14 एप्रिल 2020
14 एप्रिल 2020
जगात सर्वत्र करोनाचे सावट असून दररोज त्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी माननीय प्रधानमंत्री यांनी संविधानानुसार महामारी रोखण्यासाठी 21 दिवसाचं लॉकडाऊन करुन सर्व देशातील नागरीकांना घरी राहण्याचा संदेश दिला आणि भारतात संचारबंदी लागू केली. तरी ही काही ठिकाणी नागरीक गर्दी करतच आहेत आणि करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.
14 एप्रिल 2020 लॉकडाऊनचा शेवटा दिवस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत, आशिया खंडातील देश आणि पश्चिमात्य देशांसोबत जागातील सर्वच देश साजरी करतात. लॉकडाऊनचा शेवटा दिवस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ह्या घटनेवर सर्वांचे लक्ष होते. पण 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी माननीय प्रधानमंत्री यांनी त्याचा कालावधी वाढवून ‘लॉकडाऊन पार्ट टू’ 3 मे पर्यंत चालू राहील याची घोषणा केली. दुसरं म्हणजे हा समाज कसा प्रतिक्रिया करेल हे बघण्याजोगे होतं. कारण आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती म्हणजे पूर्ण देशभर नुस्ता धांगडधिंगा करण्याचा दिवस, हा सर्वांचाच समज होता. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या समाज्याची एक प्रकारे परीक्षाच होती. आता सर्वांचे लक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या समाजाकडे लागले होते.
पण 14 एप्रिल 2020 रोजी सर्व समाजाने संविधानाचे पावित्र्य राखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच राहुन साजरी केली. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वांनी आपल्या नातेवाईक, मित्र मंडळी ह्यांना व्हिडिओ कॉल करुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. समाजाच सोशल डिस्टंस ठेवला पण मनाने आणि बाबासाहेबांच्या विचारांनी एकत्र आले आणि ह्याची दखल खुद्द महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री ह्यांनी घेऊन जनतेचे आणि समाजाचे आभार मानले.
आज ह्या समाजाने दाखवून दिले की, ह्यात कितीही तंटे, गट असले तरी ते बाबासाहेबांच्या विचारांनी एकत्र आहेत. खरंच 14 एप्रिल 2020 डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जंयती जगाला आणि देशाला आठवणीत राहील अशीच होती…
नमो बुद्धाय..! जय भिम..!