावर त्याचाच प्रभाव होता… ती लगबगीने घराकडे निघाली.. इतक्यात मल्हारची कार गेटच्या आत आली. मल्हारने कारमधून बाहेर येत मनीकडे पाहिलं. दोघांनाही बोलावंसं वाटत होतं. पण कुठुन आणि कशी सुरुवात करावी. ह्या गर्तेत शब्द थांबले… दोघे एकमेकांना प्राण कंठात येईपर्यंत पाहात होते… तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि मनीच्या आसवांना कंठ फुटला. तिने मल्हारकडे वेगाने धाव घेत घट्ट मिठी मारली. अश्रूंच्या घारा वाहू लागल्या होत्या. मनीने हुदंके देत खोल आवाजात अथांग आणि मृणालीबाबतची हकीगत मल्हारला सांगण्यास सुरवात केली… मल्हारने वर काळोख्या नभांगणात पाहिलं… लख्ख कोजागिरी पौर्णिमेचा शीतल प्रकाश आणि वाढलेल्या गुलाबी थंडीत मनीचे गरम श्वास त्याच्या काळजाच्या जखमा भरत असल्याचं जाणवताच त्याने तिला पुन्हा आपल्या काळजाच्या जवळ मिठीत घेतलं. (संघर्षीची मैत्री, मनीचं जिवापाड प्रेम आणि निरागस मृणालीचं पालकत्व कसं निभावता येईल, या त्रिशंकू प्रश्नांचा पूर्णचंद्र तो पाहात होता.)