Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Pallavi Udhoji

Inspirational


3.8  

Pallavi Udhoji

Inspirational


लॉकडाऊनमधली शाळा

लॉकडाऊनमधली शाळा

2 mins 1K 2 mins 1K

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक जणांचे हाल होत होते. अशातच शाळेतल्या पाठक सरांची बातमी कानावर आली. धारदार नाक, तेजस्वी कांती, जाड फ्रेमचा चष्म्यातून त्यांची भेदक नजर, खाऊन-पिऊन आणि कसून कमावलेल्या शरीराबरोबरच ओठांवर उमटलेलं त्यांचा हसू, सर्वगुणसंपन्न असे आमचे पाठक सर आज अनंतात कोरोनामुळे विलीन झाले. शाळेत ते एकच असे शिक्षक होते जे खूप कडक शिस्तीचे, मुलांना यथा योग्य मार्गदर्शन करणारे जेवढे कडक होते तेवढेच आतून निर्मळ मनाचे होते. त्यांच्या जाण्याने पूर्ण गाव हळहळत होतं. कदाचित शाळेला हे दुःख सहन नाही झाले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण भारतातल्या शाळा बंद झाल्या. बहुदा हा विरह शाळेला पण सहन झाला नाही.

   

त्यांच्या घरी स्मशानशांतता होती. सुनंदाबाई सरांच्या पत्नी शोकाकुल अवस्थेत होत्या. सरांचा भरवश्यावर त्यांच्या घराची भिस्त अवलंबून होती. दोन लहान मुल पदरात टाकून ते कायमचे निघून गेले. कोरोनामुळे अनेक जणांचे हाल होत होते. दुःखाचा डोंगर सुनंदाबाईच्या अंगावर कोसळला. वडीलोपार्जित जमीन त्यांच्या भावांनी बळकावून घेतली. त्यानंतर ते कसेबसे आपले कुटुंब पोसत होते. शाळा बंद झाल्यामुळे पैसा, जेवण नसल्यामुळे सर्वांचे हाल होत होते. विचार करून करून सुनंदाबाईचे डोके सुन्न पडले. अशाच एका रात्री दोन्ही मुलाला सोडून काहीही विचार न करता एका पिशवीत दोर कोंबला आणि आत्महत्येचा विचार करून लगबगीने ती निघाली.

   

ढग भरून आले होते, सोसाट्याचा वरा सुटला होता, झपझप पावलं टाकत ती टेकडीवरच्या देवळात गेली. कोरोनामुळे देऊळ बंद होते. बाहेरूनच तिने देवाचे दर्शन घेतले व माझ्या मुलांचा सांभाळ कर अशी प्रार्थना केली आणि इतके वर्ष ज्या शाळेची सेवा ह्यांनी केली त्या शाळेत एकदा जाऊ असा विचार करून ती शाळेत गेली. शाळेकडे एक नजर टाकली व मागे फिरणार तेवढ्यात तिला रडण्याचा आवाज आला. तिने मागे वळून बघताच तो आवाज विरहात जगणाऱ्या शाळेचा होता. तिला खूप भीती वाटली.


"ए बाई, तू काय करायला चालली आहेस. आज तुझ्या नवऱ्याने इतकी वर्ष ह्या शाळेत घालवली, आपला मानसन्मान विद्यार्थ्यांच्या मनात, लोकांच्या मनात निर्माण केला. आज तू तो धुळीला मिळवायला चालली. आज कोरोनामुळे लोकांचे हाल होत आहे म्हणून ते आत्महत्या करत आहे का? अशी कशी भेकड बाई तू. तुझ्या मागे मुलांचे काय होईल. जरासुद्धा तुझ्या मनात विचार का नाही आला? आज सरांच्या जागी तू नोकरी करून आपले कुटुंब पोसू शकते व त्यांचा मानसन्मान टिकवू शकते. जा पोरी, मागे फिरून. हे कोरोना नावाचं वादळ लवकरच शमेल. कुठलेही युद्ध जास्त दिवस नाही टिकत. जा पोरं तुझी वाट बघत असतील. आज मी ह्याच विरहात जगत आहे. रोज येथे होणाऱ्या चिमुकल्यांचा कल्लोळ एकदम शांत झाला आहे. मी पण त्यांची वाट बघत आहे. जा, अस करू नकोस. येवढं बोलून तो आवाज बंद झाला. सुनंदाबाईंना आपली चूक समजली. आज आपण काय करून बसलो असतो. ती धावत घरी जाते तिचे मुलं शांत झोपली असतात. आज त्याचं पोरांच्या ममतेने तिला एक नवं आयुष्य मिळालं.


Rate this content
Log in

More marathi story from Pallavi Udhoji

Similar marathi story from Inspirational