Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

Manda Khandare

Drama Inspirational

4.5  

Manda Khandare

Drama Inspirational

जरा विसावू या वळणावर

जरा विसावू या वळणावर

10 mins
1.1K


पाटील काकू रोजच्याप्रमाणे सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडल्या. समोरच्या बागेत त्यांच्या काही मैत्रिणी मिळून प्राणायाम करायच्या आणि परतीच्या वेळी काही बागेतील फुले घेऊन त्या घरी येत असत. हा त्यांचा नित्यनियम होता.गेल्याच वर्षी त्या या सोसायटीत राहायला आल्या होत्या.


पाटील काकूंचे पूर्वीचे घर म्हणजे छान टूमदार बंगलाच होता. पाच वर्षा आधी त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या भल्या मोठ्या बंगल्यात काकू ऐकट्या झाल्या.त्यांच्या दिराला ही गोष्ट नेहमी खटकत होती. त्याला वाटायचे की एवढ्या मोठ्या घराचा, संपत्तीचा वहिनी एकट्याच उपभोग घेत आहेत, त्यांची मुलगी ही शिमल्याला राहते आणि आम्हीदेखील नोकरीनिमित्त बाहेर गावी राहतो, म्हणून त्याने वाटणी चा मुद्दा काकूंपुढे मांडला. काकूंनी आपल्या मुलीला आणि जावयाला बोलावून घेतले. त्यांचा जावई त्यांच्या मुलाप्रमाणे होता. काकांचे बोलणे त्यांनी सर्व ऐकून घेतले, वडिलोपार्जित घर असे कसे विकायचे म्हणून त्यांच्या विनवण्यादेखील केल्या पण ते ऐकण्याच्या पलीकडे गेले होते, आणि वाद नको म्हणून काकूंनी त्यांना होकार दिला. कागदोपत्री काय व्यवहार आहेत तो जावयाच्या हातून करून घेतला व घर विकून एक भली मोठी रक्कम काकूंच्या हाती आली. त्यांनी जवळच सोसायटीत एक छान सुबक फ़्लॅट घेतला कारण त्यांच्या मैत्रिणी, ती बाग, जवळचे मंदिर हे रोजच्या सवईचे झाले होते इतक्या वर्षात म्हणून त्यांनी त्याच घराच्या आजूबाजूने असलेले फ्लॅट बघितले होते. त्यांनी आलेल्या रकमेपैकी अर्धी रक्क्म मुलीच्या अकाउंटमधे टाकली होती आणि बाकी रक्कम आपल्या अकाउंटमध्ये ठेवली होती. 


मुलीने कितीतरी वेळा त्यांना आपल्याबरोबर शिलाँगला येण्यास म्हटले होते पण तिथे ऑॅक्सिजनची कमी होती ज्यामुळे काकूंची तब्बेत तिथे नेहमीच खराब व्हायची, त्यांचा बीपीचा त्रास वाढायचा म्हणून त्या तिथे जायला फारश्या उत्सुक नव्हत्या. त्यापेक्षा त्यांना इथे राहणेच पसंद होते. त्यांच्या बाजूच्या फ़्लॅटमधे एक ख्रिश्र्चन गृहस्थ रहायचे. त्यांचे नाव पीटर डिसिल्वा. चांगले उंच पुरे, देखणे व आयकर विभागातून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झालेले. दोघांचे फ्लॅट आजूबाजूने असले तरीही त्या दोघांचे कधीच पटले नाही. कधी साधे ते बोललेदेखील नाही. काकू म्हणजे पूजापाठ करणाऱ्या व सर्व सोवळं-ओवळं पाळणाऱ्या आणि डिसिल्वासाहेब म्हणजे मांसमच्छी खाणारे व कधीकधी ड्रिंक वगैरे पण करणारे. त्यांचा खरेतर काकूंना काहीच त्रास नव्हता पण काकू सदानकदा त्यांना बघून कटकट करायच्या. त्यांना साधा वास जारी आला मांस, मच्छीचा तरी त्या अंघोळ करून घेत असत. डिसिल्वा स्वभावाने खूप शांत होते. ते कधी कुणाच्या भानगडीत नाही पडायचे पण काकूंना त्यांचा खूप भयंकर राग यायचा. तश्या ही त्या आजकाल फार चिडचिड करायच्या. त्याने त्यांचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला. त्या एकट्या राहायच्या, दिवसभर बोलायला कुणी नसायचे. याच कारणांनी त्यांचा स्वभाव बदलला होता. डिसिल्वा दिसले की नको नको ते त्यांना बोलायच्या... त्यांच्याकडे न पाहता, जोराजोरात स्वतःशी. पंचावन्न वर्षाच्या काकू आणि बासष्ठ वर्षाचे डिसिल्वा यांचे हे असे अबोल विस्तवाचे पण जवळचे नाते.. 


एकदा सकाळी काकू दारासमोर रांगोळी काढत बसल्या होत्या, इतक्यात डिसिल्वा नेहमीप्रमाणे चिकन घेऊन आले आणि दार उघडायचे म्हणून किल्ली काढण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवी तिथेच भिंतीला टेकून ठेवली, काकूंना त्यातील चिकनचा वास आला. त्या रागारागाने नाकाला पदर लावत उठल्या आणि घरातून बादलीभर पाणी आणून नुकत्याच काढलेल्या रांगोळीवर आणि भिंतीवर टाकून दिले. डिसिल्वाने काहीही न बोलता चुपचाप दार बंद केले. काकू ज्यावेळी बाहेर ऊभ्या असतील त्या वेळी ते सहसा बाहेर निघायचे टाळत असत.


त्या दिवशी रोजच्यानुसार काकू सकाळी बागेत जायला निघाल्या, लिफ्टचे बटन दाबून बघितले तर कळले वीज गेलीय संपूर्ण सोसायटीची व एखाद्या तासात येईल. वाट न पाहता काकू सरळ पायऱ्यांनी खाली उतरल्या. त्यांना साहजिकच वाटले की परत येऊ तोवर वीज आलेली असेल, पण त्यांना जरा गरगरल्यासारखे होत होते म्हणून त्या लवकर परत आल्या, जीव ही घाबरत होता त्यांचा. पण सोसायटीमधे येऊन बघतात तर वीज अजून आली नव्हती. शेवटी काकूंना पायऱ्या चढत चौथ्या मजल्यावर जावे लागले. त्याने त्यांना अजुनच धाप लागली. दाराजवळ येऊन त्यांना जोरदार भोवळ आली आणि त्या तिथेच कोसळल्या. 


काहीतरी पडल्याचा आवाज डिसिल्वासाहेबांना आला आणि त्यांनी दार उघडून बघितले व काकूंना असे पडलेले बघून तेच घाबरले, त्यांच्या कामवाल्या बाईला आवाज देऊन त्या दोघांनी काकूंना डिसिल्वाच्या घरात आणून सोफ्यावर झोपवले आणि डॉक्टरला फोन करून बोलावून घेतले. थोड्या वेळाने काकूंना शुद्ध आली. समोर डॉक्टरांबरोबर डिसिल्वाला बघून त्या एकदम उठून बसल्या. इकडेतिकडे नजर फिरविली तेव्हा त्यांना कळले आपण कुठे आहोत ते. त्या चिडल्या, माझा धर्म भ्रष्ट केला, मला पाप लागेल आता, मांसमच्छी खाणाऱ्याच्या घरात मी आली, मला पाणीदेखील पाजले की काय? देवा त्यापेक्षा माझा जीव घ्यायचा होता रे देवा! त्या उठणार की तेवढ्यात त्यांना परत चक्कर आली. डॉक्टरांनी त्यांना तिथेच झोपायचा सल्ला दिला. म्हणाले, अहो काकू, तुमचे बीपी आणि शुगर खूप वाढले आहे, तुम्ही आराम करा, तुमचा धर्म वगैरे काही भ्रष्ट नाही झाला. तुमच्या नळाला जे पाणी येत तेच पाणी डिसिल्वा साहेबांकडे येतं. पाण्याचा कुठला धर्म असतो का काकू? ते सर्वांसाठी सारखेच असते आणि यांनी जर तुम्हाला उचलून घरात आणले नसते तर तुम्ही कोमातसुद्धा जाऊ शकल्या असत्या. त्यांनी माणुसकी सोडली नाही आपली. मग तुम्ही का अश्या वागता? का भेदभाव करता अश्या. धर्म, जात, पात हे सर्व मानवाने आपल्या स्वार्थासाठी बनवलेले आहेत, त्याला हवे तेव्हा, हवे तसे तो या जातीच्या लेबल्सचा वापर करून आपला फायदा करून घेतो व नेतेमंडळी लोकांना भडकवून, चुकीच्या अन्यायकथा सांगून आपसात लढवून आपली पोळी शेकून घेतात व सामान्य लोक एकमेकांचा दुस्वास करत लढत राहतात आणि तुम्ही म्हणता यांच्या घरात बसल्याने, तुमचा धर्म भ्रष्ट झाला..? काकू, तुम्हाला माझे नाव माहित आहे ना काय आहे ते," डॉक्टर शोएब खान, मी मुस्लिम आहे, मी मांस, मछली खातो, माझ्या हातचे तुम्हाला औषध, इंजेक्शन चालते, तुम्हाला चेक केलेले चालते तेव्हा तुमचा धर्म भ्रष्ट नाही होता का?" काकू सिर्फ इन्सानियत ही एक धर्म होता हैं, इतना ध्यान में रखिये, जात धर्माचा विचार जर यांनी केला असता तर आज तुमच्याबरोबर काहीही होऊ शकले असते. 


काकूंच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, मला माफ करा डिसिल्वासाहेब, मैंने आपको हमेशा भला बुरा बोला, इतना गुस्सा किया आपसे फिर भी आपने मेरी जान बचाई. मुझे माफ कर दीजिये, मुझे तो शर्म आ रही हैं अपने आप की." बेटा शोएब, तुमने मेरी आँखे खोल दी, तुम सच बोल रहे हो, सिर्फ इन्सानियत ही सच्चा धर्म हैं. नफरत से विनाश के अलावा कुछ भी हासिल नही होता है... असे म्हणत काकू उठल्या तेव्हा त्यांना परत चक्कर आली आणि त्या सोफ्यावर बसल्या, डॉक्टर शोएबने त्यांना मग अॅडमिट व्हायला सांगितले. दोन दिवस त्या अॅडमिट होत्या तेव्हा त्यांचे सर्व खाण्यापिण्याचे, औषध, फळे, सर्व डिसिल्वाने बघितले व या दोन दिवसांत त्यांची छान मैत्री झाली होती. काकूंना फार वाईट वाटायचे की आपण किती माणुसकी सोडून वागलो होतो, तरी डिसिल्वा कधी उलटून बोलले नाही की वाईट वाटून घेतले नाही आणि आज ही तेच सर्व सेवा करत आहेत, त्यांनी कधीच आपली माणुसकी सोडली नाही. त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता. 


दोन तीन दिवसांनी काकूंना घरी आणले. त्यांनी पुढे कधीच जात धर्माची उगाचची कट्टरता व कटुता पाळली नाही. त्या केव्हाही आता डिसिल्वाच्या घरी येत जात होत्या. महाराष्टीयन खमंग पदार्थ त्या आवडीने खायला द्यायच्या त्यांना. भाजी, फळे आणायला ते सोबतच जात असत. सायंकाळी डिसिल्वा जबरदस्ती काकूंना वॉकला घेऊन जायचे. ते दोघे सोबत योगाच्या क्लासलाही जाऊ लागले. त्या दोघांचा वेळ छान आनंदात जात होता. काकूंची तब्बेत पण व्यवस्थित राहात होती. त्यांची वाढती मैत्री ही सोसायटीत चर्चेचा विषय होऊन बसली होती. लोकांचा त्यांना बघण्याचा दृष्टिकोण बदलत चालला होता. हळूहळू त्यांच्या कानावरही कुजबूज येऊ लागली पंचावन्न वर्षांच्या पाटील काकू आणि बासष्ठ वर्षाचे पीटर डिसिल्वा यांना या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला. काकुंनी हळूहळू बाहेर जाणे बंद केले. त्या आपल्याच कोषात गेल्यागत झाल्या. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना जोरदार हाय बीपीचा अटॅक आला. डॉक्टर शोएबला कारण कळले त्यांच्या अटॅकचे तेव्हा सोसायटीतील लोकांशी बोलायला पाहिजे म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली तिथे. "मला तुमच्यापैकी जवळपास सर्वच लोक ओळखतात, पण मी आज डॉक्टर या नात्याने तुम्हाला भेटायला नाही आलो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत... तुमच्या सोसायटीत त्या रमा पाटील काकू राहतात, त्या कुठे आहेत, त्या नाही आल्या मीटिंगला... मी तर सर्वांना निरोप दिला होता, कुठे आहेत त्या...?


शर्मा बाई हळुच म्हणाल्या, देखो ना वो डिसिल्वा साहब भी नही आये. गये होंगे घुमने दोनों. साऱ्या बायका दबक्या आवाजात हसायला लागल्या. डॉक्टर शोएब एकदम चिडले, "शर्म आनी चाहिये आप लोगों को... किसी के बारे में ऐसा बोलने से पहले जरा उनकी उम्र का तो खयाल किया होता। वो बासठ साल के डिसिल्वा साहब, उनके बारे में ऐसा बोलते हो., छी छी कितनी घटिया सोच हैं आपकी. तुम्हारी उम्र के बेटे हैं उनके जो अपनी अपनी फॅमिली के साथ देश के बाहर रहते है, इन्हे वहां अच्छा नही लगता, यहा अपने लोगों के बीच उन्हे रहना है, इसलिए वो यहा अकेले रहते है. और वो पाटील काकू, उन्हें तो सिर्फ एक बेटी हैं वो भी शिलाँग में रहती है, वहां काकू की तबियत ठीक नही रहती इसलिये वो अपनी इकलौती संतान के पास नही रह सकती. लेकिन आपको मै ये सब क्यू बता रहा हूँ... आपको तो कोई फरक नही पड़ता की वो कहाँ है, कैसे हैं, आपको तो बस एक गाॅसिप का टॉपिक मिल गया है। वो साथ दिखे तो आपको बोलने का मौका मिल जाता हैं, लेकिन क्या आपने किसी ने भी उनकी कभी खैरियत पुछी, तबियत कैसी हैं, ये पुछा? किसी चीज की जरूरत हैं क्या ये पुछा? नही ना...


तो वो क्या करते हैं, क्या नही, ये क्यू जानना है आपको? पिछली बार भी दो दिन काकू अॅडमिट थी, उस वक्त भी आपमें से कोई भी मुझे वहा दिखाई नही दिया। मिसेस कुलकर्णी, तुम्ही सांगा बरोबर आहे का असे वागणे तुम्हा लोकांचे. अहो, उद्या तुम्हालाही याच वयातून जायचे आहे, हे कसे विसरलात तुम्ही. शर्मा भाभी, दो दिन से काकू हॉस्पिटल में अॅडमिट हैं. आपके इसी बर्ताव की वजह से उन्हें हाय बीपी होकर माईल्ड नर्वस ब्रेकडाऊन का अटॅक आया हैं, बडी मुश्किल से जान बची है. आपको पता भी है इस बात का !! डॉक्टर जरा चिडून बोलत होते, काकूंबद्दल ऐकून सर्वांना जणू शॉक लागला. शर्मा भाभी केविलवाण्या आवाजात म्हणाल्या, मुझे माफ कर दीजिये डॉक्टर साहब, मुझसे गलती हो गयी. मै खुद हॉस्पिटल जाकर उनकी माफी मांग लुंगी.


दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सोसायटीतील मंडळी हॉस्पिटलला पोहोचली. तिथे काकूंची मुलगी, जावई आलेले होते. डिसिल्वासाहेबही होते तिथे. शर्मा भाभीने आपल्या वागण्या, बोलण्याबद्दल काकूंची माफी मागितली. त्यांच्यामुळे ही वेळ काकूंवर आली याचे त्यांना फार वाईट वाटत होते. 

      

काकूंची मुलगी अपर्णा हिने डिसिल्वाचे आभार मानले, म्हणाली,"दोन्ही वेळी तुम्ही आईची खुप काळजी घेतली. आप नही होते, तो पता नही माँ का क्या होता. मुझे हमेशा लगता था की मुझे भाई चाहिये था जो माँ का खयाल रख सके, लेकिन आपके तो दो बेटे हैं फिर भी आप आज अकेले रहते हैं. आपको देखकर माँ मुझे बोलती हैं, "बेटों से तो बेटी भली है जो वक्तपर दौडकर तो आती है... आज मुझे लगता हैं अच्छा हुआ मुझे भाई नही हैं." अपर्णा आपल्या आईजवळ जाऊन बसली आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "मी एक निर्णय घेतला आहे, जो मला सर्वा समोर सांगायचा आहे. स्पेशली या सर्व सोसायटीतील लोकासमोर, सर्वांना माहित आहे आई एकटी राहते. तिला माझ्याकडचे वातावरण नाही सूट होत आणि मी इथे येऊन राहू नाही शकत. तसेच डिसिल्वा अंकलदेखील एकटे राहतात. हे दोघे सोबत फिरले, वॉकला सोबत गेले, बाजारात सोबत गेले, आपला वेळ त्यांनी सोबत घालविला, एकमेकांच्या सुखदुःखात साथ दिली, मदतीचा हात दिला तर यात चुकीचे काय आहे? का तुमच्या लोकांना त्यात वाईट व अनैतिक वगैरे दिसले..? ते दोघे काय सोळा, सतरा वर्षाचे आहेत का जे तुम्हाला त्यांचे वागणे बरोबर नाही वाटले..? ते दोघेही एकटे आहेत हो आयुष्यात. या वयात मानसिक आधाराची गरज असते, बोलायला व शेअर करायला कुणीतरी हवे असते, याच आधारासाठी, आणि आपल्या समवयस्क माणसांमधे राहता यावे म्हणून माणसे अनाथाश्रम किंवा वृध्दाश्रमांमधे जातात. पण मला नाही वाटत माझ्या आईने असा काही निर्णय घ्यावा. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की यानंतर आई आणि डिसिल्वा अंकल हे एकत्र राहतील.. ते दोघेच आता एकमेकांसाठी 'समाज' व त्यांची नियमावली तेच ठरवतील. काय चांगले व वाईट हे त्यांना त्यांचे ठरवू देत. त्यांच्या कंफर्ट लेवल व लिमिट्स वगैरे यांत कृपया कोणीही डोके लावू नये व नैतिकतेचे न्यायाधीश बनू नये अशी नम्र विनंती आहे...!! 


सर्वांच्या एकसाथ तोंडून निघाले... काय? म्हणजे? लिव्ह इन रिलेशनशिपमधे म्हणजे आजकालच्या मुलांसारखे..? सोसायटीतील लोक आपसात कुजबुजत होती. एकदम काकू खूप चिडल्या, अगं, तुला वेड वगैरे लागले का अपर्णा, काहीही काय बोलते, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही.? जावयासमोर काय भलतेसलते बोलते आहेस?

अपर्णा म्हणाली, आई! मी जे बोलते आहे ते योग्यच आहे आणि तुझ्या, डिसिल्वा अंकलच्या, माझ्या, सर्वांच्या भल्याचे आहे हे. लोक काय म्हणतील याचा विचार नको करूस. आणि सर्वांसमोर मी हे मान्य केले तुझ्या जावयालाही मान्य आहे तर बाकीच्या लोकांना काही घेणेदेणे नसावे. मी तर लग्नच लावायला तयार होते पण अंकल आणि डॉक्टर म्हणाले, आज लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यताच आहे... आई, मी तयार आहे, तुझे जावई तयार आहेत, डिसिल्वा अंकल तयार आहेत... आणि डॉक्टरदेखील तयार आहेत... हे वाक्य म्हणत डॉक्टर आत रूममधे दाखल झाले. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अपर्णा, अगदी योग्य निर्णय आहे तुझा. सर्वच तयार म्हटल्यावर कोण काय बोलेल याची पर्वा नाही करायची काकू... अहो काकू या निर्णयाने उलट लोकांची तोंडं बंद होतील, की यांना घरच्या लोकांनी साथ आहे म्हणून. असे निर्णय जर घरच्या लोकांनी घेतले तर् अनाथाश्रम, वृद्धाश्रमामधे जाण्याची गरज नाही राहणार कुणाला... समाजात असे एकटे, एकटे राहणारे कितीतरी लोक आहेत. खूप छान निर्णय घेतला अपर्णा तू... मग एका योग्य आणि छान निर्णयाचे स्वागत आपण टाळ्या वाजवून करू या.


नूतन आयुष्यात प्रवेशाच्या शुभेच्छा हं... असं म्हणत सर्वांनी मनसोक्त टाळ्या वाजवायला सुरवात केली.

रेडिओवर मंद आवाजात गाणं वाजत होतं...


भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षण भर

जरा विसावू या वळणारवर

यां वळणावर...


Rate this content
Log in

More marathi story from Manda Khandare

Similar marathi story from Drama