Pallavi Udhoji

Drama Inspirational

2  

Pallavi Udhoji

Drama Inspirational

समाधान

समाधान

2 mins
3.1K


अगं ए कुमुद, चलतेस का आटप लवकर. आपल्याला निघायचे आहे. दिवसभराचे काम आटोपून कुमुदनी आपली पॅकिंग केली आणि छान हिरव्या काठाची लाल कलरची साडी नेसून तयार झाली. सुधाकरने एक नजर तिच्याकडे टाकली. आणि ते बघतच राहिले. मुलाला वाढवता वाढवता त्यांचं कधी कुमुदकडे लक्ष गेले नाही... नव्हे त्यांना दोघांनाही एकमेकांकडे बघायला वेळ नव्हता


राहुलला शिकवण्यासाठी पूर्ण आयुष्य काटकसर करून ओव्हरटाईम करून त्यांनी त्याचे शिक्षण केले. आता राहुल परदेशात वेल सेटल झाला पगारही चांगला मिळतो. सुधाकरने ठरवले की आता आपण आपलं आयुष्य जगायचं. म्हणून तिला आज ते बाहेर हिलस्टेशनला फिरायला घेऊन चालले. राहुल आधी बरोबर दर महिन्याला पैसे पाठवायाचा पण तेही आता कमी कमी होऊ लागले.


ऑटो दारात उभी राहिली, दोघेही जाण्यासाठी ऑटोत बसले. रस्त्याभर कुमुदला एक गोष्ट खटकत होती. यांनी एवढा पैसा कुठून आणला. अहो मी काय म्हणते एवढा खर्च. बस एवढेच वाक्य ऐकताच सुधाकरने मध्येच तिचे बोलणे काटले. मी बोललो तुला, पैशाचा विषय काढायचा नाही. चार दिवस दोघांनी मनमुराद आनंद लुटला. जेव्हा आनंदाचे दिवस घालवायचे तेव्हा घालवू नाही शकलो चला आता आपण आपले दिवस मजेत काढूया. अहो पण मी काय म्हणते. चूप काही बोलायचं नाही. सुधाकरने तिला बोलू दिले नाही.


चार दिवस मजेत गेल्यानंतर ते जायला निघाले. कुमुदचे लक्ष लागेना तिने पुन्हा तोच प्रश्न केला. तुम्ही कोणाकडून उधार घेतले का? असे असेल तर कशाला. आपण आधी जसे राहत होतो तसंच राहू इतके वर्ष तुम्हाला साथ दिली, आता दिली नसती का? तुम्ही म्हणाला तर मी आताही तुमच्यासोबत मी आपली प्राणज्योत मालवू शकते. एवढं बोलताच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा सुधकारने सगळे तिला समजून सांगितलं.


अगं मी जेव्हा नोकरी करायचो तेव्हा मी चुपचाप प्रत्येक महिन्यात काही रक्कम बाजूला काढून ठेवायचो. तेव्हापासून रिटायर होईपर्यंत बरीच रक्कम जमा केली. अजूनही आपण आपले काही वर्ष आरामात घालू शकतो इतकी रक्कम आहे आपल्याकडे. मी राहुलला हे सांगितलं, तो आधी नाही म्हणाला म्हणून तो आपल्याला पैसे कमी पाठवत होता. त्यालापण कोणासमोर हात पसरायची वेळ नको यायला. आपण दोघेही कसेही राहू. आपल्याला लागतं काय या वयात. दोन पोळ्या आणि भाजी आपण आपले दिवस कसेही काढू. अगं वेडे, ही आपली सुरुवात आहे यावर्षीपासून प्रत्येक वर्षी आपण फिरायला जाऊ. कळलं. मी इतका मूर्ख आहे काय, की उधारीच्या पैशांत तुला फिरायला घेऊन जाऊ. हे ऐकून कुमुदच्या डोळ्यातून आसवांनी गर्दी केली आणि ते पुरावाटे ते डोळ्यातून ओघळायाला लागले. ते अश्रू आनंदाचे होते, आनंदाश्रू समाधानाचे होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama