एक न उलगडलेले हस्य कथा
एक न उलगडलेले हस्य कथा
महानगरातील उच्चंभु लोक वस्तीचा परिसर येथे रांगेत सर्व श्रीमंत लोकांचे बंगले एका आजुबाजुला गगनचुंबी इमारती तर दुस-याबाजुला गगनचुंबी इमारतींना स्पर्धा करणारी दोन-तिन मजली चाळीच्या इमारती आणि झोपडपट्टी. रात्रभर पाऊस पडून शांत झाला होता. महानगरपालिकेच्या सकाळच्या शिफ्टचे सफाई आणि मल:निसारण खात्याचे कर्मचारी आपल्या चौकीवर येऊन , हजेरी लावून त्यांच्या ठरवून दिलेल्या विभागातील परिसरात साफ सफाईचे काम करत होती.. रात्रीच्या जोरदार पावसामुळे परिसरात कुठे गटर , नाल्यांमध्ये केर-कचरा , गाळ आडकुन पाणी साठले आहे किंवा नाही ह्याची पाहाणी करुन खातरजमा करण्यासाठी त्यातील दोन कर्मचारी उच्चंभु लोक वस्तीच्या परिसरात चालता-बोलता फिरत असताना ज्या ठिकाणी रात्री जोरदार पावसामुळे काम बंद कराव लागल होतं त्या ठिकाणी पासुन थोड्या दुर अंतरावर असताना त्यातील एकाचे लक्ष मॅनहोलच्या बाजुला एकही बोर्ड कसा काय नाही? म्हणून आजुबाजुला पाहिलं तर ते दुरवर जाऊन पडले होते. मॅनहोलमधुन सांडपाणी पुर्ण रस्त्यावर पसरुन वाहत होत. त्यांनी जवळ जावून पाहिलं. मॅनहोलच्या काळ्या पाण्याच्या लगद्यात दोन मृतदेह वर तरंगत होते. त्यांनी लगेच जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जावून ही माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहिलं इन्फेक्टर साहेबांनी आपल्या सहकर्मचा-याला सांगुन मृतदेहाचे पंचनामे करायला सांगितले. त्याप्रमाणे दोन्ही मृतदेह मॅनहोलमधुन बाहेर काढण्यात आले. त्यातुन काढल्या- काढल्या सांडपाण्याचा दुर्गंधीयुक्त वास हवेत पसरला. त्यातील एक शव स्त्री आणि एक पुरषाचं होतं. त्यांच्या चेह-यावर गाळ असल्यामुळे माश्या त्याच्यांवर भिंनभिणु लागल्या. त्यांची ओळख पटण्याकरिता हवलदाराने दोन्ही मृतदेहाच्या चेह-यावर पाणी सोडल. दोन्ही चेहरे स्वच्छ झाले. इन्फेक्टरने पाहिलं दोघे ही तरुण वयातील होते. त्यांनी मुलीची पर्स चेक करायला सांगितली. साहेबांनी सांगितल्या प्रमाणे हवलदाराने पर्स मध्ये पाहिलं. मेकअप किट , रुमाल, आणि एक आयकार्ड सापडलं ते कॉल सेंटरच्या कंपनीच कार्ड होत. ह्यावर तिची ओळख आणि कामाचे ठिकाण ह्याची माहिती दिली होती. दुस-या मृतदेह तरुण मुलाचा होता. त्याच्या तोडातुन दारुचा वास येत होता. त्याच्या खिश्यात काही सुट्टे पैसे आणि पाकिट फक्त सापडलं. त्यात काही फोन नंबर लिहिलेले कागद , शॅपिंग बिल , आणि एक आयकार्ड पण तेही इतक खराब होत की त्याचं आहे हे निश्चित होत नव्हतं.. इन्फेक्टर साहेबांनी पुराव्याचे पंचनामे करुन दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमला पाठविण्यासाठी सांगुन पोलिस स्टेशनला आले…
इन्फेक्टर साहेब पोलिस स्टेशनला येवून टिव्ही ऑन केला. एव्हाना मिडीयाच्या बातमीदारांनी ह्या घटनेला अनोखा रंग देवून तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली..
पहिल्या चॅनेलवर “ ह्यात महापालिकेची चुक आहे रात्री अपरात्री मॅनहोल खुले ठेवून लोकांना मारण्याचा विचार महापालिका करत आहे आणि तिचा कारभार आता लोकांच्या समोर आणण्यात त्याना कसं यश आलं हे सिध्द करत होते.. ”
इन्फेक्टर साहेबांनी हातातल्या रिमोटने चॅनल चेंज केला..
इतक्यात एक महिला एका आठ वर्षाच्या मुलाला घेवून पोलिस स्टेशनमध्ये आली. तिने तिची तक्रार नोदंवीली की तिचा नवरा रात्री पासुन घरी आला नाही. इन्फेक्टर साहेबांनी नाव आणि वय विचारलं ते सकाळी सापडलेल्या मृतदेहाशी मिळत जुळत होतं… तेवढ्यात मृतदेहाशी संबंध असलेल्या स्त्रीने टिव्ही वरील बातमी ऐकली..
दुस-या चॅनेलवर “ तो विवाहित तरूण होता. त्याच त्या मुलीसोबत विवाह बाह्य संबंध असल्यामुळे त्यांच्या किंवा तिच्या घरच्यांनीच काटा काढलेला असणार..”
ति रडु लागली.. त्यामुळे त्यांनी पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला..
तिसरा चॅनेलवर “ तो दारुड्या होता. तिला दारु पिवून रस्त्यात मारहाण केली असणार म
्हणुन तिने त्याला ढकलं असणार आणि नंतर पश्चाताप करुन स्वत: उडी मारली असेल..”
तिला रडु आनावर झालं …पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला..
इतक्यात एक दापंत्या जोडी पोलिस स्टेशनमध्ये आली. त्यांनी त्यांची मुलगी काल रात्री पासुन घरी आली नाही. पण ऑफिस मधुन निघाली होती.. त्यानी पण तिचं नाव , वय आणि कामाला कुठे होती ते विचारलं ते सकाळी सापडलेल्या मृतदेहाशी मिळत जुळत होतं… तेवढ्यात तिच्या आईच लक्ष टिव्ही वरील बातमी कडे गेलं..
चौथ चॅनेलवर “ दोघे तरूण एमकेमांवर खुप प्रेम करत होते. पण मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे दोघांनी मॅनहोलमध्ये उडी मारुन आत्महात्या केली..”
ति पण रडु लागली.. त्यामुळे त्यांनी पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला..
पाचवा चॅनेलवर “ दोघे ही वेडे होते.. नाहीतर ऐवढ्या रात्री पावसात कशाला बाहेर आले होते..वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये चौकशी केली पाहिजे.. ”
वरील बातमी पाहुन तिच्या वडीलांनी इन्फेक्टर साहेबांशी संवाद साधला. खुप दिवस झाले तिच्या चेह-यावर वैतागलेला, रागीट भाव होता. पण ति वेडी नव्हती.. त्यांचे डोळे ओलावले होते.
इन्फेक्टर साहेबांनी पुन्हा चॅनल चेंज केला..
सहावा चॅनेलवर “ तो वेडा होता त्यानेच तिला ढकली असणार आणि नंतर दारु पिवून येथे रडत बसला असेल आणि पडला असेल..”
पुन्हा चॅनल चेंज केला..
सतवा चॅनेलवर “ तो दारु पिवून पडला असेल ति त्याला वाचवण्यासाठी पुढे आली असेल आणि ति पण खाली पडली असेल.. ”
चॅनेल चेंज करता-करता त्यांना आठवलं की, त्या उच्चंभु लोक वस्तीच्या परिसरात सीसीटीव्ही कॉमेरे नुकतेच लावण्यात आले आहेत.. त्यांनी त्याची फुटेज सहकर्मचा-याला सांगुन मागवली..
थोड्या वेळाने सहकर्मचारी अगोदरच्या रात्रीची सीसीटीव्ही फुटेज घेवून आला..ति त्याने कॉम्पुटरवर सुरु केली… खुप वेळ पाहिल्या नंतर त्यांच्या समोर काही दृष्य आली..
बंगल्याच्या परिसरातील कोणीतरी मॅनहोल चोकअप झाल्याची तक्रार केली होती. त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी तो चोकअप काढण्याचं काम करत होते. काम करत असताना जोरदार पाऊस सुरु झाला. अर्धा-एक तास ते पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. पण तो काही केल्या थांबत नव्हता म्हणुन त्यांनी ते काम पाऊस थांबल्यावर करु , तसेच जर ह्या पावसात मॅनहोल बंद केला तर सांडपाणी बंगल्याच्या आत परत फिरण्याची शक्यात होती आणि हा परिसर उच्चंभु लोक वस्तीचा असल्या कारणामुळे तसे करणे चुकीचे होते. म्हणून मॅनहोलच्या चार ही बाजुने “ मॅनहोल चे काम चालू आहे.. ” ह्या सुचनेचे बोर्ड लावले आणि ते निघुन गेले. कर्मचारी निघुन गेल्या नंतर… जोराचा वादळी वारा सुटला.. सुचने बोर्ड इतरस्त उडून दुरवर जावून पडले.. काही वेळाने ज्या स्त्रीने तक्रार केली तिचा नवरा सीसीटीव्ही कॉमे-याच्या कक्षेत आला... तो खुप पिलेला होता. जोरदार वा-यासोबत तो जणू डुलत होता.. तो मॅनहोल जवळ आला. मॅनहोल अजून भरलेलं नव्हतं. तो खाली वाकला आणि त्याचा तोल जाऊन..तो मॅनहोलमध्ये पडला.. दीड तासांनी एक तरुण मुलगी पावसात घाबरत घावत सीसीटीव्ही कॉमे-याच्या कक्षात आली..तिच्या मागे कोणी तरी होतं अस वाटत होत..ति सारखी मागे बघुन पुढे पळत होती.. ति मॅनहोल जवळ आली आणि पाय घसरुन पडली… पण तिच्या पाठी कोण लागल होतं ते त्या सीसीटीव्ही कॉमे-याच्या कक्षेत आला नाही….कारण स्पष्ट होतं की, त्याला माहिती असणार पुढे सीसीटीव्ही कॉमेरे लागले आहेत…
सीसीटीव्ही फुटेजच दृष्य पाहुन इन्फेक्टर साहेब स्वत:शीच हसले आणि म्हणाले ह्यात ना महापालिकेचा दोष होता. ना कोणी कोणाला मारलं होत. ना हे प्रेम प्रकरण होत.. ही नैसर्गिक आणि अनावधानाने घडलेली घटना होती. पण सकाळ पासुन जो मिडीयाच्या बातमीदारांनी तर्क-वितर्क लावुन ही बातमी रंगवली होती… ह्या सर्व खोट्या ठरल्या होत्या..