Pallavi Udhoji

Drama

4.2  

Pallavi Udhoji

Drama

अहंभाव नडला

अहंभाव नडला

3 mins
161


आज मनिषाला कोर्टातून यायला उशीर होतो. रूमवर आल्यावर तिची काहीच करायची इच्छा नसते. कॉफी करुन ती झोपते. पण काही केल्या तिला झोप येत नाही. खूप उशिरा तिला झोप लागते. सकाळी उशिरा उठते. चहा करायला जाते. पण अजूनही डोक्यातील विचार तसेच असतात. विचार करता करता दूध उतू जातं तिचं लक्षच नसतं. ती अचानक भानावर येते. अरे राम, किती दूध उतू गेलं. असं मनात म्हणून ती सगळं साफ करते. चहाचा कप घेऊन खिडकीत बाहेर बघते. तोच मोबाईलचा मेसेज टोन वाजतो. लक्ष मोबाईलमध्ये जात. मिलिंद तिचा नवरा त्याचा, हाय म्हणून मेसेज येतो. कशाला हा मेसेज पाठवतो. ती दुर्लक्ष करते पण वारंवार फोन वाजतो. तिला खूप राग येतो रागरागात ती फोन उचलते. आता कशाला मला त्रास देतो. मिलिंद म्हणतो अजूनही तू तशीच आहेस. रागावलीस का.


ती न बोलताच फोन ठेवते. ती आपला मोबाईल ऑफ करते आपल्या कामाला लागते. दिवसभर कोर्टात तिचं काही मन लागत नाही. त्यांचा घटस्फोट होऊन पाच वर्ष होतात. क्षुल्लक कारण असतं. इथे दोघांचाही अहंभाव आड येतो.


मनिषा कोर्टातून घरी येते. मनात विचारांचं चक्र चालू असतं. संध्याकाळी तिला पुन्हा मेसेज येतो. आता मात्र तिचा पारा चढतो. ती कॉल करते.


तुला कळत नाही का मी रिप्लाय देत नाही याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाही ते. मिलिंद म्हणतो, अगं राणी, तू अजूनही तशीच आहे नाकाच्या शेंड्यावर कायम तुझा राग असतो. मला तुला भेटायचं आहे. ती आधी नाही म्हणते मग विचार करते की एकदा भेटायला काय हरकत आहे. काय म्हणणं ते आधी बघुया. संध्याकाळी सात वाजता रूमवर ये. असं म्हणून ती फोन ठेवते.

आजही तिच्या मनाच्या कोपऱ्यात त्याच्याविषयी प्रेम हे असतंच. कारण प्रेम हे अविनाशी आहे.


जसेजसे सात वाजायला लागतात तिच्या हृदयाची स्पंदने जोर धरू लागतात. दारावरची बेल वाजते. मनिषा दार उघडते तर दारात कोणीच नसतं. ती मागे वळते तोच तिचा हात पकडतो ती जोरात ओरडते आणि त्याला ढकलते.


वेडे, मी आहे. अजूनही काहीच बदल नाही झाला तुझ्यात.


तो म्हणतो, दोन दिवस झाले मला तुझी खूप आठवण येत आहे. तुझ्याशी आधी बोलावं. त्यावेळी माझे काहीच चुकले नव्हते. तू काही शहानिशा न करता मला तू डिव्होर्स पेपर्स पाठवले. मग मला पण खूप राग आला मी काही विचार न करता सह्या करून पेपर पाठवले.


मनीषा म्हणते, मी तुला डिव्होर्स पेपर्स पाठवलेच नव्हते तूच माझ्या टेबलवर ठेऊन गेला होतं. मग मला पण राग आला दिले सह्या करून पेपर्स.


मग दोघांच्याही लक्षात सगळं येतं. आपण सगळी शहानिशा करून घ्यायला हवी होती. आपले पाच वर्ष वाया नसते गेले. हे नक्कीच दुसऱ्या कोणाचे काम आहे. दोघंही एकमेकांची माफी मागतात.


तो तिच्या जवळ येतो ती थोडी दूर जाते तो आणखी जवळ जातो आणि तिला आपल्या बाहुपाशात ओढून घेतो. आणि दोघंही प्रेमाच्या डोहात आकंठ बुडतात.


फक्त एक अहंकार त्यांना पाच वर्ष दूर ठेवतो.


तात्पर्य : आपल्या आयुष्याच्या चक्रामध्ये अत्यंत प्रभावी व महत्त्वपूर्ण परंतु गरजेचे असलेले दोन स्वभावगुणधर्म आहे. एक म्हणजे प्रेम आणि दुसरा अहंकार. कधी कधी अहंकाराचा विजय होतो. वरील कथेत पाच वर्ष अहंकाराने विजय मिळवला होता पण शेवटी प्रेमाचाच विजय होतो. चुका सुधारण्यासाठी वेळ जरी नसला माफी मागून जो पुढे जातो तोच तरतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama