किशोर राजवर्धन

Romance

4.7  

किशोर राजवर्धन

Romance

हाफ लव्ह

हाफ लव्ह

16 mins
414


(1)

सारांशने दररोज प्रमाणे बाहेर नजर टाकली. श्रावण सरी ऊन सावलीच्या खेळात भाग घेतल्यासारख्या एकमेकांवर राज्यं येण्यासाठी एका मागुन एक धावा घेत होत्या. त्याने एका खांद्यावर बॅग आडकवली. त्यात वाचण्यासाठी पुस्तक आणि त्याच्या आठवणीच्या कप्यातील काही त्यानेच निवडुन ठेवलेल्या आठवणी, दुस-या हातात काळ्या रंगाची छत्री घेउन तो घराबाहेर पडला…

     

 त्याच्या ठरलेल्या कॉफी शॉपमध्ये येउन त्याने कॉफीची ऑर्डर देण्यासाठी वेटरकडे पाहिलं. वेटरने त्याला काय हवं आहे. हे जाणुन घेण्याची गरज भासली नाही. गेली तीन वर्ष तो तीन किंवा चार महिन्यातुन एकदातरी कॅफेमध्ये येत होता आणि त्यात अजून तरी खंड पडू दिला नाही.. कॉफी येईपर्यंत त्याने बॅगेमधुन The Bridges of Madison County पुस्तक काढून तो वाचण्यात मग्न झाला. थोड्या वेळ गेल्यानंतर वेटरने कॉफी आणुन टेबलवर ठेवली. वाचत असताना वेटरने आणलेली कॉफी त्याने पाहिली. वाचन एका पानावर थांबवून त्याने कॉफीचा एक सिप घेतला आणि त्याच्या आठवणींनच्या कप्याचे दार हळूवार संध्याकाळच्या कातरवेळेत उघडलं गेलं….

      

बेचाळीस वर्षा अगोदर जेव्हा त्याने ज्युनिअर कॉलेज पुर्ण करुन डिग्री कॉलेजला ऍडमिशन घेतलं होत. ते कॉलेज त्याच्या घरापासुन दुर अंतरावर शहराच्या एका टोकापासुन शहर सुरु होण्याच्या टोकाला समुद्र किनारी होतं. ज्युनिअर कॉलेजचे काही मित्र ओळखीचे होते आणि काही अगोदर पासुन त्याच कॉलेजमध्ये शिकत होते. हया सर्वांनचा एक ग्रृप होता. तोच फक्त नव्याने त्यात सामील झाला होता. शासनाच कॉलेज असल्यामुळे ह्या वर्षी ऍडमिशन घेतलेल्या मुलांची संख्या जास्त होती. कॉलेज प्रशासनाने सकाळ आणि दुपार असे दोन सेशन केले. सकाळच्या सेशन होण्यासाठी कॉलेजची दुसरी ब्रांच एका अनाथलयातील शाळेच्या इमारतीत होती. त्यामध्ये एक फ्लोअर शासनाच्या कॉलेजकरिता राखिव ठेवला होत. त्याने घरची परिस्थिती पाहुन सकाळच्या सेशनची निवड केली आणि कॉलेज सुटल्यावर पार्ट टाईम जॉब स्विकारला होता. सकाळच्या सेशनमध्ये फक्त तो आणि त्यांच्या ग्रृपच्या काही मैत्रिणी ज्याच्या सोबत त्याची फक्त वरचेवर तोंड ओळखत होती. उरलेल्या सर्वांनी दुपारच सेशन का घेतलं हे सांगायला नको..तिची आणि त्याची मैत्री होण्याच हे एकच कारण पुरे होत.


पहिल्यांदा जेव्हा त्यांची आणि तिची मैत्री जुळली…..तो दिवस तिचे लागोपाट दोन लेक्चर मिसिंग झाले कारण तिला सकाळी उठायला जमलं नव्हतं. ति त्याच्याकडून नोट्स मागण्यासाठी त्याच्या डेक्स्कडे आली आणि मंद स्मित करत हळुवार स्वरात त्याची विचारपुसं करत नोट्स मिळतील का? म्हणून विचारलं. त्याने हातात असलेली नोट्बुक तिला देत असताणा दोघांच्या ही बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला..तिने ते स्विकारत गोड आवाजात “थँक्स!” म्हंटल आणि तिच्या डेक्सकडे वळाली… जाताणा तिने मागे वळुन पुन्हा त्याच्याकडे कटाक्षनजरेन पाहिलं..तो तिच्याकडे बघत होतं.. (रिसेसमध्ये ति अनाथलयातील शाळेच्या त्या मुलांशी खेळायची पाय-यांवर बसुन गप्पा गोष्टी करायची. त्यांच्या ती मिळून जणु त्यांच्यातलीच एक वाटायची.) लेक्चर झाल्यावर वर्गाबाहेर पडताना. ति त्याच्या जवळ आली आणि त्याला विचारलं “कुठे जाणार आहेस?..” त्याने कोणताही भाव चेह-यावर न आणता उत्तर दिलं “मी स्टेशनला जाणार आहे. तिथुन जॉबला .. ” तिने पुढे म्हंटल “मी स्टेशनपर्यंत सोबत आलेल चाले ना.! ” त्याने हलक गालावर हसु आणत “हो..नक्कीच!” म्हटलं आणि दोघे स्टेशनच्या दिशेने जाऊ लागले…त्याने तिच्याकडे नजर वळवली ..गौरा नितळ वर्ण.. गोल चेहरा, सपाट माथा त्यावर कोण्त्याही प्रकारची आटी पडली तरी दिसणार नाही असा.. तिच्या गालांचे उंचवटे. तपकिरी रंगाचे डोळे..लांब पण थोडे कुरुळे केस.. आज तिने डार्क मेंहदी रंगाचा पंजाबी सुट घातला होता. ओढणी माने पासुन दोन्ही हात उरोजापर्यंत पुर्ण झाकलेली. एका खांद्यावर लेदरची बॅग आणि दुस-या हातात छोटा लेडीज रुमाल.. नाकावर छोटाचा चमकणारा टिपका.. त्याने तिला पुर्ण न्याहाळून घेतलं…तिची उंची त्याच्या खांद्यापर्यंत लागत होती. शारीरिक बांधा नुकतच भरीव कमळाच्या कळीने फुलण्याच सुरु केल्याप्रमाणे आकर्षक यौवन तरतरी स्वच्छ दिसत होतं. ति त्याच्याशी कॉलेजच्या ग्रृपमधल्या मित्र मैत्रिणीचे नाव आणि स्वाभाव , आवड, पिकनिक बाबत सांगत होती. तो फक्त हुंकार देत राहील.. तिच्या गप्पामध्ये ते दोघेही स्टेशनला पोहचले. त्याला जॉबला जाण्यास उशीर होईल म्हणुन त्याने तिला औपचारिक ‘बाय!’ म्हटंल आणि नुकतीच आलेली ट्रेन पकडली. तो ट्रेनच्या दारात उभा राहिला आणि तिच्याकडे पाहिल. ति अजून तिथेच त्याला नजरेआड होईपर्यंत पाहत थांबली होती…आत दोघेही सोबत लेक्चर संपल की, स्टेशनपर्यंत गप्पा गोष्टी करत जावु लागले. हळुहळु त्यांची मैत्री वाढत होती …..

      

इतक्यात कॉफीच्या कप मधली कॉफी संपली असल्याच त्याला कळलं. त्याने कप टेबलवर ठेवला आणि पुन्हा थांबलेल्या पानावर वळत तो वाचण्यात लक्ष देउ लागला. वेटर रिकामा कप घ्याला आला.. त्याने , त्याला जाताणा पुन्हा एक कप कॉफीची ऑर्डर इशा-यात कळवली. रिकामा कप घेऊन वेटर पुन्हा कॉफीची ऑर्डर आणण्यासाठी निघुन गेला….

      

पुस्तकातील विचार त्याला जुळवुन घेत नव्हते.. वेटरने पुन्हा कॉफी आणुन टेबलवर ठेवली आणि निघुन गेला. त्याने कपचा कान बोटांमध्ये पकडत ओठांना लावला. त्याने तो झटक्यात बाजुला सरकवत कपाकडे पाहिलं. कॉफी अजुन गरम होती. त्यामुळे त्याची जीभ आणि ओठ सुन्न होऊन भाजल्याच जाणवलं. त्याने कप टेबलवर ठेवला आणि त्यातुन बाहेर पडणा-या वाफेकडे पाहत आठवणींच्या शुन्यात समावुन गेला…

      

अनाथालय शाळेच्या इमारती (कॉलेजच्या) मागच्या गल्लीत एक चहाची टपरी होती. त्याला आठवलं जेव्हा तिला पहिल्यांदा त्याने टपरीवर चहा पिण्यासाठी आणल होतं. सकाळच्या थंडीत टपरीवरची गरमा-गरम मसालेदार चहा फुकुन पिताना पहिल्यांदा तिची उडालेली धांदल उडाली आणि घाईघाईत तिची जीभ भाजली तेव्हा दोघांनी एकमेकांनकडे पाहत दोघांच्याही चेह-यावर उमटलेली स्मित हास्यरेषा… नतंर तो आणि ती रिसेसमध्ये नित्य नियमाने चहा प्याला जावु लागले. (नोकीया मोबाईल फोनचा काळ होता. कॉलेजमधील सर्वांनकडे नोकीया फोनचे वेगवेगळे मॉडेल होते. खरचं तो काळ महागड्या कॉलचा असल्यामुळे टेक्सट मेसेजची मौजच वेगळी होती. जास्त करुन सर्वजण एकमेकांना टेक्सट मेसेज करायचे..) त्याचा आणि तिचा सहवासाच्या मैत्रीत दोघेही एकमेकांना जाणुन घेण्याचा प्रयत्न करत होते. दोघांना ही आता एकमेकांचा सहवास प्रिय वाटत होता आणि दोघेही दिवसांतुन काही वेळ ग्रृपमधुन वेगळे राहु लागले. दोघांनी फोन नंबर एक्चेंज केले. तो कामात असल्यावर, घरी गेल्यावर दोघेही टेक्सट मेसेजवर गप्पा मारायचे. दररोज फोनवर टेक्सट मेसेज करुनही पुन्हा सकाळी भेटण्याची ओढ पल्लवीत होत होती….वा-याच्या झुळुका प्रमाणे वर्ष सरत होती आणि आता फायनलच्या वर्षी सर्व ग्रूपला कळून चुकलं होत की, दोघांमध्ये फिलिंग्स असून ही दोघे ह्या विषयावर बोलत नाही. जणु हे क्षण वा-याप्रमाणे उडूण जातील आणि हाती काहीच लागणार नाही..


      कॉलेजमध्ये डे सेलिब्रेशनचे दिवस सुरु होते. आज साडी आणि टाय डे होता. सर्वजण बिनधास्त खुल्या आभाळात पंख पसरुन उडाण घेऊ पाहत होते. मुलं टायच्या वेगवेगळ्या डिसाईन घालुन फिरत होते. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रृपमधले काहीजण ज्या कोणी टाय घातली नसेल तर त्याला चिडवत होते. “ कंठ लंगोट ” हा मराठी शब्द वापरुन विचारपुस करायचे आणि मस्करी , हास्यचे फवारे उडवत होते. प्रत्येक मुलगी जणू सौदंर्याची खाणच होती. तारुण्यातील तो अल्लड पणा, रुपवती , नाजुक कोमल, कमणीय बांधा , ओठांच्या लिपस्टीकचे , मेकअप, दागिने, साड्यांचे वेगवेगळे अनोखे रंग जणु त्याला फुलांच्या मळ्यात आपण फिरत आहोत आणि त्यांचा अगणित सुगंध त्याच्या श्वासात दरवळत आहे. अस वाटत होत… तेवढ्यात ती मैत्रिणी सोबत त्याच्याकडे येत होती. दुरुन तिला येताणा पाहत असताना त्याच तिच्या आजच्या सांजशृंगाराकडे लक्ष गेलं. वांगी कलरची सिल्कची साडी , पदरावर सोनेरी नक्षीदार बॉर्डर , आज तिने शक्या तो साडीला मॅचिंग होईल असाच शृंगार केला होता. त्यात तिची कांती उजाळुन आली होती. तिला पाहुन त्याच्या मनात काही शब्दांची जुळवा जुळव होऊन चार ओळी उमलल्या…


तुला येताना पाहुन वाटलं 

तुझ्या सौदर्याचा अर्थ तुला सांगावा..

तु जवळ आलीस अनं 

तो सांगायचा राहुन गेला...


तसं तर ह्या अगोदर बहुतेक वेळा त्याने तिला साडीत पाहिलं होत. पण आज असं अचानक जुळवून येणा-या शब्दांबाबत विचार करत मनातुन ओठापर्यंत आलेले शब्द त्याने तिथे अडकवुन विरघळून घेतले..ति जवळ येऊन त्याच्या बाजुला उभी राहीली. सर्वजण त्यांच्याकडे अश्चर्याने पाहत होते. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रृपमधल्या काही जणांनी त्याची मस्करी करण्यासाठी त्याला “ Congratulations…!” करु लागले. त्याला अचंबित वाटू लागल. क्षणार्धाचा विलंब करता ति मस्करी त्याच्या लक्षात आली.. सगळे खळखळुन हासले. एकाने कमेंट केली. तुम्ही दोघ परफेक्ट कपल दिसता. तु तिला विचारत का नाही? दोघांनी ही ऐकुण न ऐकल्यासारख दाखवलं..तिने त्याला लॅब्ररीतुन एक पुस्तक घ्याच आहे. तिने आज लॅब्ररीकार्ड आणलं नाही म्हणुन दोघेही ग्रृप बाहेर पडले. सर्वांना ‘बाय’ केलं.. ग्रृप पासुन दुर गेल्यानंतर ती म्हणाली. आज आपण समुद्र किनारी जावूया. खुप दिवस झाले आपण गेलोच नाही. त्याने घड्याळाकडे पाहिलं वेळ आहे ऑफिसला जायला म्हणुन होकार दिला.. चालता-चालता तिने त्याचा हात तिच्या हातात गुंफुन घेतला. तो तिच्याकडे पाहत होता. त्याला तिला सांगुशी वाटत होतं की, आपण हे थांबवु या कारण त्याच्यावर घरची जबाबदारी होती. वडीलांच्या मुत्यनंतर तो आईला आर्थिक मदत व्हावी आणि त्याचा कॉलेजचा खर्च सुटावा म्हणुन तो कॉलेजकरुन जॉब करत होता. ह्या परिस्थिती मध्ये ति सामावुन घेणार नाही आणि त्याला अजुन परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी खुप मोठा पल्ला गाठायचा होता. पण तो सर्व तिला सांगु शकला नाही. चालत-चालत दोघे समुद्रा किनारी आले आणि कठड्यावर बसले. समुद्रावरुन येणा-या लाटा आणि वा-याच्या झोताचा गंध श्वासात समावुन घेत तो लाटांकडे पाहत विचार करत बसला. इतक्यात जोराची मोठी लाट किना-याच्या खडकावर येवुन आदळली. त्याच्या तुषारांनी दोघे ओले झाले. तिने त्याचा दंड घट्ट पकडला. पुन्हा मोठी लाट किना-याच्या खडकावर आदळली. ति ह्यावेळी त्याच्या मिठीत सामावली. त्याने तिच्याकडे पाहिल. तिच्या डोळ्यात भरुन आलेल प्रेम आणि चमक त्याला जाणवली. तिने क्षणाचाही विलंब न करता तिचे ओठ त्याच्या ओठावर ठेवले…


फायनलचं वर्ष संपल. डिग्री हातात आली.. तो तिच्या प्रेमात वाहत राहिला..आणि आयुष्याने एक चटकदार वळण घेतलं. त्याच्या आईच निधन झालं आणि तो पुर्णत: कोसळला. आता घरातील तो एकमेव जबाबदार व्यक्ती होता आणि दोन त्याच्या पेक्षा लहान बहिणींची जबाबदारी आता त्याच्यावर होती. आईच्या जाण्याने आता तो संपल्या सारखं वाटत होतं. ह्या कठीण परिस्थितीत ति फक्त एकदाच त्याला भेटायला आली आणि नंतर तिचा नंबर लागला नाही. त्याने नव्याने आयुष्य उभारण्यासाठी आणि बहिणींची जबाबदारी विचार करुन पुढे जाण्याचा विचार केला. दिवस , महिने, वर्ष सरत होते. सातत्य, मेहनतीने, जबाबादारीने त्याची कामे पुर्ण करुन त्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. काही वर्षातच तो एका मल्टीनेश्न कंपनीत सीईओ म्हणुन रुजु झाला….


इतक्यात त्याला त्याच्या आजुबाजुला मोठ्याने सुरु असलेल्या गोंधळाची जाणीव झाली. त्याने शुन्यातुन बाहेर येत समोर पाहिलं तर टेबलवरील व्यक्ती ऑर्डर अजून का..? आली नाही…म्हणुन ओरडत होती.. त्याने कॉफीच्या कपवर नजर टाकली. (ति पुर्ण थंड झाली होती आणि तिच्यावर ब्राउन थर जमा झाला होता. त्याच्याकडे पाहत त्याला जाणवल की, आताच आयुष्य पण ह्या कॉफी प्रमाणे थंड आणि शांत झाल आहे. आता ति पिउन ह्याची की वेटरला दुसरी आणाला सांगायची.. त्याने विचार केला ति आता त्याच्या आयुष्य सारखीच परिस्थिती आहे. पिउन घेतली तर वेस्ट जाणार नाही आणि सोडुन दिली तर तिच्या आयुष्याचा काहीच उपयोग झालेला नाही.) म्हणुन त्याने ति पिऊन घेतली…आणि पुन्हा पुस्तकाकडे वळला.. आज त्याच काही त्यात लक्ष लागत नव्हत. त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहीलं.....खुप उशीर झाला आज....तरी ही अजूण कशी आली नाही.. लोकल तर वेळेवर आहेत... त्याने कॉफी शॉपच्या मिर्रर मधुन रेल्वे स्टेशन कडे पाहील....आणि.... विचार करु लागला. का? का कुणास ठाऊक...कोणत्या नात्यांनी ते दोघे बांधुन होते ह्याच विचारात पुन्हा गर्त झाला.

      

आयुष्यात परिस्थितीवर मात करुन त्याने उचं भरारी घेतली होती. आज त्याने जे काही कमवले होते. त्याने त्याला एका नव्या उंचीवर नेऊन बसवले होते. त्याने दोन्ही बहीणींची खुप ताटामाटा लग्न करुन दिली होती आणि चार वर्षापुर्वी त्याच लग्न झाल होता. एक मुलगा आणि मुलगी दोन पाल्य होती. त्याच्या स्वप्नांच्या जगात तो मोकळा श्वास घेत होता. सर्व काही व्यवस्थित सुरळत सुरु होतं आणि एक दिवस त्याच्या कामाच्या अखत्यारित एक नवीन डिव्हीजन जोडल गेलं. दोन-तिन महिने तिथे कामगार आणि डी.एम. (Division Manager) ह्याच्यात होणारे वाद मॅनेजमेंटकडे येत होते. त्याचा कसोशीने चौकशी करण्यासाठी त्याने एकदा कामगार आणि डी.एम. यांची मिटींग ठेवली. त्याच लक्ष डी.एम. मॅनेजरच्या नावाकडे गेलं. त्या नावाशी, त्याचं मागिल आयुष्यशी संबंध असणारी ति पुन्हा त्याच्या समोर आली. त्याने तिला ऑफिशीयल कॉफी मिटींगसाठी आणि कामगारांच्या अगोदर तिची बाजु ऐकण्यासाठी बोलवलं. ति त्याच्या केबिन मध्ये आली. साधारण बारा वर्षानंतर तो तिला पाहत होता. तिच्यात विलक्षण बदल झाला होता. तिने गडद जांभल्या रंगाचा ड्रेस त्यावर मॅचिंग साजेसी ओठणी आज ही त्याच स्टाईलमध्ये पुर्ण माने पासुन हाताच्या मनगटापर्यंत घेतलेली. डोळ्यावर जाड रेक्ट्रोफ्रेमचा चष्मा, चेह-यावर मनातल्या जखमा दडपवत ती त्याच्याशी बोलत होती. तबेतित थोडी जाड झालेली. जेव्हा त्याने तिच्यासोबत शेकहँड केला तेव्हा त्याला तिचे नाजुक रेशमी हात थोडे रठ्ठ झालेले जाणवले.. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आपली जाग निश्चित करण्याच्या तयारीत होते. तिने त्याच्याकडे पाहुन जणु ति पहिल्यांदाच त्याच्याशी भेटत आहे असा संवाद करत होती.. तिची बाजु ऐकल्यानंतर त्याने तिला “ठिक आहे..मी बघतो..काय कारायचं ते.. ” पुढे ति काही न बोलता केबिन बाहेर पडली. तो काचेच्या दरवाज्यातुन दुर जाईपर्यंत तिच्या आकृतीकडे पाहत होता. पण ति मागे वळली नाही…

      

तिची बाजु आणि कामगारांची बाजु ऐकूण त्याने दोन्ही बाजुने विचार करुन एक मध्यम मार्ग सुचवला आणि तो कामगारांना ही मान्य झाला. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी पुन्हा वाढत गेल्या आणि तिने त्याला त्याच्या पासुन वेगळी का झाली? का? हे कराव लागल ह्या बद्द्ल स्पष्टीकरण दिलं. तीच्या बोलण्यात पश्चातापाची भावना होती. दोघांच्याही मनात सलत असणा-या आयुष्याच्या जखमेवर जणु वेळेने मलम पट्टीच केली होती…

त्याचा मागुमास त्याच्या बायकोला लागला असावा. त्याची कुणा स्त्री बरोबर विवाह बाह्य संबंध आहे का? असा थेट प्रश्न एकदा त्याच्या बायकोने त्याला विचारलां. तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात तिला “ नाही ” सांगितल. पण तिचा विश्वास बसत नव्हता. म्हणुन त्याने तिला , ति एक कॉलेजची मैत्रिण आहे आणि तिला ह्यावेळी त्याच्या मैत्रीची, आपुलकीची गरज आहे. हे सांगुन विषय तुर्ता थांबवला. पण तिच्या कडून हा विषय थांबला नव्हता. तिने , तिची अनामिक ओळख करुन घेतली. तिच्याशी बोलुन गप्पा करुन तिने हे जाणल की, तो फक्त तिला धीर देण्याचा आणि तिच्याशी असलेल्या मैत्रीच्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तिचं त्याच्यामध्ये भावनीक गुंतत चालली असून तिचं कॉलेजच्या जीवनात त्याच्यावर प्रेम होतं. पण तिला ते मिळवता आल नाही. हे तिला कळलं. तीन वर्षापुर्वी त्याच्या बायकोच रोड अपघात झाला. ति मरणाश्यावर असताणा त्याच्या समोर तिने ह्याच स्पष्टीकरण करत त्याला विणवनी केली की , तु माझ्यानंतर तिची काळजी घेशील. जणु तिला त्या भावनीक नात्यातील गुंत्याची ओळख पटली होती.….

इतक्यात त्याने कॉफी शॉपच्या मिर्रर मधुन तिला रेल्वे स्टेशनमधुन बाहेर पडताला पाहिलं..


(2)


अंशिका शहराच्या उपनगरात सध्या तिच वास्तव होतं. तिने आरशात पाहिलं. साडी निटनेटकी केली. मम्मीला औषध देताणा तिने खिडकीतुन नजर टाकली जोराचा पाउस सुरु होता. मम्मीला मी येते जाऊन म्हणून खुणावलं. तिने न बोलता फक्त हाताची हालचाल करुन तिला जाण्याचा इशारा केला. बिल्डींग बाहेर आल्यावर तिने छ्त्री उघडली आणि स्टेशनला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती.. पाउस सुरुच होता. तिने हातातल्या घडाल्यात पाहिलं. आज तिला उशीर होत होता. इतक्यात एक रिक्षा येऊन तिच्या जवळ थांबली तिने स्टेशनला येणार का? म्हणुन विचारलं रिक्षावाल्याने होकार दिला. तिने आत प्रवेश केला. ति स्टेशनला आली इन्डीकेटर पाहिलं तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली. पण खुप गर्दी होती. तिने ति सोडली आणि लेडिज कोच जिथे थांबतो. तिथ पर्यंत चालत गेली. पुन्हा तिने हातातल्या घडाल्याकडे पाहिलं. दुसरी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. तिच्यात चढता येण्यासारखी मोकळी जागा असल्यामुळे ति ट्रेनमध्ये चढली. ट्रेन सुरु झाली. आत येऊन बसण्यासाठी तिने कोचभर एक नजर फिरवली.. पण कुठेच तिला रिकामी सिट नजरेत पडली नाही म्हणुन ति दोन सिटच्या मधल्या जागेत एका हातात छ्त्री आणि दुसरा हात वर हँन्डेला पकडुन उभी राहील. इतक्यात तिच्या वयाला पाहुन तिच्या समोर बसलेल्या नाजुक तरुण चुणचुणीत मुलीने उठुन तिला बसण्यासाठी जागा दिली. ति स्नेहाने हसत तिला “थँक्स!” म्हणाली. त्या कॉलेजला जाणा-या मुलीकडे पाहुन तिला तिच्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ट्रेनच्या वेगा सोबत तिने त्या आठवणीच्या प्रवासाला सुरुवात केली..


दहावीला चांगले टक्के मिळाले तेव्हा मम्मी – पप्पांची इच्छा होती की , शहरातल्या मोठ्या प्रतिष्ठीत कॉलेज मध्ये तिने पुढच शिक्षण पुर्ण करावं. पण त्यांची मर्जी न जुमाणता तिने शासन मान्य कॉलेज निवडुन स्व:ता ऍडमिशन घेऊन आली होती. त्या दिवशी दोघे ही तिच्यावर खेकसले आणि ओरडुन खुप काही बोलले होते… तिने रागात येवून तिचा रुम लॉक केला. थोड्यावेळाने मम्मा तिची समजुत काढायला आली.. आणि तिने तिला जवळ मिठीत घेत “ ठिक आहे..! पण पुढे टाकलेलं पाउल पाठी घेऊ नकोस..” “आता तु मोठी झाली आहे.. तेव्हा तुझे निर्णय तु घेताना अगोदर विचार करत जा..! आणि घेतलेल्या निर्णयाच्या पाठी ठामपणे उभी राहायला शिक.. ” “ नाहीतर.... ” आणि नंतर तिच रडु लागली होती. तिला माहित होतं का?...ते , कारण गेली पाच-सहा वर्ष दोघांच्या ही नात्याला संशयाचा रोग लागला होता. त्यामुळे दोघांन मध्ये घरात वाद होत होते. त्यात तिने त्यांच्या इच्छे विरुध जाऊन ऍडमिशन घेतल्याने त्याच सर्व दोषारोप मम्माला देण्यात पप्पा मागे हटले नाही. ह्या नंतर तिचा कॉलेज मध्ये ग्रृप तयार झालं आणि तिने जास्त काही त्यांच्या नाते संबंधात लक्ष घातल नाही जास्ती-जास्त वेळ ति कॉलेज कट्ट्यावर घालवयची त्यात तिचे ज्युनिअर कॉलेजचे वर्ष सरली आणि डिग्रीला तिने सकाळच सेशन घेतल. ते पण तिला स्व:ताच ठरवलं होत. कॉलेज ग्रृपच्या मैत्रिणी तिला नको..नको म्हणत होत्या. पण तिने कुणाचही ऐकल नाही. कॉलेजच्या जुन्या ग्रृपमध्ये एक-दोन नवीन मित्र जॉईन होऊन त्याच्या संख्येत वाढ झाली होती. पण त्याच्यातुन तो एकटाच तिला सकाळच्या सेशनला येत होता. त्याला तिने जेव्हा पहिल्यादा पाहिलं तेव्हा तिच्या मनात एक आपले पणाची भावनाजागृत झाली होती आणि ति तिला त्याच्याशी मैत्री करायला, त्याच्याशी बोलायला , संवाद साधयला प्रवृत करत होती. न राहुन तिने मग एक दिवस त्याच्याशी बोलण्यासाठी नोट्स मागण्याच ठरलं. तिने नोट्स घेताना त्याच्या शरीरयष्टीतकडे पाहिलं. डार्क ब्लु शर्ट , ग्रे कलरची पँट, शर्टचे दोन्ही हात मनगटापर्यंत फोल्ट केलेले. त्याची छाती पाहुन तो नियमित जिमला जात असवा. त्याच्यावर डोकं ठेवुन त्याच्यात एकरुप व्हाव अस क्षणभर तिच्या मनात आलं पण त्याचं रुप मनात साठवुन ति एक कल्पना म्हणून तिने त्या क्षणी सोडून दिलं. नंतर दोघांन मध्ये मैत्री वाढ गेली. ति त्याला कधी -कधी रिसेस मध्ये अनाथालयाच्या मुलांनसोबत खेळायला घ्याची….


तेवढ्यात कोचमध्ये गर्दीचा लोड आला आणि तिने त्याकडे लक्ष देण्यासाठी आठवणींच्या प्रवासातुन डोक बाहेर काढलं. तिला जाणवल की शहरात गर्दी वाढत चालली आहे. ति जेव्हा कॉलेजला होती तेव्हाची आणि आताची परिस्थिती फार वेगळी होती…


ट्रेन सुरु झाली...पावसाच्या सरीमुळे खिडकीतुन पाणी आत येत होतं. तिने त्याकडे मान वळवली. ट्रेनने हळुहळु वेग घेतला. त्यामुळे बाहेरील दृष्श वेगाने पुढे जात असताना तिच अवधान रेल्वे स्टेशनवरील स्टॉलमधल्या चहाच्या कपांकडे गेलं. तेवढ्यात खिडकी जवळ बसलेल्या बाईने ति बंद केली…पण त्या चहाच्या कपांसोबतची गोड आवठणींचा गंध तिच्या मनात दरवळू लागला..


      हिवाळ्यात सकाळच्या सेशनमध्ये कॉलेजला येतान खुप थंडी असायची स्वेटर घालून ही थंडी जात नसायची. वर्गात आल की बर वाटायच. रिसेसमध्ये मुलं खाली कुठेतरी जाऊन ताजेतावाने होऊन यायची. त्याच्या चेह-यावर त्या कडाक्याच्या थंडीत छान उत्साह पुन्हा आलेला असायचा म्हणून त्याने एकदा तिला अनाथलय शाळेच्या इमारती (कॉलेजच्या) मागच्या गल्लीत एक चहाची टपरी होती. तिथे घेऊन गेला होता. काय? मस्त चहा होता तो. अजून ही त्याची चव तिच्या जीभे रेंगाळत होती. त्यानंतर दोघेही दररोज एकत्र चहा प्यायला जायचे. नवीन नवीन तीन-चार दिवस चहाचे पैसे देताणा शर्यत लागायची. मग तोच पैसे देत राहीला आणि तिला ही मनातून तो आवडू लागला होता. म्हणून त्यालाच पुढाकार करुन देऊ लागली. दोघांची मैत्री वाढत गेली. पहिलं वर्ष सरलं तिच्या मनात प्रेम ह्या संकल्पने जन्म घेतला आणि ति त्याला त्यात जूळून घेण्यात पाहत होती. जणू त्याला ही कळल होतं तिच्या मनातलं पण ओठांवर आणत नव्हता. सर्व ग्रृपला त्याची चाहुल लागली होती..


आज कॉलेजमध्ये साडी आणि टाय डे होता. ती सांजशृंगार करुन कॉलेजला आली. त्याला भेटण्यासाठी ति त्याला शोधत होती. त्याला तिच्या प्रेमाचा क्लु द्याचा होता. जेणे करुन तो समजुण तिला प्रपोज करण्यासाठी पुढाकार घेईल. तिने त्याला कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रृपमध्ये असलेल पाहिल आणि येवून त्याच्या बाजुला उभी राहीली. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रृपमधल्या काही जणांनी त्याची मस्करी करण्यासाठी त्याला “ Congratulations…!” करु लागले. त्याच्या चेह-यावरचे अचंबित भाव तिने जाणले होते. नंतर सगळे खळखळुन हासले. एकाने कमेंट केली. तुम्ही दोघ परफेक्ट कपल दिसता. तु तिला विचारत का नाही? दोघांनी ही ऐकुण न ऐकल्यासारख दाखवलं होतं..तिने त्याला लॅब्ररीतुन एक पुस्तक घ्याच आहे. तिने आज लॅब्ररीकार्ड आणलं नाही म्हणुन त्याला ग्रृप बाहेर घेऊन आली आणि जाताना सर्वांना ‘बाय’ केलं.. ग्रृपपासुन दुर गेल्यानंतर तिने समुद्रावर जायची मागणी केली आणि तोही गुमान तिच्या सोबत चालत राहीला. चालता-चालता तिने तिचा हात त्याच्या हातात गुंफुन घेतला… मोठी लाट किना-याच्या खडकावर आदळ्या नतंर ति त्याचा मिठीतली उब तिला अजून ही जाणवत होती... कॉलेजचे दिवस काळाप्रमाणे पुढे गेल आणि दोघही प्रेमात वाहत गेल. कॉलेजच शिक्षण पुर्ण झाल्यावर तो जॉब शोधत होता. प्रयत्न करत होता पण यश हाती लागत नव्हत आणि त्यातच त्याच्या मम्मीच्या निधनाची बातमी तिला कळली तो पुर्णत: कोसळला होता. आता घरातील तो एकमेव जबाबदार व्यक्ती होता. आणि दोन त्याच्या पेक्षा लहान बहिणींची जबाबदारी आता त्याच्यावर होती. मम्मीच्या जाण्याने आता तो संपल्या सारखं वाटत होतं. ह्या कठीण परिस्थितीत ति त्याला भेटायला जाण्याच्या आगोदरच्या रात्री तिच्या मम्मी –पप्पांच जोराच भांडण झालं त्यांच्या नात्याला संशयाचा नायटा झाला होता आणि तो बरा होण्याच्या पलीकडे चालला होता. त्यामुळे पप्पांनी वेगळ राहण्याचा निर्णय घेतला आणि ते घरसोडून गेलं. ति रात्र तिने मम्माला समजवण्यात आणि वाहणा-या आसवांच्या धारा रोखण्यातच गेली नंतर कुठे तरी तिला पाहेट 4.00 वाजता डोळा लागला… अलार्मच्या आवाजाने तिला जाग आली. तिने तयारी केली मनात रात्रीच दु:ख घर करुन होतं. तिच्या मनात प्रश्न… प्रश्न.. होते. आता मम्मीला तिच्या शिवाय कोणताच आधार नव्हता. म्हणुन तिने त्याची फक्त एकदाच भेट घेतली आणि नंतर त्याच्या पासुन दुर जाण्यासाठी तिने तिचा फोन नंबर चेंज केला. त्यानंतर ज्या घरात ति आणि तिची आई राहत होती. ते घर तिच्या पप्पांच्या नावाने खरेदी केल होत आणि तो आता घटस्फोट मागत होता. मम्मीने कायदेशीर कार्यवाही करुन त्याच्याकडून दोघींच्याही आयुष्याची तजवीज केली आणि त्याच घर सोडून त्या दोघी शहराबाहेर उपनगरात राहायला आल्या.. त्यानंतर पुन्हा तो तिच्या आयुष्यात एक सीईओ म्हणुन आला आणि आयुष्य पुन्हा बहरुन आल्या सारख तिला वाटलं..


इतक्यात तिने कोचमधील अनाऊसंमेन्ट एकली. तिच स्टेशन आल होतं.. गर्दीतुन मार्ग काढत ट्रेन थांबली. ति स्टेशन बाहेर पडली आणि समोरील कॉफी शॉपच्या दिशेने चालू लागली..


                                                                   (3)

त्याने तिला समोरुन येताना पाहिलं. (आज तिचा वाढदिवस होता. म्हणून तो , तिला त्याच्या सोबत राहण्यासाठी विचारणार होता. ह्याबाबत त्याने आपल्या दोन्ही मुलांना व्हिडीओ कॉल करुन कल्पना दिली जे देशाच्या बाहेर वास्तव्या करत होते.....) तिने गडद निळ्या रंगाची साडी, तिच्यावर पिवळ्या रंगाने भरलेली बॉर्डर, साडीवर पिवळ्या मध्यम आकाराचे वर्तुळाची डिजाईन, ति जवळ आली आणि त्याच्या समोर बसली. तिच्या चेह-यावर वयानुसार सुरकुत्या आपली जागा घेत होत्या. आज तिच्या चेह-यावर नितळ स्वच्छ आणि आनंदी पाहुन त्याला ही मस्त वाटलं. त्याने वेटर कडे बिल मागितला. काही वेळाने वेटर बिल टेबलवर ठेवून निघुन गेला. ति त्याच्या समोर लाजत बसली होती. जणू आत ही दोघे अजून ही तरुण आहेत आणि तो तिला आता डेटला घेऊन जाणार असल्यासारख ती त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. त्याने बिलचा केस उघडला आणि पैसे ठेवून तिला “चलं” म्हटंल. जणू त्याला बिल कित झाला हे अगोदरच माहित होत.. दोघांनी ही कॉफे बाहेर येऊन वर आभाळाकडे पाहिलं काळोख दाटत चालला होता. परिसरात ओला गारवा बहरत होता. नुकती पावसाची सर येऊन रस्ते ओले झाले होते.. दिव्यांची रोशनाई हळूहळू शहराला उजाळत होती. दोघे ही त्याच समुद्रावर आले. ज्याच्या समोर तिने त्याला मिठी मारली होती. दोघ ही एकच विचार करत होते. आयुष्यचा एवढा प्रवास करुन ही तिला त्याची आणि त्याला तिची सोबत असण हे अजुनही उमगत नव्हतं. पण त्या दोघांमध्ये असं काही तरी होतं , ते फक्त दोघंच जाणत होते.. आयुष्याच्या वेलीवर ह्या नात्याच्या फुलांचा गंध अजून अर्धा असून ही पुर्ण बहरला नव्हता. त्यालाच त्याने हाफ लव्ह संबोधण दिलं होत. त्याने तिला त्याच्या डोळ्यासमोर आणलं. तिच्या हात आपल्या तळहातात घेतला. तिच्या डोळ्यात स्नेहपुर्ण पाहतं म्हटंल “ आय लव्ह यु…! ” ति त्याच्या कडे पाहत होती. त्याचे केस पांढरे झाले होते हा किंचतसा फरक सोडला तर त्याची शरीरयष्टी अजून तशीत मेंटेन केली होती. जशी त्याच्याकडे पहिल्यांदा नोट्स मागाताणा त्याची छवी तिने मनात साठवुन ठेवली होती अगदी तशी, तेवढ्यात जोराची मोठी लाट किना-याला आदळली आणि ति त्याला बिलगली…


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance