Manda Khandare

Inspirational Thriller

3  

Manda Khandare

Inspirational Thriller

न्याय अन्याय - भाग 6

न्याय अन्याय - भाग 6

3 mins
315


शामली दहा पंधरा मिनिटांनी परत आली. काकांनी तिला इशाऱ्यानेच विचारले, काम झाले का. तिने ही रिकामी बाटली त्यांच्या हातात देत मानेनेच होकार भराला. दोघे एक शब्द ही न बोलता झपाझपा घरा कडे निघाले.


सुमी घरात नुसत्या चकरा मारत होती. ती खूप घाबरलेली होती. जे काही होते आहे ते तिला मान्य नव्हते. तिला ह्या प्रकाराची भीती वाटत होती. ती फार अस्वस्थ होत होती. बाहेर येऊन येऊन ती बघत होती. इतक्यात तिला काका आणि शामली येतांना दिसले. सुमी चा जीव जणू भांड्यात पडला. ते लवकर आले म्हणजे ज्या कामा साठी गेले होते ते काम फ़त्ते केले होते. 


काका येऊन बाहेरच्या बाजेवर बसले. आणि शामली ला म्हणाले चुपचाप जाऊन झोपायचे.आणि काहीही विचार करायचा नाही. जे झाले, जे केले, ते आज आणि आताच इथे च विसरून जायचे. समजले. थोडे रागावूनच तिला म्हणाले ते. सुमी, जा तिला आत घेऊन आणि झोपा थोडा वेळ. मी ही पडतो इथेच. दोघी काहीच बोलल्या नाही नुस्त्या पडून होत्या अंथरूणावर टका-टका छताकडे बघत.... सकाळी आठच्या दरम्यान गावातील दामू धावत धावत वैद्यांकडे आला. अंगणातून आवाज देऊ लागला. वैद्यकाका बाहेर आले. तेव्हा त्याने सांगितले. 


दामू - अहो वैद्य बुवा, तुम्हाला माहिती आहे का काही. ते आपले जंगल शिपाई आहेत ना, त्यांचा तो मुलगा आणि त्याचे ते शहरी मित्र .....त्यांच्या सोबत काहीतरी अघटित झाले म्हणे काही तरी घटना झाली म्हणे.... चला लवकर. 

 

वैद्य काका - अरे....काय झाले त्यांना..... चल तू पुढे हो ...मी आलोच. दामू निघून गेला आणि काकांनी डोक्याला हात लावला हे कसे शक्य आहे देवा !?असे म्हणत ते खाली बसले. 

 

सुमी म्हणाली...आता का देवाला हाका मारता? आणि असे शक्य नाही म्हणजे काय? हे होणारच होते हे माहिती होते ना तुम्हाला मग आता असा अंगाचा थरकाप उडायला काय झाले.... तुम्हीच ते विष.... ती पुढे काही बोलणार इतक्यात काकांनी तिच्या तोंडवर हात ठेवला. शुssss चूप....... तुला मी काय इतका पापी वाटलो का ग? कुणाचा जीव घायला. मी शामली चा राग शांत होण्यासाठी म्हटले होते की मी साथ देणार तिची. तू बघितले होते ना किती सुडाच्या भावनेने पेटलेली होती ती. तिला होकर देणे हाच एक उपाय होता तेव्हा...... नाहीतर आपल्या वरचा विश्वास उडाला असता तिचा. आपण गमावून बसलो असतो ग आपल्या पोरीच्या प्रेमाला. म्हणून मी तयार झालो होतो. सुमीला आश्चर्य वाटले ऐकून आणि आनंदसुद्धा झाला. पण तुम्ही ते बाटलीत काय दिले होते मग शामलीला? 


काका म्हणाले की,....अग! तो साधा काढा होता. मला वाटले होते जर रस्त्यात शामली चा विचार बदलला आणि रागाच्या भरात तिने ती बाटली उघडून ते पिले असते तर किंवा ते त्या मुलांना हिने दिले असते तर ...... म्हणून् साधा काढा टाकला होता बाटलीत. पण जर तो काढा त्या मुलांना शामली ने दिला तरी ही त्यांना काही होणार नाही....... मग आता असे काय अघटीत घडले त्या मुलांच्या बाबतीत. 

मी जरा जरा बघून येतो. तू शालामी कडे लक्ष दे. 


काका घाईघाईत निघून गेले. सुमी तिथेच उभी राहून देवाचे आभार मनायला लागली. तिला हेच हवे होते. दोघांच्या हातून कुठलेच पाप होऊ नये. मग काय झाले त्या मुलांना?.... 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational