अलक
अलक
अलक
एक रविवार...
तो नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि तिच्याकडे बघितले. ती सुद्धा रोज लवकर उठून लगबगीने सारी कामे आटोपायची पण आज मात्र ती अजूनही गाढ झोपेत होती.
त्याने तिला न उठवता हलकेच दार ओढून घेतले.
तो जाणून होता की सोमवार ते शनिवार कडक ड्युटी आणि धावपळ केल्यानंतर येणारा फक्त एक रविवार तिचा होता.
@अरुणा गर्जे
