Manda Khandare

Crime Others

4  

Manda Khandare

Crime Others

न्याय अन्याय भाग 5

न्याय अन्याय भाग 5

3 mins
201


भाग 5


काका:- मी तयार करुन देतो माझ्या लेकीला ते विष....... मी देईल तुझी साथ, मी करेन् तुला मदत. 


दोघी आश्चर्यचकित झाल्या. काका असे अचानाक आत येऊन असे काही बोलतील असे वाटले नव्हते त्यांना. 


काका;- होय.. मी देतो विष तयार करुन. मी सगळे बोलणे ऐकले तुमचे. शामली म्हणते ते एकदम बरोबर आहे. सुमी, तू का नाही म्हणाली तिला.,.. ही घटना जर आपल्या मुली बरोबर झाली असती तर कदाचित तूच हे पाऊल उचलले असते. तूच केली असती त्यांना शिक्षा. काका फार कळकळीने बोलत होते. 


पण सुमी ला फार वाईट वाटले त्यांच्या बोलण्याचे. तिच्या डोळ्यात पाणी आले. शामली जवळ जाऊन तिने शामली च्या तोंडावरून हात फिरवला. फार गहिवरून आले तिला,तिचा कंठ दाटून आला. शामली ला जवळ घेत ती म्हणाली


सुमी:- शामलीला मी कधी परकी नाही समजले. मी तिला जन्म नाही दिला पण ती माझीच लेक आहे. पण मी का नाही म्हणते आहे तिला हे तुम्ही का समजुन घेते नाहीये...... अाज ती रागात आहे. तिला कळत नाहीये ती काय करायचे म्हणते आहे. असे कुणाला जीवे मारने पाप आहे. उद्या जेव्हा तिला कळेल की आपण चुकीचे वागलो होतो,आपणही गुन्हेगार आहोत तेव्हा केवळ पश्चाताप करू शकेल ती , आणि ही पश्चातापाची अाग, ही भावना खूप वाईट असते. ही ना जगू देत, ना मरू देत माणसाला. म्हणून मी तिला असे काही करण्याचे नाही म्हणते आहे. तुम्ही उद्याचा सुद्धा विचार करावा, असे काही मोठे पाऊल उचलण्या आधी. बस येवढेच माझे म्हणणे आहे. पण तुम्ही आहात तिच्या सोबत तर...... काही म्हणने नाही माझे. 


सुमिने आपले डोळे पुसले. आणि बाजूला झाली. 


काका:- माझा विचार पक्का आहे. मी आत्ताच लागतो कामाला. शामली बेटा तू आराम कर आपण सकाळी सकाळी उजाळायच्या आधी जाऊ. ४ वाजताच. आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून ते निघून गेले... 


सकाळी काका एक 100ml ची बाटली घेऊन शामली कडे आले. शामली जागेच होती. तिला म्हणाले चल.... तयार आहेस ना तू, स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी.? त्या लोकांना शिक्षा देण्यसाठी. भीती तर वाटत नाही ना. 

शामली:- नाही काका. भीती नाही वाटत. चला........ 

तिने एकदा आपल्या सुमी काकू कडे बघितले. पण दोघी ही काहीच बोलल्या नाही. सुमी ला वाटत होते तिने या सर्वांचा परत एकदा विचार करावा पण ती आता काहीच बोलली नाही. कारण त्याचा आता काही फायदा हाईल असे नाही वाटते तिला. कारण दोघे ही जिद्दी ला पेटले होते... काकांनी ती विषा ची बाटली शामली च्या हातात दिली. 


शामली आणि वैद्य काका हातात टॉर्च घेऊन अंधारात निघाले. जंगलाच्या पायवाटेने ते जाऊ लागले. सुकलेल्या पानांवरून चालतांना कार्र -कर्र असा अावाज होत होता. जो संपूर्ण जंगलाच्या शांततेला चिरत जात होता. एका उजव्या बाजूच्या पाय वाटे कडे बोट दाखवत शामली म्हणाली काका, या वाटेने जाऊ. इथून जंगल शिपाईचे घर जवळ येते. इथून त्यांच्या घराचा मागचा भाग येतो. स्वयपाक घराची खिडकी नेहमी उघडीच असते त्यांची. धक्का मारला की उघडते..,.मी आणि सुरेखा एक दिवस इकडे आलो होतो तेव्हा पाहिले होते. मला माझे काम करायला सोपे हाईल. 

काका थोडे दुर सोबत चालून म्हणाले की तू जा पुढे, मी थांबतो इथे. कुणी आले गेले तर् तुला कळवतो शिटी वाजवून. जा तू...... भीती वाटेल का? काकांनी तिला विचारले. तिने मानेने नकार दिला. आणि ती तिच्या रस्त्यावर निघाली. 


काका तिथेच एका मोठ्या झाडा जवळ आडोशाने बसले. रस्त्यावर नजर ठेवत. रात किड्यांचे अावाज तेवढे त्यांच्या सोबतीला होते. 

शामली शिपाईच्या घराच्या मागच्या बाजूने खिडकी च्या खाली बसली होती..... 


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime