किशोर टपाल

Children Stories Others Children

5.0  

किशोर टपाल

Children Stories Others Children

माय ब्रेव्ह बॉय

माय ब्रेव्ह बॉय

2 mins
519


आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 जयंती. दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आम्ही सहकुटुंब घरात बाबासाहेबांना वदंन आणि पंचशील कार्यक्रमासाठी तयार झालो. मी नियमित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माल अर्पण करुन वदंन केलं. My Brave Boy.. तस्मय आता आठ वर्षाचा झाला आहे. बुध्द वंदना आता त्याला न चुकाता जमते. मी त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुध्द यांच्या आयुष्यातील घटना, प्रसंग सांगुन सत्य त्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. 


सध्या करोनाच्या काळात ऑनलाईन स्कुलमुळे त्याच्या शिक्षकांच्या ऐवजी , तो मला आणि मम्मीला प्रश्न विचारुन त्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधत ज्ञानात वाढ करुन घेत असतो. पण कधी – कधी त्याच्या प्रश्नांना त्याच्या मम्मीची उत्तरे बरोबर असतात. नेहमी प्रमाणे त्याने बुध्द वंदना म्हंटली. आम्ही 10 मिनिटे आनापान केले आणि रिलॅक्स होवुन सोफ्यावर बसलो. इतक्यात त्याने लाडात विचारलं “पप्पा… मला बाबांना भेटायचं… ! त्यांना Happy Birthday Wish करायचं ……” “ते कुठे असतात…?” हा प्रश्न नकळत आल्यावर मला काय उत्तर द्यावं. हे कळतं नव्हतं आता माझीच पंचायत झाली…मन भरुन आल होतं.. इतक्या किचनमधून त्याची मम्मी आली. तिने माझ्याकडे पाहिलं. तिला कळलं की, मला त्याच्या प्रश्नाच योग्य उत्तर देता येत नाही. तिने वेळ सांभाळली आणि त्याला सांगितलं “ते आता ह्या जगात नाही..” “ पण आपल्या मनामध्ये आहेत..” “ डोळे बंद करुन Wish कर..!”


त्याने लगेच डोळे मिटले …… “Wish you Happy Birthday..! ” आणि ”Thank You बाबा…!” म्हटल. मी दोघांकडे पाहिलं आणि स्वतःशीच विचार केला. तिने अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न निकाली काढला आणि मी भावनिक होऊन त्या प्रश्नाकडे पाहत होतो….. मी सुटकेचा निःश्वास सोडला….


Rate this content
Log in