फरक...
फरक...


मुसळधार पाऊस आणि पावसामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यात पाणी साचणे हे नेहमीचेच.
कशीबशी हातातली छत्री सावरत तो घराच्या ओढीने निघाला आणि रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडला. हे फक्त त्या छत्रीमुळे लक्षात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत आणखी एक हा फरक वरच्यांना नाही मात्र घरच्यांना नक्कीच पडला होता.